Maharashtra Live Updates: 23 नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी आज मतदान
Maharashtra Live Updates: राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.
LIVE

Background
Maharashtra Live Updates: राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (20 डिसेंबर) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. यवतमाळ, वाशीम, बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटण, कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी, नेवासा, फुरसुंगी- उरुळी देवाची, मंगळवेढा, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, बसमत, अनंजनगाव सूर्जी, बाळापूर, देऊळगावराजा, देवळी, घुग्घूस या नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान होणार आहे. तर याशिवाय विविध जिल्ह्यातल्या 76 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या 143 सदस्यपदांसाठीही आज मतदान होणार आहे.
भावाप्रमाणे असणाऱ्या मित्राच्या भेटीसाठी मतदानाच्या दिवशी अभिनेता सोनू सूद कोपरगावात; विजयासाठी दिल्या शुभेच्छा
अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे.अभिनेता सोनू सूद हे आज साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डी येथे आले होते.. दरवेळी शिर्डीत सोनू सूद यांच्या बरोबर असणारे कोपरगाव येथील त्यांचे मित्र विनोद राक्षे आज बरोबर नव्हते.. त्याला कारण म्हणजे विनोद यांच्या पत्नी सुरेखा राक्षे या कोपरगाव नगरपालिकेत नगरसेवक पदाच्या उमेदवार आहेत... भावासारखा मित्र निवडणुकीत व्यस्त असल्याने आपल्या मित्राच्या भेटीसाठी सोनू सूद स्वतः कोपरगावात पोहोचले... मतदान केंद्राजवळ जाऊन उमेदवार सुरेखा विनोद राक्षे आणि विनोद राक्षे यांची भेट घेत त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या
मुंबईत भाजपमध्ये पिंपरी चिंचवडमधुन मोठं इनकमिंग; पिंपरीत भाजपच्या इच्छुकांचे आंदोलन
मुंबई : मुंबईत पिंपरी चिंचवडमधून भाजपमध्ये मोठं इनकमिंग सुरु आहे. दुसरीडके पिंपरी चिंचवड भाजपमधील इच्छुकांनी आंदोलन सुरु केलंय. या इच्छुकांनी थेट बंडाचा इशारा दिलाय. हे प्रवेश म्हणजे आम्हा निष्ठवंतांवर अन्याय करणारे आहेत. आमची फसवणूक होतीये, असं करायचं होतं तर मग 820 जणांचे अर्ज मागवून मुलाखती कशाला घ्यायच्या? अशी खदखद व्यक्त करत या इनकमिंगला इच्छुकांचा विरोध आहे. मात्र हा विरोध झुगारून भाजपने प्रवेश करुन घेतलेत. आता यांना तिकीट दिलं तर आम्ही बंड करणार, असा इशारा या इच्छुकांनी दिलाय.























