Manoj Jarange Patil : मुस्लिम- मराठा आणि दलित एकत्र आला तर कार्यक्रम वाजला, मनोज जरांगेंनी स्ट्रॅटेजी सांगितली
मराठा-मुस्लिम आणि दलित एकत्र आल्यास कार्यक्रम वाजलाच, असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिलाय.
Manoj Jarange Patil : "मुस्लिम मराठा आणि दलित एकत्र आला तर कार्यक्रम वाजला, हे मी प्रत्येकवेळी जाहिरात सांगतो. त्यांच्या जवळच काय? मुस्लिम समाजासाठी मी आरक्षण मागतोय. मग चुकीचं काय करतोय. मानव धर्म मी निभवतोय. धनगर सुद्धा एकत्र यायला पाहिजेत म्हणतोय", असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले. ते जालन्यात एबीपी माझाशी बोलत होते. गोरगरीब मराठा सुधारला पाहिजे. तो मोठा झाला पाहिजे अशी सरकारची भूमिका का असू नये? धनगर समाजाने कुठवर मेंढ्या पाळायच्या, मुस्लीम बांधवांना का आरक्षण मिळू नये हेच मी सत्तार यांना सांगितलं की त्यांच्याकडून हे करुन घ्या, असंही जरांगेंनी सांगितलं.
ज्या ज्या गावात नुकसान झाले आहे त्या गावात मदत करा
मनोज जरांगे म्हणाले, मी सरकारला सांगितले की आरक्षणाबाबत तातडीने निर्णय घ्या. माझ्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.
लोकांचे संसार वाहून गेले आहे. सरकी आणि सोयाबीनही वाहून गेली. गावा गावातील सामान वाहून गेले आहे. महाराष्ट्रातल्या अतिवृष्टी झालेल्या भागात सर्व समाजाला आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांना विनंती आहे. ज्या ज्या गावात नुकसान झाले आहे त्या गावात मदत करा. मंत्र्यांनी शब्द दिला असून शेतकऱ्यांना आपण सरसकट मदत करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यावेळी मी त्यांच कौतुक केलं योग्य निर्णय आहे.
कृषी मंत्री म्हणजे जबाबदार आहेत.
कंपन्यांना द्यायला पैसे आहेत, कर्ज द्यायला पैसे आहेत
पुढे बोलताना जरांगे म्हणाले, सरकारकडे लय पैसे आहेत. कंपन्यांना द्यायला पैसे आहेत कर्ज द्यायला पैसे आहेत. सरकारने शेतकऱ्यांशी दगा फटका केला तर शेतकरी दगा फटका करतील. फडणवीसांना मी सांगितलं की तुम्ही सरसकट मदत करा. त्यांनी सांगितलं की कॅबिनेटमध्ये आम्ही विषय घेतोय. मी फक्त त्यांना शेतकऱ्यांच्या बाबतीत बोललो. त्यांनी लातूरमध्ये जाऊन बघितलं आहे. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देखील होते.
महापुरुषांच्या बाबतीत दर्जेदार काम न करणे. स्वार्थ ठेवून काम करणे महापुरुष छत्रपती शिवराय किंवा आणखी कोणत्याही महापुरुषांच्या बाबतीत असो. यांना सुट्टीच नाही पाहिजे कायम आतमध्ये सडले पाहिजेत. दोन-चार दिवस आतमध्ये घालून बाहेर आला असं होतं कामा नये. यामुळे राज्याचा वातावरण खराब झालेलं आहे. आमच्या भावना दुखावल्या आहेत. आज सरकारने चांगला निर्णय घेतला,मी शंभूराज देसाई साहेबांचे मी आभार मानतो. त्यांनी कुणबीला 6 महिने व्हॅलिडीटीसाठी मुदतवाढ दिली, अशा गोष्टींचे मी स्वागतच करतो, असंही जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या
मोठी बातमी : बदलापूर पुन्हा हादरले, रेल्वे स्टेशनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण