एक्स्प्लोर

Maharashtra Cabinet Expansion: नितेश राणेंपासून पंकजा मुंडे, गणेश नाईकांपर्यंत...एका नावाने सर्व आर्श्चयचकित, भाजपकडून मंत्रिपदासाठी कोणा कोणाला फोन?

Maharashtra Cabinet Expansion: भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती समोर येत आहे.

Maharashtra Cabinet Expansion: महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज (15 डिसेंबर) पार पडणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता हा शपथविधी सोहळा होईल. मंत्रिमंडळात भाजपचे 21 शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे 10 मंत्री असणार आहेत. त्यापैकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शपथ घेतलीय. त्यामुळे आता भाजपचे 20, शिवसेनेचे 11 तर राष्ट्रवादीचे 9 आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना फोन करण्यास सुरुवात केली आहे. 

भाजपकडून संभाव्य मंत्र्यांना फोन जाण्यास सुरुवात झाली आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितेश राणे, शिवेंद्रराजे भोसले, मंगलप्रभात लोढा, पंकज भोयर, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे यांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती समोर आली आहे.  विशेष म्हणजे वर्धामधील आमदार पंकज भोयर यांना देखील मंत्रि‍पदाची लॉटरी लागणार आहे. आतापर्यंत भाजपच्या संभाव्य मंत्रि‍पदाच्या यादीत पंकज भोयर यांचं नाव समोर आलं नव्हतं. मात्र आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकज भोयर यांना मंत्रि‍पदासाठी फोन केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे सर्वांना आर्श्चयाचा धक्का बसला. 

भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन-

भाजपकडून 19 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन केल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे फोन करत आहेत. त्यामुळे भाजपचे मुख्यमंत्री आणि आज शपथ घेणारे 19 लोक असे 20 मंत्री राहतील. अजित पवार यांचे आज 9 मंत्री शपथ घेतील. (अजितदादा धरून राष्ट्रवादीचे 10 मंत्री होतील), तर एकनाथ शिंदे यांचे 11 मंत्री आज शपथ घेतील.(एकनाथ शिंदे यांना धरून शिवसेनेचे 12 मंत्री होतील..) काही जुन्या मंत्र्यांना वगळून त्यांच्या ऐवजी नव्या दमाच्या आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली जात असल्याची माहिती आहे. भाजपचे 20 शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 10 असे 42 मंत्री आता मंत्रिमंडळात राहतील. तर 1 जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत भाजपकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन-

नितेश राणे 
शिवेंद्रराजे भोसले 
चंद्रकांत पाटील 
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा 
गिरीश महाजन 
जयकुमार रावल 
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे, 
अतुल सावे

आतापर्यंत शिवसेनेकडून कोणा कोणाला मंत्रि‍पदासाठी फोन-

भरत गोगावले
उदय सामंत 
प्रताप सरनाईक 
योगेश कदम
आशिष जैस्वाल
गुलाबराव पाटील 
शंभूराजे देसाई
प्रकाश आबीटकर
संजय राठोड

मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात, VIDEO:

संबंधित बातमी:

उदय सामंत, दादा भुसे ते प्रताप सरनाईक, भरत गोगावले; मंत्रिमंडळासाठी एकनाथ शिंदेंची टीम तयार, पाहा आज शपथ घेणाऱ्यांची यादी!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का
हिटमॅन आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी, रोहित शर्मा बाद होताच मुंबईला मोठा धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chandrashekhar Bawankule Uddhav Thackeray बिनडोक राजकारणी;त्यांच्यामुळे गद्दारीचं गालबोटसकाळी ११ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 24 January 2025ST Fare hike : ST ची आजपासून भाडेवाढ, परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांचा मोठा निर्णयNalasopara : अनधिकृत इमारतीवर कारवाई, रहिवाश्यांना बांबू, चादरी टाकून राहण्याची वेळ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
महाराष्ट्राच्या कन्येची उत्तुंग झेप; कर्तव्यपथावर बीडच्या कन्या फ्लाईट लेफ्टनंट दामिनी देशमुख करणार वायुसेनेच्या तुकडीचे नेतृत्व
Raj Thackeray : तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असताना राज ठाकरे अचानक मुंबईला परतणार; नेमकं कारण काय?
ST Fare Hike : एसटीला दररोज तीन कोटींचा तोटा, भाडेवाढ अपरिहार्य, प्रताप सरनाईक यांनी वाचला कारणांचा पाढा
एसटीची भाडेवाढ आजपासूनच, टॅक्सी अन् रिक्षाची भाडेवाढ कधीपासून लागू, प्रताप सरनाईक यांनी तारीख सांगितली
Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का
हिटमॅन आक्रमक सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात अपयशी, रोहित शर्मा बाद होताच मुंबईला मोठा धक्का
Sanjay Raut : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार, संजय राऊतांचा मोठा दावा, म्हणाले, शिंदेंच्या पक्षातील...
Bank Holidays February: फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
फेब्रुवारीत बँका 14 दिवस बंद राहणार, बँकांमधील कामाचं नियोजन करण्यापू्र्वी जाणून घ्या संपूर्ण यादी
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
FIR Against Shreyas Talpade: अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
मोठी बातमी! अभिनेता श्रेयस तळपदे विरोधात FIR; मल्टी लेवल मार्केटिंगचं प्रकरण, कोट्यवधींची झालीय फसवणूक
Embed widget