एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

संजय निरुपम शिंदेंची साथ देणार? उत्तर पश्चिमसाठी चाचपणी सुरू, शरद पोंक्षे, सचिन पिळगांवकरांच्या नावांचीही चर्चा

Sanjay Nirupam vs Amol Kirtikar : संजय निरुपमांनी काल (गुरुवारी) काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तसेच पक्षाकडूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आता संजय निरुपम काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

May Sanjay Nirupam Join Shiv Sena Shinde Group : मुंबई : एकीकडे महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aghadi) जागावाटपचा तिढा अद्याप सुटण्याचं नाव घेत नाही, तर दुसरीकडे नाराजी नाट्य संपण्याची चिन्ह नाहीत. मुंबईतील (Mumbai News) उत्तर पश्चिम लोकसभा (Mumbai North West Lok Sabha Election 2024) निवडणूक ठाकरे गट (Thackeray Group) लढणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ठाकरेंनी अमोल कीर्तीकरांना (Amol Kirtikar) उमेदवारीही जाहीर केली आहे. मात्र, उत्तर पश्चिमवर ठाकरेंनी केलेल्या दाव्यानं काँग्रेस (Congress Leader) नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) नाराज झाले आहेत. तसेच, ते लवकरच वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत असल्यातं बोललं जात आहे. संजय निरुपमांनी काल (गुरुवारी) काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला, तसेच पक्षाकडूनही त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. आता संजय निरुपम काँग्रेसची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय निरुपम यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम मुंबईमधून संजय निरुपम यांची शिंदेंच्या शिवसेनेकडून चाचपणी सुरु आहे. तसेच. संजय निरुपम यांच्यासोबत अभिनेते शरद पोंक्षे, सचिन पिळगांवकर आणि सचिन खेडेकर यांच्या नावाची देखील चाचपणी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, या मतदारसंघात मराठी किंवा अमराठी यापैकी कोणाला जास्त पाठिंबा मिळू शकतो, याचंही सर्वेक्षण केल्याची माहिती समोर आली आहे.

संजय निरुपम नाराज का? 

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेनं उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघामधून निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं. एवढंच नाहीतर ठाकरेंनी थेट अमोल किर्तीकरांना उमेदवारीही जाहीर करुन टाकली. पण, ठाकरेंच्या या निर्णयानं काँग्रेस नेते संजय निरुपम नाराज झाले. त्यांनी अनेकदा माध्यमांसमोर उघडपणे नाराजी व्यक्त केली. तसेच, अनेकदा ठाकरेंवर थेट निशाणाही साधला आहे.  

दरम्यान, महायुती आणि महाविकास आघाडी महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणुकींचं रिंगण राज्यातील या दोन प्रमुख आघाड्यांभोवतीच असणार आहे. दोन्ही आघाड्यांना जागावाटपाचा तिढा काही सुटण्याचं नाव घेत नाही. अशातच महाविकास आघाडीत तर नाराजी नाट्यांची मालिकाच सुरू आहे. काही जागांवर अजुनही उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. तर काही ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अशातच मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत नाराजी नाट्य घडल्याचं पाहायला मिळालं. 

पाहा व्हिडीओ : Mumbai North West Lok Sabha Constituency : उत्तर -पश्चिम मुंबईमधून निरूपम यांच्यासाठी चाचपणी सुरू

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Eknath Shinde on CM: एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदाबाबत मोठ्ठं विधान, म्हणाले, 'आमचं काहीच ठरलं नव्हतं'
Maharashtra vidhansabha results 2024 : परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
परळीत धनुभाऊंचीच हवा, बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा विजय ; तुतारीचा करिश्मा चालला नाही
Sharad Pawar: राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
राज्यात पवार पॅटर्न फेल, थोरल्या पवारांनी राज्य पिंजून काढलं पण तुतारी वाजलीच नाही
Maharashtra Assembly Election Result : मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
मुहायुतीची बुलेट ट्रेन सुस्साट, महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड, नियम काय सांगतो?
Eknath Shinde : हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
हा विजय लाडक्या बहिणींचे प्रेम, आमच्या कामाची पोचपावती; एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
Embed widget