एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion: शिवसेना फुटली, छगन भुजबळांचं बंड अन्...; 1991 मध्ये नागपुरात झालेल्या शपथविधीचा इतिहास, 33 वर्षांनंतर आज पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार

Maharashtra Cabinet Expansion: 21 डिसेंबर 1991 मध्ये उपराजधानी नागपुरात मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला होता.

Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. दुपारच्या सुमारास नागपुरातील राजभवनात शपथविधी सोहळा होईल. 1991 मध्ये मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात झाला होता. 1991 ला ज्यावेळी शिवसेना फुटली, त्यानंतर छगन भुजबळ गटाने बंड करत काँग्रेस सोबत शपथ घेतली. 33 वर्षानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा (Maharashtra Cabinet expansion) कार्यक्रम हा नागपुरात होणार आहे. 1991 च्या नागपुरात झालेल्या शपथविधी सोहळ्यात नेमकं काय घडलं होते, जाणून घ्या...

1991 च्या नागपुरात झालेल्या शपथविधी सोहळ्याची रंजक आणि खास माहिती

21 डिसेंबर 1991 मध्ये उपराजधानी नागपुरात मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला होता. तेव्हा एकटे छगन भुजबळ यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली होती.. तर वसुधा देशमुख, राजेंद्र गोडे, भरत बाहेकार, शंकर नम, जयदत्त क्षीरसागर आणि शालिनी बोरसे या सहा उपमंत्र्यांनी (राज्य मंत्री नाही) शपथ घेतली होती. या शपथविधी सोहळ्याच्या दोनच दिवसांपूर्वी म्हणजेच नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना छगन भुजबळ त्यांच्या 11 सहकारी आमदारांसह शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये आले होते. तेव्हा भुजबळ आणि त्यांच्या  सर्व सहकाऱ्यांना मंत्रिमंडळात घेतले जाईल अशी चर्चा होती.. मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करण्यासाठी सुधाकरराव नाईक 19 डिसेंबरच्या रात्री उशिरा नागपुरातून हिवाळी अधिवेशन सोडून दिल्लीला गेले होते. 20 डिसेंबरच्या सकाळी दिल्लीतून ते थेट मुंबईला परतले होते. 20 डिसेंबरच्या दुपारी सुधाकरराव नाईक यांनी तत्कालीन राज्यपाल श्री सुब्रमण्यम यांना नव्या मंत्र्यांची यादी मुंबईत सोपवली होती.

एक कॅबिनेट मंत्री आणि सहा उपमंत्री यांना दिली गेली होती शपथ-

20 डिसेंबरच्या रात्री उशिरा सुधाकरराव नाईक यांनी नागपुरात येऊन आपण छगन भुजबळ आणि काही उपमंत्र्यांना मंत्रिमंडळात घेत आहोत असे पत्रकारांसमोर जाहीर केले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच 21 डिसेंबरला तत्कालीन राज्यपाल सी. सुब्रमण्यम हे तातडीने मुंबईवरून नागपूरला आले होते. दिवसभर अधिवेशनाचा कामकाज चालल्यानंतर संध्याकाळी अधिवेशन संपुष्टात आल्यानंतर साडेचार वाजता नागपूरातील राजभवनात एक कॅबिनेट मंत्री आणि सहा उपमंत्री यांना शपथ दिली गेली होती. त्या मंत्रिमंडळ विस्तारामुळे तेव्हाचे सुधाकरराव नाईक यांच्या सरकारचे मंत्रिमंडळ त्रिस्तरीय ( कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, उपमंत्री) झाले होते.

विशेष माहिती - स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासात नागपुरात दोनच वेळेला शपथविधी सोहळा पार पडला आहे.

1) 21 डिसेंबर 1991 मध्ये सुधाकर राव नाईक यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार सोहळा...

2) उद्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा..

मात्र महाराष्ट्राच्या निर्मिती पूर्वी म्हणजेच 1952 मध्ये वसंतराव नाईक यांचा नागपूर येथे तत्कालीन मध्य प्रांत च्या सरकारमध्ये उपमंत्री म्हणून छोटा शपथविधी सोहळा पार पडला होता. (म्हणजेच नागपुरातला हा तिसरा मंत्रिमंडळ शपथविधी सोहळा आहे.. तर 1960 मध्ये स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतरचा दुसरा शपथविधी सोहळा आहे..)

Nagpur Shapathvidhi History | नागपूरमधल्या शपथविधीचा इतिहास काय? उद्या नव्या सरकारचा शपथविधी, VIDEO:

संबंधित बातमी:

उदय सामंत, दादा भुसे ते प्रताप सरनाईक, भरत गोगावले; मंत्रिमंडळासाठी एकनाथ शिंदेंची टीम तयार, पाहा आज शपथ घेणाऱ्यांची यादी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Shiv Sena UBT : स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bajrang Sonawane Full PC : 'ही' उत्तरं पंकजा मुंडेंकडून अपेक्षित नाही, बीड प्रकरणावरुन हल्लाबोल!Saif Ali Khan Attacked : सैफवरील हल्ल्यानंतरचा पहिला मोठा व्हिडीओ, पाहा EXCLUSIVE CLIPSaif Ali Khan Attacked : सैफवर प्राणघातक हल्ला, मानेवर 10 सेंटीमीटरची जखम,पाठीतही वारABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 16 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्स-

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव ? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
वाल्मिक कराडांमुळे कोंडी अन् राजीनाम्याचा दबाव? धनंजय मुंडे परळीत वैजनाथाच्या दर्शनाला
Stock Market : सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेल्या कंपनीला 960 कोटींची ऑर्डर, अपडेट येताच शेअर बनला रॉकेट
960 कोटींची ऑर्डर मिळताच शेअर बनला रॉकेट, सचिन तेंडुलकरनं देखील केलीय गुंतवणूक
Shiv Sena UBT : स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
स्वबळाची घोषणा दिलेल्या नागपुरातूनच नाराजीचा सूर; जिल्हाप्रमुख म्हणाले, पक्ष उद्धवसाहेब चालवतात की संजय राऊत?
Lamborghini in Mantralaya : मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
मंत्रालयातील 'त्या' लॅम्बोर्गिनीबाबत मंत्री विखे पाटील पहिल्यांदाच बोलले; रोहित पवारांवर जोरदार पलटवार
Pankaja Munde: 'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
'बीडचा विकास बारामतीसारखा करणार...', पंकजा मुंडेंकडून अजितदादांचं तोंडभरून कौतुक
Mutual Fund : एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
एकाचवेळी 500000 गुंतवल्यास दीड कोटींचा कॉर्पस कसा तयार होईल? जाणून घ्या समीकरण
Saif ali khan attack in Mumbai: सैफ अली खानच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढलं, थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टर काय म्हणाले?
सैफ अली खानच्या मणक्यातून सुऱ्याचं अडीच इंची पातं बाहेर काढलं, थोरॅसिक स्पायनल कॉडला दुखापत, डॉक्टर काय म्हणाले?
Saif Ali Khan Attack : हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
हा एक संकेत समजा, सरकारनं पण ध्यानात ठेवावं; सैफवरच्या हल्ल्यानंतर महाराष्ट्र करणी सेनेच्या प्रमुखाचं खळबळजनक वक्तव्य
Embed widget