एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सुषमा अंधारेंना मारहाण केल्याचा दावा; जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधवांची पक्षातून हकालपट्टी

Beed News: विशेष म्हणजे, सुषमा अंधारे पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप जाधव यांनी केला होता.

Beed News: ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा बीड शहरात 20 मे रोजी होत असून, त्यापूर्वीच ठाकरे गटात अनेक मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना मारहाण केल्याचा दावा करणारे ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याने हकालपट्टी करण्यात येत असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आली आहे. विशेष म्हणजे सुषमा अंधारे पदांसाठी पैसे घेत असल्याचा आरोप जाधव यांनी केला होता,तर सुषमा अंधारे यांनी सर्व आरोप फेटाळून लावत ही शिंदे गटाने लिहिलेली स्क्रिप्ट असल्याचं म्हटले आहे. 

काय आहे प्रकरण आहे? 

गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसेनेत पक्षअंतर्गत वाद सुरु असल्याची चर्चा सुरु होती. दरम्यान बीड शहरात 20 मे रोजी होणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा होणार असून, त्यापूर्वीच हा वाद चव्हाट्यावर आला आहे.  सुषमा अंधारे या पदांसाठी पैसे घेतात. आपल्या कार्यालयात एसी, सोफा आणि फर्निचर करण्यासाठी देखील पदाधिकारी यांच्याकडून सुषमा अंधारे पैसे घेत असल्याचा आरोप जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी केले होते. तर त्यामुळे आपण अंधारे यांना दोन चापटा कानशिलात लगावल्या असल्याचा दावा जाधव यांनी केला आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओ देखील सोशल मिडीयावर प्रसारित केला आहे. त्यामुळे ठाकरे गटात खळबळ उडाली होती. दरम्यान या सर्व घडामोडीनंतर जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. 

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून आला आदेश...

बीड जिल्ह्यातील ठाकरे गटातील या सर्व घडामोडीनंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून एक आदेश काढण्यात आला आहे. ज्यात बीड जिल्हा संपर्कप्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून कळवण्यात आली आहे.

अंधारेंनी आरोप फेटाळून लावले... 

जाधव यांच्या आरोपांनंतर सुषमा अंधारे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. बीड शहरात 20 मे रोजी होणाऱ्या ठाकरे गटाच्या शिवसेनेची महाप्रबोधन यात्रेच्या ठिकाणी आपण पाहणीसाठी गेलो होतो. यावेळी सभेच्या स्टेजची पाहणी करताना ठाकरे गटाचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर आणि शिवसेना जिल्हाप्रमुख अप्पासाहेब जाधव यांच्यात कुठल्यातरी कारणावरून शिवीगाळ आणि धक्काबुक्कीचा प्रकार घडला. त्यानंतर जाधव तेथून निघून गेले. मात्र जाधव यांनी केलेले सर्व आरोप खोटे असून, यात्रेला गालबोट लागावं म्हणून शिंदे गटाने ही स्क्रिप्ट रचल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. 

महत्वाच्या इतर बातम्या: 

Sushma Andhare : बीडमध्ये ठाकरे गटाचा वाद चव्हाट्यावर, सुषमा अंधारे यांना मारहाण केल्याचा जिल्हाप्रमुखांचा दावा, अंधारे म्हणाल्या.... 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

EKnath Shinde Delhi Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीसाठी रवाना, हाती काय लागणार?Job Majha : मुंबई सीमाशुल्क आयुक्तालयमध्ये नोकरीची संधी, कोणत्या पदांवर जागा? 28 Nov 2024Ramadas kadam Sai Darshan : रामदास कदम-धनंजय मुंडे शिर्डीत साईचरणी लीनChhagan Bhujbal On Devendra Fadnavis : भुजबळांची फडणवीसांसाठी बॅटिंग की चांगल्या मंत्रिपदासाठी फिल्डिंग?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Wardha Crime : दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
दुचाकीवरून खाली पडलेल्या युवकाच्या अंगावरून बस गेली, वर्ध्यात अंगावर काटा आणणारा अपघात
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
सरकारी नोकरीची संधी, विविध 234 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज, पगार 40 ते 65 हजारांपर्यंत
Embed widget