एक्स्प्लोर

Madha Vidhansabha : माढ्यातून शरद पवारांच्या मनात नेमकं कोण? इच्छुकांच्या गर्दीनं राजकीय मैदान तापलं, तुतारी मिळवण्यासाठी धडपड

महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वात जास्त चर्चा ही माढा विधानसभेची (Madha Vidhansabh) सुरु झाली आहे.  या मतदारसंघात इच्छुकांचे मोठे पीक आले असून सर्वच उमेदवार तुतारी मिळवण्यासाठी धडपड करु लागलेत.

Madha Vidhansabha Election : सध्या महाराष्ट्रात (Maharashtra) सर्वात जास्त चर्चा ही माढा विधानसभेची (Madha Vidhansabh) सुरु झाली आहे.  या मतदारसंघात इच्छुकांचे मोठे पीक आले असून सर्वच उमेदवार तुतारी मिळवण्यासाठी धडपड करु लागलेत. उमेदवारी कोणाला द्यायची हे ठरवणे खुद्द शरद पवार  (Sharad Pawar) यांनांही डोकेदुखी ठरणार आहे. कारण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणारे अनेकजण शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

माढा विधानसभेचे गेले 30 वर्षे बबनदादा शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. पण राज्यातील बदललेल्या घडामोडीनंतर शरद पवारांशी एकनिष्ठ असणाऱ्या आमदार बबनदादा शिंदे यांनी अजितदादा यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर बबनदादा शिंदे यांना मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माढा मतदासंघात तुतारीला 52 हजारांचे लीड मिळाले. मनोज जरांगे यांच्य आंदोलनाचा देखील मोठा फटका सत्ताधाऱ्यांना या मतदारसंघात बसला आहे. प्रत्येकवेळी किमान 50 ते 70 हजार मतांच्या फरकाने जिंकणाऱ्या बबनदादा शिंदे यांना हा मोठा धक्का होता.  त्यामुळेच त्यांनी लोकसभेतील पराभवानंतर आपला मुलगा रणजित शिंदे यांच्या समवेत शरद पवार यांच्या गाठी भेटही सुरु केल्या  यावेळी आपण निवडणूक न लढवता आपला मुलगा रणजित शिंदे यांना उभे करण्याचे आमदार शिंदे यांनी घोषित केले आहे. 

माढा मतदारसंघात उजनीचे पाणी आल्यानं ऊस क्षेत्रात वाढ

माढा हा दुष्काळी तालुका अशी ओळख असणारा मतदारसंघ होता. मात्र, बबनदादा शिंदे सुरुवातीच्या काळात मंत्रिपद नाकारून आपल्या भागाला उजनीचे पाणी आणले आहे.   राज्यातील सर्वात जास्त गाळप करणारा साखर कारखाना देखील याच शिंदे यांचा असून तोही माढा तालुक्यात आहे. पाण्यासोबत टेंभूर्णी आणि कुर्डुवाडी येथे एमआयडीसी आणून त्यांनी उद्योग आणले. आता तिसरी एमआयडीसी देखील मोडनिंब येथे मंजूर करून घेतली. ऊसाप्रमाणेच माढ्यात शिंदे यांनी दुधाचा जोडधंदा शेतकऱ्यांना दिल्याने कोरडवाहू माढा आता ऊस आणि दुधासाठी प्रसिद्ध झाला आहे. 

माढा मतदारसंघातून हे उमेदवार इच्छुक

लोकसभेला 52 हजाराच्या लीडमुळे आता तुतारी घेण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.  यात शिवतेसिहं मोहिते पाटील, शिवाजी कांबळे, अभिजित पाटील, संजय कोकाटे, धनराज शिंदे, माढ्याच्या नगराध्यक्ष मीनल साठे , संजय पाटील घाटणेकर, नितीन कापसे,  असे अनेक दिग्गज रिंगणात उतरले आहेत  त्यातच आता परिचारक गटाने उमेश परिचारक यांनी माढातून निवडणूक लढवण्याचा आग्रह सुरु केल्याने शिंदे याना हा धक्का असणार आहे. पंढरपूर तालुक्यातील 42 गावात जवळपास सव्वा लाख मतदान असून या भागात परिचारक गटाची मोठी ताकद आहे. याशिवाय माळशिरस तालुक्यातील गावात परिचारक यांचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना असल्याने आम्ही माढा जिंकून दाखवू असा विश्वास परिचारक समर्थकांना आहे. जिल्ह्याच्या राजकारणात परिचारक व शिंदे हे कायम एकत्र राहिल्याने अद्याप उमेश परिचारिकांनी समर्थकांच्या मागणीवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही . 

