एक्स्प्लोर

Maharashtra Guardian Ministers List: नितेश राणे, गणेश नाईक ते प्रताप सरनाईक, शिवेंद्रराजे भोसले...; महाराष्ट्राच्या पालकमंत्र्यांची संभाव्य यादी!

Maharashtra Guardian Ministers List: महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. 

Maharashtra Guardian Ministers List: मंत्रिपदाची खुर्ची मिळण्यासाठी ज्याप्रमाणे रस्सीखेच सुरू होती तशीच शर्यत पालकमंत्रिपदासाठी (Maharashtra Guardian Ministers List) देखील पाहायला मिळतेय. काही जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रिपदावर एकापेक्षा जास्त पक्षाच्या मंत्र्यांनी दावा सांगितल्याने याचे वाटप करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कसरत होणार आहे. सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची यादी तयार, कोण होईल याचा उलगडा दोन दिवसात होईल, अशी माहिती मंत्री संजय शिरसाट यांनी दिली. त्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्र्यांच्या नावाची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान महाराष्ट्राच्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांची संभाव्य यादी समोर आली आहे. 

संभाव्य पालकमंत्र्यांच्या यादीत नागपूरचे पालकमंत्रिपद चंद्रशेखर बावनकुळे, तर ठाण्याचे एकनाथ शिंदे यांना मिळेल. सध्या सर्वांत जास्त चर्चेत असणाऱ्या बीड जिल्ह्याचं पालकमंत्रिपद अजित पवार यांना दिले जाण्याची शक्यता आहे. तर पुण्याचे पालकमंत्रिपद देखील अजित पवारांना मिळेल. 

महाराष्ट्राच्या संभाव्य पालकमंत्र्यांची यादी- (Maharashtra Guardian Ministers List)

नागपूर - चंद्रशेखर बावनकुळे
ठाणे - एकनाथ शिंदे
पुणे - अजित पवार
बीड - अजित पवार
सांगली - शंभूराज देसाई
सातारा - शिवेंद्रराजे भोसले
छत्रपती संभाजी नगर - संजय शिरसाट / अतुल सावे
जळगाव - गुलाबराव पाटील / भाजपाचा देखील दावा आहे
यवतमाळ - संजय राठोड
कोल्हापूर - हसन मुश्रीफ
अहमदनगर - राधाकृष्ण विखे पाटील
अकोला - माणिकराव कोकाटे/ आकाश फुंडकर यांचाही दावा आहे. 
अमरावती - चंद्रकांत पाटील
भंडारा - राष्ट्रवादी 
बुलढाणा - आकाश फुंडकर
चंद्रपूर - नरहरी झिरवळ
धाराशीव - धनंजय मुंडे
धुळे - जयकुमार रावल
गडचिरोली - भाजप
गोंदिया - आदिती तटकरे
हिंगोली - आशिष जैस्वाल
लातूर - गिरीष महाजन
मुंबई शहर - प्रताप सरनाईक
मुंबई उपनगर - मंगलप्रभात लोढा
नांदेड - आशिष शेलार
नंदुरबार - अशोक ऊईके
नाशिक - दादा भुसे / गिरीश महाजन यांचा देखील दावा
पालघर - गणेश नाईक
परभणी - मेघना बोर्डीकर
रायगड - भरत गोगावले / आदिती तटकरे यांचाही दावा कायम
सिंधुदुर्ग- नितेश राणे
रत्नागिरी - उदय सामंत
सोलापूर - जयकुमार गोरे
वर्धा - पंकज भोयर
वाशिम - दत्तात्रय भरणे
जालना - अतुल सावे
लातूर - बाळासाहेब पाटील

भरत गोगावले रायगडेचे पालकमंत्री होणार; महेंद्र दळवींना विश्वास

सध्या रायगडच्या पालकमंत्री पदावरून कोण पालकमंत्री होणार यावरून वादविवाद सुरू आहे. शिवसेनेचे आमदार आणि फडणवीस सरकार मध्ये यंदा मंत्रिपदाची पहिल्यांदा गळयात माळ पडलेले भरत गोगावले हे सुध्दा सुरुवातीपासून रायगडच्या पालकमंत्री पदासाठी कायम इच्छुक राहिलेत मात्र सुनील तटकरे यांचं केंद्रापर्यंत असलेलं वजन पाहता त्यांनी आदिती तटकरे यांच्या गळ्यात ठाकरे सरकार काळात पालकमंत्री पदाची माळ पाडून घेतली होती. त्यानंतर जिल्हयातील शिवसेनेच्या तीनही आमदारांनी बंड पुकारला होता आणि त्यांच्या बंडाला यश देखील आले होते. आणि त्यानंतर रायगडचे पालकमंत्री रत्नागिरी जिल्ह्याच्या उमेदवार असलेले उदय सामंत यांच्या पदरी पडले होते.आता हीच वेळ सरकार मध्ये असुन सुध्दा गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यावर आली असली तरी गोगावले यांनाच वाढता पाठींबा मिळताना पहायला मिळतोय. कारण मंत्री झालेल्या भरत गोगावलेंच्या मदतीसाठी पुन्हा शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांनी उडी घेतली आहे. अलिबाग मुरूड मतदार संघाचे सेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी तर आता खुल चॅलेंज देऊन कोणी पालकमंत्री पदासाठी इच्छुक असेल तर त्यांनी ते प्रयत्न करू नये. कोणत्याही क्षणी भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.यामुळे राजकिय वर्तुळात चर्चा निर्माण झाली आहे.

संबंधित बातमी:

छगन भुजबळ गळ्यात 'अजितपर्व'चं आयडी घालून आले, दोन तासांत माघारी परतले; दादांचा प्रश्न विचारताच एका शब्दात उत्तर दिले!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7 PM 10 March 2025Nagpur goa shaktipeeth expressway : शक्तिपीठ महामार्गाविरोधी पुकारलेलं आंदोलन स्थगित, महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचा जिल्हाबंदीचा इशाराSpecial Report | Mahayuti Vidhan Parishad | दोन आमदार, शंभर दावेदार! विधानपरिषदेसाठी झुंबड, अर्ज आले शंभरABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 6PM 12 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
लग्नानंतर तिसऱ्याच दिवशी हनिमूनच्या रात्री दोघांचाही एक तासात नात्याचा आणि आयुष्याचा शेवट; वर लटकलेला अन् नववधू बेडवर; प्रदीप आणि शिवानीची भयावह कहाणी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
बीडमध्ये आणण्यापूर्वीच खोक्यावर मोठी कारवाई; सतिश भोसले जिल्ह्यातून तडीपार, प्रस्तावास मंजुरी
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे फिरकले नाही; संतोष देशमुख प्रकरणावर अधिवेशनात व्यापक चर्चा नाही
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
नितेश राणेंना मल्हारी पगडी बांधली, पण 'मल्हार' नावाला विरोधच; जेजुरीच्या मार्तंड विश्वस्त मंडळात दोन गट
Temperature Alert: नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
नंदूरबार 40.8 अंशांना टेकलं, नाशकात उष्माघात कक्ष स्थापन, उन्हाच्या तडाख्याने नागरिक हैराण, तुमच्या शहरात किती तापमान?
Udayanraje Bhosale on Nitesh Rane : मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
मी नॉनव्हेज खात नाही, ज्याला खायचं त्यांनी खावं; उदयनराजेंनी मंत्री नितेश राणेंनाही उघडं पाडलं
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
Video : माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही; जयंत पाटलांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
होलिकेच्या राखेचे आध्यात्मिक महत्त्व आणि श्रद्धा!
Embed widget