राहुल नार्वेकरांविरोधात ठाकरे-पवार एकत्र, सुप्रीम कोर्टात शिवसेना-राष्ट्रवादीच्या याचिकेवर एकत्र सुनावणी
आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे दिरंगाई करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. त्यानंतर पवार गटाकडूनही तोच आरोप करण्यात आला आहे.
मुंबई : शरद पवार गटाने (Sharad Pawar) अजित पवार (Ajit Pawar) गटाविरोधात दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर (Maharashtra Political Crisis) आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुनावणी पार पडणार होती. मात्र पवार गटाच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) नकार दिला. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे दिरंगाई करत असल्याचा आरोप ठाकरे गटाचा आहे. त्यानंतर पवार गटाकडूनही तोच आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीचे (NCP) प्रकरण सारखंचं असल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या या मागणीबाबतच्या याचिकेवर आता एकत्र सुनावणी होणार आहे. शुक्रवारी 13 ऑक्टोबरला होणाऱ्या या सुनावणीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.
शिवसेनेच्या आमदार अपात्रतता प्रकरणाची सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार होती. परंतु आज अजित पवार यांच्याबरोबर गेलेल्या 41 आमदारांवर कारवाई करण्याच्या, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सूचना देण्याची मागणी करणाऱ्या शरद पवारांच्या याचिकेवर 13 ऑक्टोबरला एकत्रित सुनावणी घेण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रताप्रकरणाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.दोन्ही सुनावणी एकत्र घेण्याची सूचना सुप्रीम कोर्ट देण्याची शक्यता आहे.
अध्यक्षांना लवकरात लवकर प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश देण्याची शक्यता
विधानसभा अध्यक्षांवरील दबाव वाढला आहे. कारण उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गट दोन्ही गटाची एकत्रित याचिका ऐकणार आहेत. दोन्ही प्रकरण सारखी असल्यामुळे सुप्रीम कोर्ट एकच निर्देश देण्याची शक्यता आहे. अध्यक्षांना लवकरात लवकर प्रकरण निकाली काढण्याचे निर्देश सु्प्रीम कोर्ट देण्याची शक्यता आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या तीन महिन्यांत हे प्रकरण चालले. ज्यामध्ये अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात माहिती मागवली. 13 ऑक्टोबरला तारखेला सुनावणी होणार आहे. न्यायाधीश म्हणाले की त्यांनी (अध्यक्षांनी) टाईमटेबल बनवला आहे त्यामुळे 13तारखेला त्यासंबंधी पुढील चर्चा करू.
सगळ्यांची बाजू ऐकून निर्णय घेणार
सगळ्यांची बाजू ऐकून निर्णय घेणार आहे. आपला आपल्या न्याय, निवडणूक आणि संविधान तिन्हीवर पूर्ण विश्वास असावा जर एखादा निर्णय नियमबाह्य असेल तर सुप्रीमकोर्ट हस्तक्षेप करू शकतं अन्यथा नाही करणार, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले.
हे ही वाचा :