एक्स्प्लोर

Eknath Shinde On Abdul Sattar: वाचाळवीरांना आवर घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक, फोन करुन सत्तारांची कानउघाडणी

Eknath Shinde On Abdul Sattar: शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याचा आरोप आहे.

Eknath Shinde On Abdul Sattar: शिंदे सरकारमधील कृषीमंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केल्याचा आरोप आहे. यावरून राज्यभरात राज्यभरात राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. यावरूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तारांना फोन करून त्यांचे कान टोचले असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. तसेच आपल्या वक्तव्यावर माफी मागण्याचे सत्तारांना शिंदे यांनी आदेश दिले आहे, असं ही सूत्रांनी सांगितलं आहे. वाचाळवीर नेत्यांना कंटाळून शिंदेंनी बोलावली प्रवक्त्याची बैठक बोलवली असल्याचं सांगण्यात येत आहे. याशिवाय बाळासाहेबांच्या शिवसेनेतील प्रवक्ते व महत्वाच्या नेत्यांशिवाय इतर नेत्यांनी माध्यमांशी संवाद साधू नये, असे आदेशही मुख्यमंत्री शिंदे (eknath shinde) यांनी दिले असल्याचे सांगण्यात आले आहे.

काय म्हणाले होते सत्तार? 

आज औरंगाबादमधील सिल्लोड येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. यासाठीच अब्दुल सत्तार यांच्याकडून आढावा घेतला जात होता. यावेळी माध्यमांशी सत्तार यांनी विरोधी पक्षांवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, आमच्यावर खोके म्हणणाऱ्या लोकं भिकार** आहेत. त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यासाठीही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यभरात राष्ट्रवादी कार्यकर्ते आकाराम झाले आणि त्यांनी आंदोलने सुरु केले.  

सत्तार यांच्या घरावर दगडफेक 

सुळेंबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप असताना अब्दुल सत्तार यांनी आपण आपल्या त्या वक्तव्यावर ठाम असल्याचं आणि तोच शब्द वापरणार असल्याचं म्हटलं होत. त्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापले. सत्तार यांच्या वक्तव्याने संतापलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी त्यांच्या औरंगाबादमधील निवास्थानासमोर आंदोलन केले आणि नंतर घरावर दगडफेक देखील केली. 

अखेर सत्तार यांनी मागितली माफी...

हा वाद वाढत असल्याचं पाहून अब्दुल सत्तार यांनी अखेर माफी मागितली आहे. ते म्हणाले आहेत की, "मी कोणत्याही महिला भगिनींच्या बाबतीत अपशब्द बोललो नाही. आम्हाला जे बदनाम करत आहेत, त्यांच्याबद्दल बोललो आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे (Supriya Sule ) यांच्याबद्दल किंवा कोणत्याच महिलेबद्दल मी काहीच बोललो नाही. महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु, माझ्या बोलण्याने जर कोणाची मने दुखावली असतील  तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो.''

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dhruv Rathee Wife : युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
Anura kumara dissanayake: कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 22 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 08 PM : 22 September 2024: ABP MajhaNCP Ajit Pawar : अजितदादांनी भर सभेत खडसावलं, आता उमेश पाटलांची मोठी घोषणा ABP MAJHABharat Gogawale : मंत्रिपद हुकलं, महामंडळही लांबणीवर; गोगावले म्हणतात पुढच्या वेळी...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Rathee Wife : युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
युट्युबर ध्रुव राठीची विदेशी पत्नी कोण आहे?
Anura kumara dissanayake: कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
कामगाराचा मुलगा श्रीलंकेचा राष्ट्रपती, डाव्या विचारांचं वादळ; कोण आहेत अनुरा दिसानायके
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
सप्तशृंग गडावर जाणारा घाट 4 दिवस बंद, प्रशासनाचे आदेश; भाविक भक्तांसाठी महत्त्वाचे
Ganeshotsav: गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
गणेश विसर्जनानंतर येतोय साखर चौथ गणेशोत्सव; काय आहे परंपरा?
महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष
महायुतीत वादाचा भडका उडणार, कर्जत-खोपोली मतदारसंघात आमदार थोरवे अन् घारेंमध्ये संघर्ष
Sangram singh: संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
संग्राम सिंहने रचला इतिहास; MMA आंतरराष्ट्रीय चॅम्पियन्समध्ये पाकिस्तानच्या फायटरला लोळवलं
Tirupati Laddu Controversy : चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
चंद्राबाबूंनी तिरुपती देवस्थानला कलंक लावला, माजी सीएम जगन रेड्डींकडून पीएम मोदींना पत्र लिहित केली मोठी मागणी
Satyapal Malik on BJP : महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
महाराष्ट्रात भाजपचा सुफडासाफ होणार, 'मविआ'चा प्रचार करणार; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर सत्यपाल मलिक काय काय म्हणाले?
Embed widget