एक्स्प्लोर

Sanjay Raut : नाना पटोलेंच्या लेटर बॉम्बने मविआत नाराजीनाट्य; संजय राऊत म्हणाले; हा औपचारिकपणा...

Maharashtra Assembly Elections 2024 : जागावाटपाचा अंतिम निर्णय झालेला नसतानाही शिवसेनेने उमेदवार जाहीर करणे योग्य नाही, अशा आशयाचे पत्र नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना पाठवले आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाली असून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अद्यापही जागा वाटपावरून तिढा असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच शिवसेना ठाकरे गटाने थेट उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांना पत्र लिहिल्याची माहिती मिळत आहे. मुंबईसह विदर्भ मिळून 12 जागा काँग्रेसला सोडण्यात याव्यात. जागावाटपाच्या चर्चेत या जागा कुणी लढवायच्या याचा अंतिम निर्णय झालेला नसतानाही या जागांवर शिवसेनेने उमेदवार जाहीर करणे योग्य नाही, अशा आशयाचा मजकूर या पत्रात असल्याची सूत्रांची माहिती आहे. या पत्रामुळे उद्धव ठाकरे नाराज झाल्याचेही समजते. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

संजय राऊत म्हणाले की, निवडणूक काळात असा पत्र व्यवहार होत असतो. आजकाल ई-मेलचा वापर होत असला तरी आपापसात असा पत्रव्यवहार होतो. नाराजी व्यक्त केली याचा अर्थ ते संन्यास घेऊन बाहेर गेले असा अर्थ होत नाही. नाना पटोले यांच्याशी माझा चांगला संवाद सुरू आहे. कालच त्यांची आणि माझी चर्चा झाली आहे. 

लेटरबॉम्ब हा औपचारिकपणा 

आम्ही एका जागेची अदलाबदल केली आहे. आत्ताच पाच मिनिटांपूर्वी देखील चर्चा झाली. लेटरबॉम्ब वगैरे हा औपचारिकपणा असतो. मीही जयंतरावांना अनेकदा पत्र पाठवतो. पत्र यासाठी पाठवायचे असते की, आपल्यासमोर चर्चा करण्यासाठी एक कागद राहतो. आता आमच्या सगळ्यांचे वय झाले आहे. कागद समोर असला की चर्चा होते, असे मिश्कील वक्तव्य त्यांनी यावेळी केले. 

संजय राऊतांचा सरन्यायाधीशांवर निशाणा 

महाविकास आघाडीतील नाराजी आता कागदावर समोर येत आहे. आगामी काळात पुरावे म्हणून हे वापरले जाऊ शकतात असे विचारले असतात संजय राऊत म्हणाले की, कोर्टात पुरावे चंद्रचूर यांच्यासमोर टिकत नाही. सरन्यायाधीश पुरावे मानायला तयार नाहीत. तर तुम्ही कोणत्या पुराव्याच्या गोष्टी करत आहात. अपात्रतेसंदर्भात पुरावे समोर असून देशाचे सरन्यायाधीश ते मानायला तयार नाहीत. शरद पवारांसारखा भक्कम पुरावा समोर असताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना देतात, असा म्हणत त्यांनी सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यावर निशाणा साधला.

राहुल गांधींना चर्चा करायची असती तर...

महाविकास आघाडीत काँग्रेसला अधिक जागा मिळाल्या नाहीत म्हणून राहुल गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांना मी ओळखतो. राहुल गांधींनी त्यांच्या पक्षाच्या बैठकीत काही भूमिका मांडली असेल तर त्याला मी नाराजी म्हणत नाही. तीनही प्रक्ष या महाराष्ट्रात तोलामोलाचे आहे. हे राहुल गांधींना माहित आहे. राहुल गांधींना चर्चा करायची असती तर त्यांनी आमच्या दोन्ही पक्षांची चर्चा केली असती. राहुल गांधी यांच्याबाबत बाहेर आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यावर विश्वास ठेवू नका, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

आणखी वाचा 

...तर कोणती महिला राजकारणात येईल? नातीच्या वयाच्या मुलीबद्दल असं बोलणं शोभतं का?, जयश्री थोरांतचा संताप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? सदा सरवणकर पहिल्यांदाच बोलले!Israel Iran  Special Reportइस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणमधल्या तीन प्रांतावर मोठा हल्लाAmit Thackeray Mahim Special Report : माहीमबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?Shiv sena Vs NCP Politics : 2 राष्ट्रवादी विरुद्ध 2 शिवसेना; राज्यात राजकीय महाभारत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Embed widget