एक्स्प्लोर

Vidhan Parishad Election : 'बविआ'ची तीन निर्णायक मतं कुणाच्या पारड्यात? हितेंद्र ठाकुरांचे स्पष्ट संकेत 

Hitendra Thakur : आपले सर्व पक्षांसोबत चांगले संबंध असून ज्याला आपण मतं देऊ तो निवडून येईल अस बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकुर म्हणाले.

मुंबई : राज्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीने कंबर कसली असून आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी राजकीय गणित मांडलं जात आहे. त्यामध्ये हितेंद्र ठाकुर (Hitendra Thakur) यांच्या बहुजन विकास आघाडीची तीन मतं निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ही तीन मतं नेमकी कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. जो आमची कामं करेल त्याला मत देऊ, आणि ज्याला मत देऊ तो उमेदवार निवडून येईल अशा विश्वास हितेंद्र ठाकुर यांनी व्यक्त केला आहे.

हितेंद्र ठाकूर यांच्याकडे असलेल्या मतांवर दोन्ही बाजूंचा डोळा आहे. त्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या त्यांच्याशी भेटीगाठी सुरू असल्याचं दिसतंय. 

हितेंद्र ठाकुर म्हणाले की, माझे सगळ्या पक्षांसोबत चांगले संबंध आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ही माझी कामं करतात,  त्यासाठी मी त्यांना भेटतो. तुम्ही फक्त चार-पाच नाव घेऊ नका, मी सर्व नेत्यांशी भेटतो आणि माझे चांगले संबंध आहेत. 

आमची तीन मतं जर गेमचेंजर ठरत असतील तर पुढच्या वेळेस मी अधिक उमेदवार निवडून आणेन असं हितेंद्र ठाकुर म्हणाले. ते म्हणाले की, "मिलिंद नार्वेकर माझे चांगले मित्र आहेत. शेकापचे जयंत पाटीलसुद्धा चांगले मित्र आहेत. आम्ही तीन मतं कुणाला द्यायची याचा निर्णय घेऊ. जो आमची कामं करेल त्याला मत देऊ, आणि ज्याला मत देऊ तो उमेदवार निवडून येईल."

जिंकण्यासाठी 23 मतांचा कोटा

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी  23 मतांचा कोटा असेल. विधानसभेत महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कोणाची किती ताकद असेल आणि अकरावी जागा निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव कशी करावी लागणार याची आकडेवारी जाणून घेऊयात,

महाविकास आघाडी

राष्ट्रवादी शरद पवार - 12

उद्धव ठाकरे शिवसेना - 15 + 1 शंकरराव गडाख = 16

काँग्रेस - 37

एकूण - 65

महाविकास आघाडीला मतांची जुळवाजुळव करण्यासाठी चार किंवा त्यापेक्षा अधिक मतांची गरज पडेल.  

छोटे घटक पक्ष

1) बहुजन विकास आघाडी - 3

2) समाजवादी पक्ष - 2

3) एमआयएम - 2 

4) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी - 1

5) शेतकरी कामगार पक्ष - 1

एकूण - 9

महाविकास आघाडी एकूण आमदार - 65

महाविकास आघाडीला पाठिंबा देऊ शकणारे पक्ष

1) समाजवादी 2

2) एमआयएम 2

3) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी 1

4) शेतकरी कामगार पक्ष 1 

महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे पक्ष लक्षात घेऊन एकूण आमदार - 71 आमदार

महायुती आमदारांची संख्या

राष्ट्रवादी (अजित पवार) 41

भाजपा - 103

शिवसेना - 38

महायुती पाठींबा देणारे आमदार

राष्ट्रवादी (अजित पवार)

