सरस्वतीवर फार प्रेम करणारे त्यांचे स्टेटमेंट आहेत, त्यामुळे भाजपही त्यांना घेईल का माहिती नाही, कट्टर विरोधकाने छगन भुजबळांना डिवचलं
माझ्या हातून पराभूत होण्यापेक्षा सत्ता येऊन देखील त्यांना मंत्रिपद न जाणं याला जास्त नियतीने महत्व दिलं असल्याचे म्हणत छगन भुजबळांचे कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या माणिकराव शिंदे यांना टोला लगावलाय.
नाशिक : सिन्नर विधानसभेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांना मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांची कृषीमंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले. यावेळी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. अशातच छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या माणिकराव शिंदे (Manikrao Shinde) यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट घेतली. माणिकराव शिंदे यांनी येवला लासलगाव विधानसभा मतदारसंघातून छगन भुजबळांविरुद्ध निवडणूक लढवली होती. मात्र या लढतीत छगन भुजबळांनी दणदणीत विजय मिळवत माणिकराव शिंदे यांचा पराभव केला होता.
सरकार येऊन सरकारमध्ये नसणे हा मोठा अपमान- माणिकराव शिंदे
माझ्या हातून पराभूत होण्यापेक्षा राज्यामध्ये सत्ता येऊन त्यांना मंत्रिपद न जाणं याला जास्त नियतीने महत्व दिलं. नियतीला कदाचित सरकार येऊन सरकारमध्ये नसणे हा मोठा अपमान त्यांना द्यायचा होता, म्हणून कदाचित येवल्यामध्ये त्यांना विजय मिळाला. किंबहुना त्याची लढत कशी झाली आणि ते कसे विजयी झाले हे येवल्यातल्या जनतेला माहिती आहे. आता भाजप ही छगन भुजबळ यांना मंत्रीमंडळात घेईल का माहित नाही. कारण ते सरस्वतीवर फार प्रेम करणारे आहेत. त्यांचे अनेक स्टेटमेंट्स तसे असल्याचे सांगत माणिकराव शिंदे यांनी छगन भुजबळ यांना डिवचले आहे.
साडेआठरा वर्षानंतर जनतेला मंत्री कसा असतो हे कळालं असावं
दरम्यान, कृषीमंत्री झाल्याने माणिकराव कोकाटे यांचा माणिकराव शिंदे हे नागरिसत्कार येवला येथे आयोजित करणार आहेत. माणिकराव कोकाटे मंत्री झाले याचा खूप आनंद झाला आहे. आज मला असं वाटतं साडेआठरा वर्षानंतर मंत्रीपद आणि मंत्री कसा असतो हे ज्याने मतदान केलं असेल त्याला वाटले असेल. साडेआठरा वर्षानंतर जनतेला मंत्री कसा असतो हेही आज कळले असेल. भेटीमागे कुठलेही राजकारण नाही. ते मंत्री झाल्यानंतर ते राज्याचे मंत्री असतात. किंबहुना आम्ही जिल्हा बँकेच्या माध्यमातून, तसेच युवक काँग्रेसच्या माध्यमातून एकमेकांच्या टच मध्ये आहोत. त्यामुळे शुभेच्छा देण ही महत्त्वाचा भाग आहे . मात्र सरकार येऊन सरकारमध्ये नसणे हा भुजबळांचा मोठा अपमान असल्याचा खोचक टोला ही माणिकराव शिंदे यांनी लगावला आहे.
माझ्या हातून पराभूत होण्यापेक्षा राज्यामध्ये सत्ता येऊन त्यांना मंत्रिपद न जाणं याला जास्त नियतीने महत्व दिलं. किंबहुना दुसऱ्या माणिकरावच्या हातून हे घडलं असावं, असं मला वाटतं. आता माणिकराव कोकाटे निश्चित पालकमंत्री झाले पाहिजे, त्यांनाच पालकमंत्री निश्चितपणे करतील असं मला वाटतं. असेही माणिकराव शिंदे म्हणाले.
हे ही वाचा