Ashok Chavan on Manoj Jarange: "मी मनोज जरांगेंना मानतो, पण न्यायालयात टिकेल असे आरक्षण..." अशोक चव्हाण मराठा आरक्षणप्रश्नी म्हणाले...
मराठवाड्यात आज राजकीय घटनांना वेग आला असून लातूर, निलंगा, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांमध्ये विधानसभा निवडणूकांपूर्वी विविध नेत्यांनी बैठकांचा धडाका सुरु आहे.
Ashok Chavan on Manoj Jarange: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मराठा ओबीसी आरक्षण प्रश्न तापलेला दिसत असताना राजकीय वातावरण ढवळून निघाल्याचे दिसतय. मनोज जरांगे पाटील यांना आपण मानतो असे म्हणत न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगत भाजपचे राज्यसभा सदस्य अशोक चव्हाण म्हणाले. आज पक्षपातळीवर भाजपच्या कार्यकर्त्यांची लातूर येथे बैठक आहे त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्यात आज राजकीय घटनांना वेग आला असून लातूर, निलंगा, धाराशिव, नांदेड जिल्ह्यांमध्ये विधानसभा निवडणूकांपूर्वी विविध नेत्यांनी बैठकांचा धडाका सुरु आहे.
मराठा आरक्षणप्रश्नी अशोक चव्हाण म्हणाले, मी मनोज जरांगे यांना मानतो. मराठा समाजासाठी त्यांनी काम केलं आहे. न्यायालयात टिकेल असे आरक्षण देण्याबाबत सरकार कटीबद्ध आहे आणि त्या अनुषंगाने प्रयास सुरू आहेत.
प्रकाश आंबेडकरांवर अशोक चव्हाण म्हणाले...
लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये आढावा बैठका घेण्यात येत असून आज वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरही लातूरमध्ये होते. यावेळी श्रीमंत मराठा आणि गरीब मराठ्यांवर अन्याय केला आहे असं सांगत आरक्षण बचाव यात्रेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पंकजा मुंडेंची ही भेट घेतली.
दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या विधानावर अशोक चव्हाण म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर जातीय तेढ निर्माण करू नये. कोणी कोणावर अन्याय केला नाही. पुन्हा आमची सत्ता येईल असे ते म्हणाले.
विधानसभेसाठी बैठकांचा धडाका
दरम्यान लातूर येथील भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीला भाजपचे नेते अशोक चव्हाण तसेच प्रताप पाटील चिखलीकर यांचीही हजेरी होती. लातूर येथे भाजपच्या तीन जिल्ह्यांच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीला पंकजा मुंडे होत्या तर लातूर धाराशिव आणि नांदेड येथील कार्यकर्त्यांची ही बैठक घेण्यात आली आहे. नांदेड येथील बैठकांसाठी नांदेड येथील कार्यकर्त्यांच्यासह अशोक चव्हाण प्रताप पाटील चिखलीकर यांच्यासह भाजपचे मुख्य पदाधिकारी लातूर शहरात दाखल झाले होते.
मराठ्यांचे प्रश्न वेशीवर टांगली जाईल
गरीब मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी या निवडणुकीच्या माध्यमातून वेशीवर टांगल्या जातील. राज्यातील श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याला संपूर्णपणे दाबून टाकत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी निवडणुकीला मनोज जरांगे यांनी सामोरे जावे. श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी सोयरीक करायला तयार नाही. याच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड या भागातून श्रीमंत मराठे स्वतःला उत्तर प्रदेशमधील लोकासारखं सिंग म्हणून घेण्याची सुरुवात करत होते..मात्र, मोठ्या प्रमाणात टिंगल टवाळी झाल्यानंतर तो विषय मागे पडला. असे प्रकाश आंबेडकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांनी घेतली पंकजा मुंडेंची भेट
वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि भाजपच्या नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची भेट झाली. लातूरहून बीडकडे येत असताना प्रकाश आंबेडकर यांची पंकजा मुंडे यांनी घेतली भेट. प्रकाश आंबडेकर यांची आरक्षण बचाव यात्रा सुरु आहे. ही यात्रा लातूरवरून आज बीडमध्ये दाखल होत आहे. त्यादरम्यान पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत त्यांचं स्वागत केलं.पंकजा मुंडे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण झाली.