अजित पवार यांच्या दौऱ्यात रणजित शिंदे अनुपस्थित

अजित पवार गटाचे सत्ताधारी आमदार बबनदादा शिंदे यांनाही आपल्या मुलासाठी तुतारी घ्यायची आहे. त्यामुळेच दोन दिवसापूर्वी अजितदादा यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत बबनदादा शिंदे होते, मात्र, यंदा विधानसभा लढवणारे त्यांचे पुत्र रणजित शिंदे मात्र गायब असल्याने पुन्हा जोरदार चर्चेस सुरुवात झाली आहे. त्यामुळेच अखेर बबनदादा सांगतील त्या उमेदवारास विजयी करण्याचे आवाहन करण्याची वेळ अजितदादा यांचेवर आली होती. सध्या रणजित शिंदे यांनीही जोरदार प्रचाराचा धडाका लावला असताना शिंदे कुटुंबातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. रणजित शिंदे  त्यांचे चुलत बंधू  आणि पंचायत समिती सदस्य धनराज शिंदे यांनीही आपण यंदा निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केल्याने माढ्यासाठी तुतारीला अजून एक स्पर्धक उतरला आहे. 

मोहिते पाटील यांना आता माढा विधानसभा जिंकण्याचे वेध

माढा लोकसभा जिंकल्यापासून मोहिते पाटील यांना आता माढा विधानसभा जिंकण्याचे वेध लागले आहेत. यासाठी शिवतेजसिंह मोहिते पाटील हे सध्या माढ्यातून तुतारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. यातच विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि तरुणात लोकप्रिय असणारे अभिजित पाटील यांनी तर निवडणूक घोषित होण्यापूर्वीच आपल्या प्रचाराचा पहिला दौरा पूर्ण करीत आणला आहे. अभिजित पाटील यांनी कारखान्यासाठी लोकसभा मतदानापूर्वी पवारांच्या सल्ल्यानेच भाजपला पाठिंबा दिल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. नुकतीच अभिजित पाटील आणि शरद पवार यांची भेट झाली असून यात काय घडले हे मात्र गुलदस्त्यात आहे . अशातच सोलापूर जिल्ह्यातील 11 पैकी किमान एका मतदारसंघात महिला म्हणून मला संधी देण्याची मागणी माढ्याच्या नगराध्यक्षा मीनल साठे यांनी आता शरद पवार व महाविकास आघाडीकडे केली आहे.

माढ्यातून मलाच उमेदवारी मिळणार, संजय कोकाटेंचा दावा

माढा विधानसभेत कितीही इच्छुक असले तरी पवार हे आपल्यालाच उमेदवारी देतील आणि मला उमेदवारी घोषित झाल्यावर बाकीचे माझ्या मागे उभे राहतील असा दावा संजय कोकाटे यांनी केला आहे. गेल्यावेळी बबनदादा शिंदे यांची संजय कोकाटे यांच्याशी लढत होऊन कोकाटे यांचा पराभव झाला होता. मात्र त्याहीवेळी कोकाटे यांनी 70 हजारापेक्षा जास्त मते मिळवत आपली ताकद दाखवून दिली होती. गेले अनेक वर्षे कोकाटे हे बबनदादा शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. दुसऱ्या बाजूला सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघात मराठा समाजाला उमेदवारी देण्यासाठी आता महाविकास आघाडीकडे फक्त माढा व पंढरपूर हे दोनच पर्याय उरले असल्याने माढ्यात तुतारीच्या उमेदवार मराठाच असणार हे नक्की. मात्र सध्या इच्छुक उदंड झाल्याने उमेदवारी कोणाला द्यायची? असा प्रश्न शरद पवार यांच्यापुढे पडला आहे.   त्यामुळं आता माढ्याच्या तुतारीच्या शर्यतीत ज्याला उमेदवारी मिळेल तो येथील आमदारकीचा प्रमुख दावेदार मनाला जात आहे. 

महत्वाच्या बातम्या:

मैदान जुने, चेहरे नवे! मला आमदार व्हायचंय...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Khatal : थोरातांच्या 40 वर्षांच्या गडाला सुरुंग; जायंट किलर अमोल खताळ EXCLUSIVE | विजयाचा गुलालRohit Patil News : अजितदादांचा फोन आला होता का? रोहित पाटील स्पष्टच बोलले..ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 December 2024Maharashtra Superfast News : 08 December 2024 : Superfast News : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
Embed widget