एक्स्प्लोर
Sada Sarvankar vs Amit Thackeray: अर्रर्रर्र... सदा सरवणकर मतदानाला थाटात पोहोचले, पण जॅकेटवर धनुष्यबाणच उलटा लावला
Mahim Vidhan Sabha Constituency: राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी 288 मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान होत आहे.
Mahim Vidhan Sabha Constituency
1/12

या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच मुंबईत मतदानाचा उत्साह पाहायला मिळत आहे.
2/12

मुंबईतील हायव्होल्टेज लढतींपैकी एक असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघातील मनसेचे अमित ठाकरे आणि शिंदे गटाचे सदा सरवणकर आज सकाळी लवकरच मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आले होते.
3/12

दोघेही एकाचवेळी मतदान केंद्रावर जाण्यापूर्वी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी दाखल झाले.
4/12

एकमेकांना पाहिल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले.
5/12

त्यानंतर सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अमित ठाकरे यांना जाहीरपणे शुभेच्छा दिल्या.
6/12

मात्र, यावेळी सदा सरवणकर यांच्या जॅकेटवरील धनुष्यबाणाच्या निशाणीनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.
7/12

सदा सरवणकर यांनी जॅकेटवर लावलेला धनुष्यबाण निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग ठरण्याची शक्यता आहे.
8/12

मात्र, सदा सरवणकर यांनी जॅकेटवर लावलेला धनुष्यबाणही उलटा होता.
9/12

उलटा धनुष्यबाण लावूनच सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
10/12

यावेळी त्यांच्या जॅकेटवरचा धनुष्यबाण उलटा असल्याचं त्यांचेच प्रतिस्पर्धी उमेदवार अमित ठाकरेंच्या लक्षात आलं.
11/12

अमित ठाकरेंनी सरवणकरांना ते तात्काळ सांगितलं आणि धनुष्यबाण सरळ करण्यासाठी मदतही केली.
12/12

तेव्हा सरवणकर यांनी तातडीने धनुष्यबाण सरळ केला. मात्र, तोपर्यंत व्हायची ती शोभा होऊन गेली होती.
Published at : 20 Nov 2024 09:31 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























