Sanjay Shirsat Biography : सलग चार वेळा आमदार, शिंदेंच्या बंडाला साथ, मंत्री झालेल्या संजय शिरसाट यांची A टू Z राजकीय कारकीर्द!
Minister Sanjay Shirsat Biography : संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ते औरंगबाद पश्चिमचे आमदार आहेत. 2009 सालापासून ते या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात.
Minister Sanjay Shirsat Biography : : महायुती सरकारची (Mahayut Government) स्थापना झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होतो? याची सर्वांनाच प्रतीक्षा लागली. दरम्यान, आज (15 डिसेंबर) नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीतील अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. यात औरंगबाद पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट (sanjay shirsat) यांचादेखील समावेश आहे. शिरसाट यांनीदेखील आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, त्यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत विकासाची तसेच लोकहिताचीक कोणकोणती कामे केलेली आहेत? त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे, असे विचारले जात आहे. त्यामुळेच संजय शिरसाट यांची राजकीय कारकीर्द जाणून घेऊ या....
संजय शिरसाट यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती. तरीदेखील त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले. ते सर्वप्रथम 2000 साली छत्रपती संभाजीनगर महापालिकेत नगरसेवक झाले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. 2001 साली ते छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे सभागृहनेता झाले.
2009 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली
त्यानंतर 2009 साली त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी दमदार विजय मिळवला. आणि ते 2009 साली पहिल्यांदा संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघातून आमदार झाले. त्यानंतर त्यांनी 2014 सालचीदेखील निवडणूक लढवली. या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवत ते दुसऱ्यांदा संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघातून आमदार झाले. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी निवडणूक जिंकत आमदारकी मिळवली. ते तिसऱ्यांदा संभाजीनगर (पश्चिम) मतदारसंघातून आमदार झाले.
औद्योगिक विकास महामंडळ अध्यक्षाचे अध्यक्षपद भूषवलं
आमदारकी मिळाल्यानंतर त्यांनी 2014 साली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अध्यक्षाचे अध्यक्षपद भूषवले. शिवसेना पक्षाचे विभाजन झाल्यानंतर शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्यांना 2024 सालच्या विधानसभा निवडणुकीत संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघातून तिकीट दिले. त्यांनी या निवडणुकीतही विजयी कामगिरी करून दाखवली.
शिंदेंच्या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी प्रयत्न पण...
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर शिरसाट यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. शिंदे यांच्या बंडावेळी सर्वप्रथम शिरसाट हेच माध्यमांसोर आले होते. या पक्षफुटीनंतर शिंदे यांनी भाजपासोबत युती करून सरकारची स्थापना केली होती. यात एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद आले. शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळावे यासाठी शिरसाट यांनी प्रयत्न केले होते. मात्र त्यावेळी त्यांना संधी मिळाली नाही. मात्र यावेळी शिंदे यांनी शिरसाट यांची दखल घेतली असून त्यांना मंत्रिपद मिळाले आहे.
हेही वाचा :