एक्स्प्लोर

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे शिवनेरीवर दाखल; पारनेरमध्ये जंगी स्वागत, पुण्यातील वाहतुकीत आज बदल

Manoj Jarange Patil: ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. दरम्यान मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं यासाठी काल (27 ऑगस्ट) अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आता शिवनेरीवर दाखल झालेत. रात्री दोन वाजता मनोज जरांगेंचं पारनेरमध्येही जंगी स्वागत करण्यात आलं. हजारो मराठा बांधवासह मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत. ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. दरम्यान मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

 29 ऑगस्टला केवळ एकच दिवस सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर मात्र मोर्चेकरांना मैदानात थांबता येणार नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तसेच आझाद मैदानात 7 हजार स्क्वेअर मीटरचे क्षेत्र आंदोलनासाठी राखीव असल्याने मैदानाच्या क्षमतेनुसार केवळ 5000 आंदोलकांना मुंबई पोलिसांनी  परवानगी दिली आहे.  

मराठा मोर्चामुळे पुणे जिल्ह्यात आज वाहतुकीत बदल-

मराठा मोर्चामुळे पुणे जिल्ह्यात आज वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. वाहतूककोंडी होऊ नये तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूकीत बदल करण्याचे आदेश  दिले आहेत, नगर-कल्याण मार्गावरील वाहतूक 14 नंबर जांबुत फाटा येथून नगरकडे जाणारी वाहतूक बोर-बेल्हे-अळकुटी-पारनेर-अहिल्यानगरमार्गे वळवली जाणार आहे. नारायणगावकडून जुन्नरकडे जाणारी वाहतूक ओझर फाटा-कारखाना फाटा-शिरोली बुद्रुक मार्गे वळविण्यात आली आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले. 

2. हैदराबाद गझेटियर लागू करा... 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला सातारा, बाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या...सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या...अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या..., अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मार्ग कसा असणार? (What will be the road map of Manoj Jarange movement?)

- अंतरवालीवरून 27 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता निघणार...

- अंतरवाली - पैठण -शेवगाव (अहिल्यानगर)..कल्याण फाटा -आळे फाटा, शिवनेरी (जुन्नर मुक्कामी..)

- 28 ऑगस्टला खेड मार्गे चाकण, लोणावळा, वाशी चेंबूर...28 ऑगस्ट रोजी रात्री आझाद मैदानावर पोहचणार.

- 29 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आझाद मैदानावर आंदोलन करणार...

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

संबंधित बातमी:

Manoj Jarange On Devendra Fadnavis: मी स्वत: देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला; नेमकं काय बोलणं झालेलं?, मनोज जरांगेंनी सगळं सांगितलं!

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates:वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
Maharashtra Live News Updates: वाढत्या महागाईचा फटका मुंबईतील हॉटेल ग्राहकांना बसणार; खाद्य पदार्थांच्या दरात वाढ होण्याची शक्यता 
RSS Vijayadashami: संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही संघाच्या मंचावर उपस्थिती
संघाच्या विजयादशमी उत्सवात इस्रायलचे महावाणिज्यदूत विशेष निमंत्रित अतिथी, तर अचानक राजीनाम्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखडांचीही संघाच्या मंचावर उपस्थिती
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Embed widget