एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress : अन्नदाता किडनी, लिव्हर विकायचं पत्र सरकारला पाठवतो हे भूषणावह नाही; भाजपने शेतकऱ्यांना न्याय न दिल्यास कायदा हाती घेऊ; काँग्रेसचा इशारा
Nana Patole Reaction on Hingoli Farmer किडनी,लिव्हर विकायचा आहे असे पत्र लिहण्याची वेळ महाराष्ट्राच्या अन्नदात्यावर येत असेल तर ही परिस्थिती भूषणावह नाही; आता काँग्रेस पक्षाने कायदा हाती घ्यावा का ?
भंडारा : आमची किडनी,आमचं लिव्हर विकायचा आहे अश्या आशयाचे पत्र हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी सरकारला लिहिलं आहे. महाराष्ट्राच्या अन्नदात्याची जर ही परिस्थिती निर्माण झाली असेल तर सरकार याकडं लक्ष घालणार आहे की नाही ? अशा पद्धतीचं भावनात्मक पत्र सरकारला शेतकऱ्यांनी लिहावं हे भूषणावह नाही.सरकारनं तातडीनं याची दखल घ्यावी.अन्यथा आता कायदा काँग्रेस पक्षाला हाती घ्यावं लागेल का ? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी राज्य सरकारला विचारला आहे.
सरकार देवीदर्शनाला जातात आणि तिथं सांगतात की,आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकऱ्यांना आम्ही सुजलाम सुफलाम करणार असल्याची घोषणा ते करतात.मात्र देवाकडे आपल्या स्वतःसाठी मागायला जातात की,शेतकऱ्यांसाठी मागायला जातात हे माहीत नाही. असा खोचक टोला देखील नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis )यांचे नाव न घेता लगावला आहे.
विधानसभा अध्यक्षांची भूमिका संशयास्पद
महाराष्ट्र हे कायद्याचं राज्य आहे. विधिमंडळाच्या कामकाजात देशात सगळ्यात चांगलं काम हे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं राहिल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. पण सध्या खोक्यांची व्यवस्था निर्माण झाली तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये विधिमंडळाच्या कामकाजातील जी काही परिस्थिती आहे ती फार चांगली आहे असं कोणालाच मान्य करायची गरज नाही. विधानसभा अध्यक्षांची भूमिका संशयास्पद आहे. कोर्ट यावर देखरेख ठेवून आहे त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी जे काही संविधानिक त्यांचे अधिकार आहे त्याचं अधिकाराचा प्रॉपर वापर करून या सगळ्या प्रश्नांचा तातडीनं निकाल लावावा,असा निशाणा देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर (Rahul Narwekar) साधला आहे.उद्धव ठाकरे गटाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांनी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हे आमदार अपात्रतेच्या सुनावणीमध्ये वेळकाढूपणा करतात,असा आरोप केला होता, त्यावर नाना पटोले यांनी निशाणा साधला आहे.
अन्नदात्यावर किडनी, लिव्हर विकायची वेळ भूषणावह बाब नाही.
राज्यात दिवसागणिक उद्रेक वाढत चाललेला आहे. ओबीसी विरुद्ध मराठा (Maratha Reservation) हा वाद राज्यात सरकारानं निर्माण केलेला आहे. मराठ्यांसोबत एकदा सरकार खोटं बोललेलं आहे. पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होऊ नये, याची काळजी या सरकारनं घ्यावी. पण ज्या पद्धतीनं ओबीसीमध्ये दहशत निर्माण करून ठेवली आहे, याची देखील नोंद सरकारनं घेतली पाहिजे.अन्नदाता किडनी, लिव्हर विकायचं पत्र सरकारला पाठवते ही भूषणावह बाब नाही. भाजप सरकारनं सर्वांना न्याय द्यावा अन्यथा काँग्रेस कायदा हातात घेईल. असा निर्वाणीचा इशारा देखील नाना पटोले यांनी राज्य सरकारला दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement