एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

'मविआचं सरकार आल्यास आम्ही जेलमध्ये असू, मी बॅग भरुन ठेवलीय...'; नितेश राणेंचं विधान

Nitesh Rane On Mahavikas Aghadi: मी पुन्हा भाजपला निवडून आणण्याचा निर्धार करुन बाहेर पडलोय, असं नितेश राणे यावेळी म्हणाले. 

Nitesh Rane सांगली: सांगलीमधील विटामध्ये भाजपचे नेते पंकज दबडे यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला आमदार नितेश राणे (Nitesh Rane), आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar),  आमदार सदाभाऊ खोत एकत्र आले होते.  यावेळी नितेश राणे,  गोपीचंद पडळकर यांनी विविध मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. तसेच आगामी विधानसभेच्या निवडणुकीत चुकून महाविकास आघाडीचे सरकार आले, तर आम्ही जेलमध्ये असू, असं विधान नितेश राणे यांनी केलं आहे.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार आले तर आम्हाला हे लोक बाहेर ठेवणार नाही. मला तर पहिल्या 100 दिवसातच आतमध्ये टाकतील. चुकून मविआचे सरकार आले तर आम्ही जेलमध्ये असू , आम्ही 6 महिन्यातच कोल्हापूरच्या जेलमध्ये  गोट्या खेळत असू, असं नितेश राणे म्हणाले. तसेच मी बॅग भरून ठेवली आहे, पण मी पुन्हा भाजपला निवडून आणण्याचा निर्धार करुन बाहेर पडलोय, असं नितेश राणे यावेळी म्हणाले. 

2029 ला शरद पवारांचा पक्ष राहणार नाही- गोपीचंद पडळकर

शरद पवार यांच्या पक्षात जे प्रवेश करत आहेत त्यांची तर आता कीव वाटतेय. कारण 2024ची निवडणूक ही शरद पवारांच्या पक्षाची शेवटची निवडणूक आहे. 2029 ला शरद पवारांचा पक्षच राहणार नाही, मग आज पवारांच्या पक्षात जात असलेले 2029 नंतर मग कोणत्या पक्षात जाणार?, याचा त्या लोकांनी आधी विचार करावा, असा टोला भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे. जातीय तेढ, जातीयवाद यापासून महाराष्ट्रला वाचवण्याची वेळ आलीय. कोलांट्याउड्या घेण्यामध्ये सुवर्णपदक द्यायची जर वेळ आली तर यासाठी जगात एकमेव नाव शरद पवारांचे आहे. कारण पवारांनी इतक्या कोलांट्यउड्या त्यांच्या राजकारणामध्ये आतापर्यंत घेतल्या आहेत असेही गोपीचंद पडळकर म्हणाले. 

देवेंद्र फडणवीस यांची आज वेळ खराब असेल, नशीब नाही- गोपीचंद पडळकर

महाविकास आघाडीमधील जो-तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडतायत. पण देवेंद्र फडणवीसांची आज वेळ खराब असेल, नशीब नाही. जरा वेळ जाऊ द्या...ऊठसूट ज्या भानगडी सुरु आहेत, त्या बंद होतील असा इशारा भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हा या भागातील टँकरचे  मोर्चे संपले, चारा छावणीची मागणी संपली. कारण केंद्रातून आणि राज्यातून एका वेळी 50 हजार कोटी महाराष्ट्रच्या योजनाना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मिळवून दिले असे पडळकर म्हणालेत. तसेच महायुती सरकार विविध योजना आणत असतांना कॉंग्रेस लाडकी बहीण योजना बंद करा म्हणतेय. कारण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पायाखलीची वाळू सरकली आहे, असा निशाणा देखील गोपीचंद पडळकर यांनी साधला. 

संबंधित बातमी:

Kangana Ranaut Meet J P Nadda : कंगनाच्या बेताल वक्तव्यावर भाजप नेतृत्व नाराज? नड्डांनी केली कानउघाडणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरूABP Majha Headlines | Maharashtra Election Result | एबीपी माझा हेडलाईन्स | 6AM Headlines 20 NOV 2024Zero Hour Vidhan Sabha Result |  माहिममध्ये अमित ठाकरे की  सदा सरवणकर कोण बाजी मारणार?Zero Hour Maha Exit Poll : मतदान संपलं, निकालाची धाकधूक वाढली, प्रवक्त्यांना काय वाटतं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
सुरुवातीच्या कलांमध्ये पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, देखमुख बंधूंसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर, धक्कादायक निकाल येण्याची शक्यता
Maharashtra vidhan sabha election results: महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
महायुतीने मॅजिक फिगर गाठला, पण काँटे की टक्कर; पहिल्या फेरीत भाजपच मोठा भाऊ, पाहा आकडेवारी
Maharashtra Election Results 2024 : महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
महाराष्ट्रातील पहिला विजय जवळपास निश्चित, वडाळ्यात झेंडा फडकणार!
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
नाशिकमध्ये निकालाआधीच खासगी विमानं तैनात, महाविकास आघाडीकडून फुटाफुटी टाळण्यासाठी मोठी खेळी
Shivsena Thackeray Vs Shinde Camp: एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
एकनाथ शिंदेचे सुरतला नेलेले 40 आमदार तरी निवडून येणार का? उद्धव ठाकरेंना मोठं यश
Mumbai Vidhan Sabha Result 2024: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? महायुती आघाडीवर, मविआ टेन्शनमध्ये
मोठी बातमी: पहिल्या तासाभरात मुंबईत कोण आघाडीवर? भाजप-शिंदे गटाची मोठी आघाडी, मविआ टेन्शनमध्ये
Amit Thackeray: अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
अमित ठाकरे सगळ्यांचे अंदाज चुकवणार? मतमोजणी सुरु होताच माहीम मतदारसंघात चमत्कार
Maharashtra Election Result :  महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
महाविकास आघाडीचे शतक पूर्ण, अनेक दिग्गज आघाडीवर
Embed widget