विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?
आज आपण लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची (Latur city Vidhansabha Election) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
Latur City Assembly Election : विधानसभा निवडणुकीचा (Vidhasabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. राजकीय नेते ऐकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. लातूर (Latur) जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. अशातच आज आपण लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची (Latur city Vidhansabha Election) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या निवडणूक लढवत आहेत.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने तीन मुख्य उमेदवारातच लढत आहे. यामध्ये काँग्रसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्याविरोधात भाजपकडून डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर तर वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात काँग्रेसची चांगली ताकद आहे. यावेळी नेमकं काय होणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
2019 च्या निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघाची काय स्थिती होती?
2019 मध्ये लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जिंकला होता. लातूर शहर हा महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यांतर्गत येतो. 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या शैलेश गोविंदकुमार लाहोटी यांचा 40415 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली होती. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख हे सलग तीन वेळा विजयी झाले आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून काँग्रेसचे डॉ शिवाजी काळगे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव केला होता.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपेच्या फैरी झडत आहेत. लातूरच्या राजकारणातील दिग्गज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अमित देशमुख यांच्या विरोधात डॉ. अर्चना पाटील चाकूरकर असा सामना होणार आहे. शिवराज पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख काँग्रेसमध्ये असताना अनेक वेळेस कुरघोडीचं राजकारण रंगलं होतं. पुढच्या पिढीतही तोच अध्याय सुरू आहे. डॉ. अर्चना पाटील चाकूरकर या माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुन आहे. त्यामुळं लातूर शहरची लढत ही अत्यंत चुरशीची मानली जात आहे.
महत्वाच्या बातम्या:
Latur Assembly Election : लातूर जिल्ह्याकडं सर्वांचं लक्ष, 6 मतदारसंघातील चित्र स्पष्ट, कोण मारणार मैदान?