![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kangana Ranaut Meet J P Nadda : कंगनाच्या बेताल वक्तव्यावर भाजप नेतृत्व नाराज? नड्डांनी केली कानउघाडणी
Kangana Ranaut Meet J P Nadda : कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर शेतकरी संघटना आणि विरोधकांनी तिच्यावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कंगनाच्या वक्तव्यावर भाजप नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे.
![Kangana Ranaut Meet J P Nadda : कंगनाच्या बेताल वक्तव्यावर भाजप नेतृत्व नाराज? नड्डांनी केली कानउघाडणी Kangana Ranaut meets BJP national President J P Nadda after controversial statement on Farmers protest Haryana Assembly Election Kangana Ranaut Meet J P Nadda : कंगनाच्या बेताल वक्तव्यावर भाजप नेतृत्व नाराज? नड्डांनी केली कानउघाडणी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/30/864432f280d14eab36e17763b6ebdd021724985691005290_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kangana Ranaut Meet J P Nadda : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतला (Kangana Ranaut) चांगलीच महागात पडले आहे. कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर शेतकरी संघटना आणि विरोधकांनी तिच्यावर आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. कंगनाच्या वक्तव्यावर भाजप नेतृत्वाने नाराजी व्यक्त केली आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी खासदार, अभिनेत्री कंगनाला भेटण्यास बोलावले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नड्डा आणि रणौत यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीपूर्वी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी नड्डा हरियाणा कोअर ग्रुपच्या बैठकीत उपस्थित राहिले. कंगनाच्या या वक्तव्यावर त्यांनी तिची कानउघडणी केली असून विचार न करता बोलण्यास मनाई केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कंगनाने घेतली नड्डांची भेट...
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी कंगना राणौतशी सुमारे अर्धा तास चर्चा केली. याबाबत अधिकृतपणे तपशील समोर आला नाही. नड्डा यांनी कंगनाला वाद निर्माण होतील असे वक्तव्य करण्यास मनाई केली असल्याचे सांगितले. नड्डा यांच्यासोबतची भेट ही कंगनासाठी इशारा असल्याचे म्हटले जात आहे.
कंगनाच्या वक्तव्याशी फारकत...
हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीच्या सीमेवर झालेल्या शेतकरी आंदोलनात पंजाबसोबत हरियाणातील शेतकऱ्यांचा लक्षणीय समावेश होता. कंगनाने शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे. हरियाणात विधानसभा निवडणुका आहेत. कंगनाच्या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेल्या संतापाचा फटका निवडणुकीत बसण्याची धास्ती भाजपला आहे. त्यामुळेच कंगनाच्या वक्तव्याशी काहीही संबंध नसल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.
हरियाणा निवडणुकीची भाजपला धास्ती...
ऑक्टोबरमध्ये हरियाणा विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे कंगनाने वक्तव्य या निवडणुकीत भाजपसाठी नुकसानकारक ठरू शकते. 2024 मध्ये लोकसभा निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ घटून 5 पर्यंत आले. त्याशिवाय, काँग्रेसने राज्यात आपल्या मतांची टक्केवारी ही 28 टक्क्यांवरून 43 टक्क्यांवर नेण्यात यश मिळवले. त्यामुळे हरियाणातील या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
इतर संबंधित बातमी :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)