एक्स्प्लोर

Lok Sabha : संसदेच्या पहिल्या सत्रात विरोधकांचा एल्गार, प्रोटेम स्पीकरच्या पॅनेलवरील विरोधी पक्षांच्या खासदारांकडून शपथ न घेता असहकार

Lok Sabha Session : लोकसभा निवडणुकीनंतर संसदेचं सत्र सुरु होत असून आज नवनिर्वाचित खासदारांना लोकसभेच्या सदस्यत्वाची शपथ दिली जात आहे.

नवी दिल्ली : 18 व्या लोकसभेचं (18th Lok Sabha First Session )पहिलं अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून बर्तृहरी महताब (Bhartruhari Mahtab) यांची निवड केली होती. हंगामी लोकसभा अध्यक्षांनी कामकाजाला सुरुवात करताना राष्ट्रपतींनी हंगामी लोकसभा अध्यक्षांना सहकार्य करण्यासाठी हंगामी तालिका अध्यक्ष म्हणून कामकाज पाहण्यासाठी पाच खासदारांची शिफारस केल्याची महिती दिली. यामध्ये सत्ताधारी पक्षातील दोन खासदार तर विरोधी पक्षातील तीन खासदारांचा समावेश होता. यामध्ये काँग्रेसचे खासदार के. सुरेश, द्रमुकचे टीआर. बालू आणि टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय, भाजपचे खासदार राधामोहन सिंग आणि फगनसिंग कुलस्ते यांच्या नावाचा समावेश असल्याचं बर्तृहरी महताब यांनी सांगितलं. मात्र, के. सुरेश, टीआर. बालू  आणि सुदीप बंदोपाध्याय शपथ घेतली नाही. 

बर्तृहरी महताब यांनी सांगितल्याप्रमाणं सभागृहाचे नेते म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. हंगामी अध्यक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खासदारपदाची शपथ घेतल्यानंतर काँग्रेसच्या के. सुरेश आणि द्रमुकच्या टीआर बालू यांच्या नावाची घोषणा केली मात्र या दोन्ही खासदारांनी शपथ घेतली नाही. यानंतर माजी केंद्रीय मंत्री राधामोहन सिंग यांनी शपथ घेतली. यानंतर भाजपच्या फगनसिंह कुलस्ते यांनी शपथ घेतली. लोकसभेतील अधिकाऱ्यांनी यानंतर टीएमसीच्या सुदीप बंदोपाध्याय यांच्या नावाची घोषण केली. मात्र, सुदीप बंदोपाध्याय यांनी शपथ घेतली नाही. 

संसदेच्या पहिल्या सत्रात विरोधकांचा एल्गार

विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या तीनही सदस्यांनी प्रोटेम स्पीकरच्या पॅनेलवर बहिष्कार टाकला. यामध्ये  काँग्रेसचे के. सुरेश, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय आणि डीएमकेचे टीआर. बालू यांचा समावेश आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तिघांनाही प्रोटेम स्पीकरच्या पॅनलमध्ये नियुक्त केले होते. मात्र, तिघांनी देखील शपथ न घेतल्यानं आताप्रोटेम स्पीकरच्या पॅनेलचे हे तीन सदस्य  बर्तृहरी महताब यांना सहकार्य करणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.

विरोधी पक्ष आक्रमक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेच्या खासदारपदाची शपथ घेतली. त्यावेळी विरोधी पक्षांचे खासदार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. विरोधी पक्षाच्या खासदारांनी नरेंद्र मोदी यांना संविधानाच्या प्रती दाखवल्या. विरोधी पक्षांनी संसदेबाहेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापासून संविधान हातात घेत एकजूट दाखवत आंदोलन केलं. विरोधी पक्षाचे खासदार संविधानाची प्रत हातात घेत लोकसभेत दाखल झाले.

दरम्यान, हंगामी अध्यक्ष बर्तृहरी महताब यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वायनाड लोकसभा मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती सभागृहाला दिली. राहुल गांधी यांचा वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा स्वीकारत असल्याचं म्हटलं. राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. नियमाप्रमाणं त्यांना 18 जूनपर्यंत एका लोकसभा मतदारसंघाच्या खासदारपदाचा राजीनामा द्यायचा होता. त्यानुसार त्यांनी वायनाडची खासदारकी 17 जूनला सोडली. 

संबंधित बातम्या : 

Parliament Session 2024 : संसदेत शपथ घेताच मोदी आणि राहुल गांधी पहिल्याच दिवशी आमनसामने; दोघांच्या भेटीत काय घडलं?

Narendra Modi : सरकार चालवण्यासाठी बहुमताची, देश चालवण्यासाठी सहमतीची गरज, मोदींनी विरोधी पक्षांबाबत काय म्हटलं?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर

व्हिडीओ

Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता
Manikarnika Ghat Special Report : मणिकर्णिका घाट पाडला, काँग्रेसची जहीर टीका, पुनर्विकासावरुन वादाची ठिणगी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
मुंबईत भाजप शिंदे गटाचा गुंता वाढला असतानाच आता वर्षा गायकवाडांच्या भूमिकेनं भूवया उंचावल्या! गरज पडल्यास ठाकरेंच्या मदतीला धावणार की नाही?
Pimpri Chinchwad: पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
पिंपरी-चिंचवडमधील ‘या’ शाळांना २० जानेवारीला सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, वाहतुकीतही बदल, नेमकं काय आहे कारण?
मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
... तर ठाकरेंचाच महापौर होऊ शकतो, मुंबई मनपात चकीत करणारं गणित, ठाकरेंकडे दोन हुकूमी एक्के, महापौर आरक्षण सोडतीने धाकधूक वाढवली! 
Embed widget