एक्स्प्लोर

Vinayak Mete यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Vinayak Mete Car Accident : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Vinayak Mete Car Accident : शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यातील रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालक एकनाथ कदम याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच कार चालक एकनाथ कदम याला ताब्यात घेतलं जाणार आहे.

विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट 2022 रोजी पहाटे पाच वाजता मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात झाला होता. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केलं होतं. परंतु तिथे विनायक मेटे यांना मृत घोषित करण्यात आलं. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली होती. तेव्हा प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मेटे यांच्या मृत्युची सखोल चौकशी करण्यात येईल असं जाहीर केलं होतं. तसंच काही दिवसांनी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना या मृत्यूची सीआयडी चौकशी करुन आपला निष्कर्ष सादर करण्याचे आदेश दिले होते.

सीआयडीच्या चौकशीत काय आढळलं?
यानंतर सीआयडी या प्रकरणाची चौकशी करत होती.विनायक मेटे यांची कार ज्या ज्या मार्गावरुन गेली होती तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज सीआयडी तपासत होती. याशिवाय आयआरबीचे इंजिनिअर्स आणि टेक्निकल अभियंते यांचं एक पथक तयार करुन त्यांचं मत जाणून घेण्यात आलं होतं की यामध्ये कोणाची चूक तुम्हाला दिसते?.  सीआयडीने पाहिलेल्या फूटेजमध्ये हा चालक ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचं दिसत होतं. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याच्या थोडा वेळ आधी चालक एकनाथ कदमने उजवा टर्न घेऊन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहित असूनही त्याने ओव्हरटेक केला आणि त्याचा परिणाम डाव्या बाजूला झाला आणि अपघात घडला. सीआयडीच्या तपासात या बाबी समोर आल्यानंतर त्यांनी रसायनी पोलिसांमध्ये विनायक मेटे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.

विनायक मेटे यांच्या भाच्याकडून चालकावर संशय
दरम्यान विनायक मेटे यांचे भाचे बाळासाहेब चव्हाण यांनी मेटेंच्या वाहन चालकावर संशय घेत त्याची चौकशी करण्याची मागणी केली होती. विनायक मेटे यांचा चालक वेगवेगळा जबाब देतोय, असा आरोप मेटेंच्या भाच्याने केला आहे. मेटेंच्या  चालकाने लोकेशन विचारलं त्याने उत्तर दिलं नाही, असा देखील आरोप केला होता. 

सीआयडीच्या चौकशीत विनायक मेटे यांचा कार चालक एकनाथ कदम याच्यावर ठपके ठेवण्यात आला. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. आता लवकरच त्याता ताब्यात घेतलं जाणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Jana Aakrosh Morcha : वाल्मिक कराड किती मोठा गुंड आहे? आम्ही असे लय फोडून काढलेत...Mumbai Jana Aakrosh Morcha : बापू आंधळे ते महादेव मुंडे! भर सभेत वाल्मिक कराडचा इतिहास काढलाABP Majha Marathi News Headlines 2PM TOP Headlines 2 PM 25 January 2025 दुपारी २ च्या हेडलाईन्सMumbai Jana Aakrosh Morcha : पोलिसाने मोहसिनची हत्या केली, मृतदेह जाळला; सर्वात खबळजनक दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Pune Accident News: हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
हिंजवडीच्या भीषण अपघाताचा व्हिडीओ समोर, भरधाव डंपर आडवा होऊन स्कुटीवर पडला, पोरींना सावरायला संधीच मिळाली नाही
Ajinkya Rahane : मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
मुंबई सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा! आऊट झाल्यानंतरही अजिंक्य रहाणे पुन्हा खेळण्यासाठी आला; पण नशीबच फुटके, VIDEO
IPO Update : पैसे तयार ठेवा,आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीचा 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
पैसे तयार ठेवा, पुढील आठवड्यात 3 हजार कोटींचा आयपीओ येणार, गुंतवणूकदारांना कमाईची संधी
Beed News: इकडे पोलिसांचे दोन मोठे निर्णय, तिकडे धनुभाऊंनी जगमित्र कार्यालयात बैठक बोलावली, बीडमध्ये घडामोडींना वेग
इकडे पोलिसांचे दोन मोठे निर्णय, तिकडे धनुभाऊंनी जगमित्र कार्यालयात बैठक बोलावली, बीडमध्ये घडामोडींना वेग
Embed widget