एक्स्प्लोर

रात्रीस बैठक चाले! मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस, अजित पवारांची वर्षावर भेट; रात्री उशिरापर्यंत बंद दाराआड चर्चा, नेमकं शिजतंय काय?

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अजित पवारांची वर्षावर तब्बल दीड तास बंद दाराआड चर्चा.

CM, DCM Meeting At Varsha Bungalow: मुंबई : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Political Updates) चाललंय तरी काय? असा प्रश्न काल (सोमवारी) रात्रीपासून सर्वांना पडला आहे. याचं कारणंही तसंच आहे. काल (सोमवारी) रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या वर्षा निवासस्थानी (Varsha Bungalow) एक बैठक पार पडली. या बैठकीला राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. महत्त्वाची बाब म्हणजे, या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) थेट नागपुरातून (Nagpur) पोहोचले होते. तब्बल दीड तास चाललेल्या बैठकीत नेमकं काय झालं? याबाबत मात्र, काहीच माहिती मिळालेली नाही. 

काल रात्री उशिरापर्यंत मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रात्री उशिरा दीड तास बैठक झाली. या बैठकीला मावळचे खासदार श्रीरंग बारणे देखील उपस्थित होते. त्याचवेळी नागपूरहून मुंबईत दाखल झालेले देवेंद्र फडणवीस थेट वर्षा निवासस्थानी दाखल झाले. वर्षावर त्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. थोड्यावेळानं अजित पवार चर्चा संपवून निघाले. मात्र अजित पवारांनंतर फडणवीसांची रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री शिंदेंशी खलबतं सुरू होती. दरम्यान, आज भाजप नेत्यांची दिल्लीत बैठक आहे. दिल्लीतील वरिष्ठ नेतृत्वाची राज्यातले नेते भेट घेणार आहेत. फडणवीसही राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांशी भेट घेतील. दरम्यान फडणवीसांच्या सरकारमधून मोकळं होण्याच्या मागणीवर भाजप नेते काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. लोकसभेत महायुतीची एकूणच सुमार कामगिरी लक्षात घेता, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुशंगानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या होणाऱ्या बैठका या महत्वाच्या मानल्या जात आहेत. 

नवी दिल्लीत आज भाजप कोअर कमिटीची बैठक 

नवी दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक होणार आहे. ज्या राज्यात येत्या काळात विधानसभा निवडणुका आहेत, त्या राज्यातील प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आलं आहे. महाराष्ट्रातून या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, चंद्रकांतदादा पाटील, रावसाहेब दानवे उपस्थित राहणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतर फडणवीस यांनी उपमुख्यंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडेही या बैठकीसाठी उपस्थित राहणार आहेत. 

राज्यात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता?

महाराष्ट्रात भाजपमध्ये मोठे बदल होण्याची दाट शक्यता आहे. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भूपेंद्र यादव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक प्रभारी आणि अश्विनी वैष्णव यांची भाजपचे महाराष्ट्र निवडणूक सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि मुंबई अध्यक्षांच्या कामगिरीचा प्रभारी आढावा घेणार आहे. 

पाहा व्हिडीओ : Shinde Fadnavis Pawar Meet : शिंदे-फडणवीस-अजितदादांची खलबतं, रात्रीच्या बैठकीत काय ठरलं?

एबीपी माझाच्या मुंबई ब्युरो मध्ये गेल्या वर्षभरापासून मुंबई प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी  ई टीव्ही भारत,लोकमत आणि मुंबई तरुण भारत या माध्यम समूहांमध्ये कार्यरत होते. सर्वसामान्य घडामोडींसह राजकीय बातम्याचं वार्तांकन ते करतात.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Maharashtra Live Blog Updates: सलग 12 व्या दिवशीही आखाती युद्ध सुरूच, इराणवर अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले कायम
Mahayuti : महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
महायुतीचा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सत्ता स्थापनेचा तिढा सुटला; रायगड, कोल्हापूर, पुण्यासह रत्नागिरीत कुणाचा अध्यक्ष?
Baramati News: अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
अजितदादांच्या अपघाती निधनानंतर बारामतीच्या पोटनिवडणुकीची तयारी सुरु; अंतिम मतदार यादीही जाहीर, कधी होणार निवडणूक?
Amol Mitkari: 'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'
'बहती हवा सा था वो, कहाँ गया उसे ढूंढो', नरेश अरोरा कुठे झाले गायब? अमोल मिटकरींचा प्रश्न, म्हणाले, 'त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असेलच ना?...'

व्हिडीओ

Pimpari Chinchwad : युद्धामुळं लग्न सराई संकटात,केटरर्सकडे गॅसचा तुटवडा; 10 हजार लग्न पुढं ढकलणार?
Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Passive Euthanasia: आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
आपुलें मरण पाहिलें म्यां डोळां! अवघ्या 31 वर्षीय हरीशला इच्छामरणाची 'सर्वोच्च' परवानगी; लेकासाठी 13 वर्ष झिजलेल्या पालकांचं अन् एम्सचंही कौतुक, नेमकं प्रकरण आहे तरी काय?
Arun Tupe Death: पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
पाच मिनिटं झोपतो बोलून कायमचा झोपी गेला, आई उठवायला गेली अन्..., लोकप्रिय रीलस्टार अरुण तुपेच्या मृत्यूने हळहळ
Badlapur Uterine Eggs Selling Racket: नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
नाशिकमधील आयव्हीएफ सेंटरमधून 96 महिलांचं बीज खरेदी, एकाच महिलेची बीजांडं जास्तवेळा काढल्याचा संशय, डॉ. अमोल पाटील पोलिसांच्या ताब्यात
Pimpri-Chinchwad News: मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?
Mumbai Crime: फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
फजल म्हणाला, तू एक दिवस फ्रिजमध्ये सापडशील, मुंबईच्या डॉ. स्तुती सोनावणेचा छळाला कंटाळून टोकाचा निर्णय
Maharashtra Weather Update: मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत उष्णतेच्या लाटा, विदर्भ मराठवाड्यात वादळी पावसाचे इशारे, हवामान विभागाचा अंदाज काय?
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
Sanjay Raut and PM Modi: पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई दूर होईल: संजय राऊत
Embed widget