Narendra Bhondekar : मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी, शिवसेनेत पहिला राजीनामा पडला, नरेंद्र भोंडेकरांचा मोठा निर्णय, सेनेतील पदं सोडली
Narendra Bhondekar : नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपद न मिळाल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी शिवसेनेतील विविध पदांचा राजीनामा दिला आहे.
भंडारा/ नागपूर : मंत्रिपद नं मिळाल्यानं नाराज असलेल्या भंडारा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार भोंडेकरांनी शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, शपथविधी थोड्या वेळानं होणार आहे,त्यापूर्वी नाराजी नाट्य पाहायला मिळालं आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्याकडे असलेल्या उपनेते पदाचा आणि पूर्व विदर्भ समन्वयक पदाचा राजीनामा दिलेला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी त्यांच्या आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही. एकनाथ शिंदे भोंडेकरांच्या निर्णयावर काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.
शिवेसना आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मंत्रिपद नं मिळाल्यानं नाराज होत शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या तोंडावर भोंडेकर यांनी निवडणूक अपक्ष लढण्याची तयारी दर्शविली होती. त्यानंतर त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती केली होती. निवडणुकीदरम्यान एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर यांना मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र, आता मंत्री मंडळात त्यांना स्थान नं मिळाल्याने भोंडेकर यांनी त्यांच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
शिवसेनेने त्यांना मंत्री न केल्यामुळे पक्षाच्या विविध पदांचा राजीनामा दिला आहे. पक्षाचं पूर्व विदर्भ समन्वयकाचा पद त्यांच्याकडे होतं त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोबतच शिवसेनेच्या उपनेते पदाचा राजीनामाही त्यांनी दिला आहे. नरेंद्र भोंडेकर यांनी आमदारकीचा राजीनामा दिलेला नाही.
शिवसेनेतील आज शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी
1. उदय सांमत
2. प्रताप सरनाईक
3. शंभूराज देसाई
4. योगश कदम
5. आशिष जैस्वाल
6. भरत गोगावले
7. प्रकाश आबिटकर
8. दादा भूसे
9. गुलाबराव पाटील
10. संजय राठोड
11. संजय शिरसाट
तीन मंत्र्यांचा पत्ता कट
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांना डच्चू दिला आहे. त्यामध्ये दीपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांच्या नावाचा समावेश आहे.
शिवसेनेतही अडीच वर्ष मंत्रिपदं
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत देखील अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवण्यात येणार आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसाठी अडीच वर्षांचा फॉर्म्युला राबवण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणं एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मंत्री होणाऱ्या आमदारांना सूचना दिली आहे. अडीच वर्ष झाल्यानंतर राजीनामा देण्याबाबत एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्री होणार मंत्र्यांकडून शपथपत्र लिहून घेतलं जाणार आहे. सगळ्यांकडून अडीच वर्षांच्या मंत्रिपदांबाबत लिहून घेतलं गेल्यानं पुन्हा काही अडचण होणार नाही याची दक्षता पक्षनेत्तृत्त्वाकडून घेतली जात आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 12 मंत्रिपदं मिळाली आहेत.
इतर बातम्या :
आज शपथ घेणाऱ्या मंत्र्यांना अडीच वर्षेच संधी; अजित पवारांची तुफान फटकेबाजी, महामंडळावरही भाष्य