1) देवेंद्र भुयार 

2) संजयमामा शिंदे 

राष्ट्रवादी + अपक्ष - 43

भाजपला पाठिंबा देणारे आमदार 

1) रवी राणा 

2) महेश बालदी 

3) विनोद अग्रवाल 

4) प्रकाश आवाडे 

5) राजेंद्र राऊत 

6) विनय कोरे 

7) रत्नाकर गुट्टे 

भाजप + मिञ पक्ष आणि अपक्ष- 103+ 7 = 110

एकनाथ शिंदे शिवसेना- 38

पाठिंबा देणारे आमदार - 10

1) नरेंद्र भोंडेकर 

2) किशोर जोरगेवार 

3) लता सोनवणे 

4) बच्चू कडू 

5) राजकुमार पटेल 

6) गीता जैन 

7) आशीष जैसवाल 

8) मंजुळा गावीत 

9) चंद्रकांत निंबा पाटील 

10) राजू पाटील 

एकूण - शिवसेना + मिञ पक्ष आणि अपक्ष = 38+ 10 = 48

महायुती एकूण आमदार - 201

महायुतीला आपले नऊ उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी सहा मतांची गरज पडणार आहे. त्यामुळे अपक्ष आमदारांवर महायुती या सगळ्यासाठी अवलंबून असेल. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महायुतीवाले लफंगे, पराभवाला घाबरुन लोकशाही विरोधात मोठं कारस्थान, संजय राऊतांचा हल्लाबोल
महायुतीवाले लफंगे, पराभवाला घाबरुन लोकशाही विरोधात मोठं कारस्थान, संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत विदर्भामधील जागांवरून तिढा कायम; 'या' 12 जागांसाठी ठाकरे गट आग्रही!
महाविकास आघाडीत विदर्भामधील जागांवरून तिढा कायम; 'या' 12 जागांसाठी ठाकरे गट आग्रही!
Ajit Pawar : तुम्हाला निलेश लंकेंनी पाठवलं का? भर सभेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, नेमकं काय घडलं?
तुम्हाला निलेश लंकेंनी पाठवलं का? भर सभेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, नेमकं काय घडलं?
Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nana Patole Full PC : भाजपचे खायाचे आणि दाखवायचे दात वेगळे, नाना पटोलेंचा हल्लाबोलSanjay Shirsat PC | शिवसेनेची उमेदवार यादी कधी येणार? संजय शिरसाटांची दिली पत्रकार परिषदेत माहितीAshok Chavan On Nanded Bypoll Election | नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवणार का? अशोक चव्हाण म्हणाले...ABP Majha Headlines :  4 PM : 19 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महायुतीवाले लफंगे, पराभवाला घाबरुन लोकशाही विरोधात मोठं कारस्थान, संजय राऊतांचा हल्लाबोल
महायुतीवाले लफंगे, पराभवाला घाबरुन लोकशाही विरोधात मोठं कारस्थान, संजय राऊतांचा हल्लाबोल
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाविकास आघाडीत विदर्भामधील जागांवरून तिढा कायम; 'या' 12 जागांसाठी ठाकरे गट आग्रही!
महाविकास आघाडीत विदर्भामधील जागांवरून तिढा कायम; 'या' 12 जागांसाठी ठाकरे गट आग्रही!
Ajit Pawar : तुम्हाला निलेश लंकेंनी पाठवलं का? भर सभेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, नेमकं काय घडलं?
तुम्हाला निलेश लंकेंनी पाठवलं का? भर सभेत अजितदादांनी कार्यकर्त्यांना खडसावलं, नेमकं काय घडलं?
Santosh Bangar : आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
आमदार संतोष बांगरांना 24 तासात खुलासा करण्याचे आदेश, बांगर म्हणतात, फोनपेचा अर्थ मला माहीत नाही, गुगल पे सुद्धा माहीत नाही!
अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा, देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा हाॅटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय?
अमित शाह आणि सीएम शिंदेंची बंद दाराआड चर्चा, देवेंद्र फडणवीस अन् अजितदादा हाॅटेलबाहेरच थांबले; नेमकं घडलं तरी काय?
तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!
तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या अन् शरद पवारांवरही तोफ डागलेल्या राजेंद्र शिंगणेंनी अखेर तुतारी फुंकलीच!
Parli Assembly constituency : परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत, अनेक लोक जेलमध्ये गेले, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले; शरद पवार गटाचा हल्लाबोल
परळी मतदारसंघांमध्ये मोठी दहशत, अनेक लोक जेलमध्ये गेले, धनंजय मुंडे मंत्री म्हणून फेल झाले; शरद पवार गटाचा हल्लाबोल
Maharashtra Assembly Elections 2024 : कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे-कोल्हेंचा राजकीय संघर्ष, महायुतीत उमेदवारीवरून पेच, विवेक कोल्हे तुतारी हाती घेणार की मशाल?
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात काळे-कोल्हेंचा राजकीय संघर्ष, महायुतीत उमेदवारीवरून पेच, विवेक कोल्हे तुतारी हाती घेणार की मशाल?
Embed widget