एक्स्प्लोर

सगळं घर महिला चालवतात, 1500 देऊन अपमान का, 10 हजार रुपये द्या, लाडकी बहीण योजनेवरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

निवडणुकीत ते हरणार आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवले आहे. आता दोन महिन्यांसाठी धावाधाव करुन काय मिळवणार आहे, असे म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

मुंबई : सरकारच्या लाडक्या बहिण योजनेवरून (Ladki Bahin Yojna)  विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शिवसेना उद्धव  बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार  संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी टीका केली आहे.  सध्याच्या महागाईच्या काळात  देखील महिला  सगळं घर  चालवतात. 1500 देऊन अपमान का करता  त्यांना 10 हजार रुपये द्या, असे म्हणत  लाडकी बहीण योजनेवर संजय राऊतांनी निशाणा साधला  आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. 

संजय राऊत म्हणतात,   सध्याच्या सरकारचे जे काही सुरू आहे त्याला अर्थिक बेशिस्त म्हणतात. देश किंवा राज्य चालवतान आर्थिक शिस्त म्हत्त्वाची आहे. निवडणुका जिंकण्यासाठी तुमच्या तिजोरीत पैसे नाहीत आणि तुम्ही मोठमोठ्या योजनांच्या घोषणा करत सुटले आहे. त्याला आर्थिक शिस्त म्हणत नाही.  योजनांसाठी कुठून पैसे आणणार याचे काही प्लानिंग नाही. निवडणुकानंतर या योजना बंद पडणार. कारण  सरकार बदलणार हा एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे.

लाडक्या बहिणींचा अपमान करु नका : संजय राऊत

सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली आहे.  या योजनेंतर्गत त्यांना 1500 रुपये मिळतात. महागाईच्या काळात  सगळं घर महिला चालवतात, त्यांना 1500 नाही तर 10 हजार रुपये द्या. महागाई, सिलेंडरचे वाढलेलले दर पाहता त्यांना जास्त पैशांची गरज आहे. पदवीधरांना आठ हजार, 12 वी पास असणाऱ्यांना सहा हजार आणि लाडक्या बहिणीला 1500 हा अपमान कशाला करता? असा सवाल संजय राऊतांनी केला आहे. 

सर्वोच्च न्यायलयाने ठरवले तर 24 तासात सगळे अपात्र  ठरतील : संजय राऊत

आमदार अपात्रता प्रकरणती शिंदे गटाने हायकोर्टात धाव घेतली आहे. याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले,   ते निवडणुकीत हरणार आहे. त्यांना सुप्रीम कोर्टाने अपात्र ठरवले आहे. आता दोन महिन्यांसाठी धावाधाव करुन काय मिळवणार आहे. जर सर्वोच्च न्यायलयाने संविधान आणि घटनेचा मान राखला तर 24 तासात सगळे अपात्र  ठरतील. त्यांचा पक्ष, चिन्ह हे गोठवले जाईल, असे संजय राऊत म्हणाले. 

 विधानसभेच्या अपशकुनाची सुरुवात : संजय राऊत

राज ठाकरे नुकतेच परदेशातून आले आहेत.  लोकसभेत भाजपला बिनशर्त पाठिंबा  दिला आणि आता  एका महिन्यात त्यांची भुमिका बदलली आहे.  काही पक्ष महाराष्ट्र विरोधी भुमिका घेण्यासाठी बनले आहेत.   मुंबई लुटणाऱ्यांना शक्तींना मनसे पाठीबा देत असल्याची टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे  गटाचे खासदार  संजय राऊत यांनी केली आहे.  विधानसभेच्या अपशकुनाची सुरुवात  झाल्याचे देखील  राऊत म्हणाले. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.  

ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह काढून घेऊन सुद्धा आम्ही ताकदीने लढलो: संजय राऊत

लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र असते तर पक्ष टिकला असता असे राज  ठाकरे म्हणाले, यावर संजय राऊत म्हणाले,  राष्ट्रवादी पक्ष पहिल्यापेक्षा खूप मजबूत आहे. शरद पवारांच्या पक्षाने कधी नव्हे ते इतकं मोठं यश मिळवलं.  पक्ष हलला नाही, 8 लोकसभेच्या जागा पवारांच्या नेतृत्त्वात जिंकल्या. हे पक्ष टिकल्याचे लक्षण आहे.   त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांचा पक्ष आणि चिन्ह काढून घेऊन सुद्धा आम्ही ताकदीने लढलो, 9 जागा जिंकल्या.   खरे पक्ष कोणते हे लोकांना माहिती आहेत.

Sanjay Raut Video : लाडक्या बहिणींचा अपमान करु नका : संजय राऊत

हे ही वाचा :

'बिनशर्ट' पाठिंबा देणारे आता स्वबळाची भाषा करतात, एकाच महिन्यात भूमिका बदलली, विधानसभेच्या अपशकुनाची सुरुवात : संजय राऊत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Bigg Boss Marathi Season 5 : नॉमिनेट होताच निक्कीचा चेहरा पडला, वर्षा-जान्हवीवरही एलिमिनेशनची  टांगती तलवार
नॉमिनेट होताच निक्कीचा चेहरा पडला, वर्षा-जान्हवीवरही एलिमिनेशनची टांगती तलवार
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbaicha Raja Visarjan 2024 : मुंबईच्या राजाला विसर्जन मिरवणुकीसाठी ढोल पथकांची सलामीLalbaugcha Raja Visarjan : लालबागच्या राजाच्या विसर्जनाची पूर्वतयारी कुठवर?Dhangar Dhangad Reservation : धनगर-धनगड आरक्षणाचा वाद, मुद्दा काय?सकाळी ७ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 17 September 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Numerology : अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
अत्यंत साधेभोळे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; कोणीही यांना पटकन फसवतं, यांच्या साध्या स्वभावाचा लोक नेहमीच घेतात फायदा
Bigg Boss Marathi Season 5 : नॉमिनेट होताच निक्कीचा चेहरा पडला, वर्षा-जान्हवीवरही एलिमिनेशनची  टांगती तलवार
नॉमिनेट होताच निक्कीचा चेहरा पडला, वर्षा-जान्हवीवरही एलिमिनेशनची टांगती तलवार
Thane  : महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
महिलांची छेडछाड होऊ नये म्हणून साध्या वेशातील पोलिस तैनात, गणेश विसर्जनासाठी ठाण्यात 9 हजार पोलिसांचा फौजफाटा
Ganesh Visarjan 2024 Time : अनंत चतुर्दशीला 'या' शुभ मुहूर्तावर करा गणपतीचं विसर्जन; पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
गणपती विसर्जनासाठी शुभ मुहूर्त कोणता? पाहा योग्य पूजा पद्धत आणि साहित्य
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
रामगिरी महाराज आणि नितेश राणे यांना अटक करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका 
Ganesh Visarjan 2024 : मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
मंगळवारी गणपतीचं विसर्जन करणं योग्य की अयोग्य? शास्त्र सांगते...
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
अग्निशमनच्या जवानांच्या उड्या, जिवाची बाजी लावली; गोदावरीत बुडणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीला वाचवलं
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणस्थळी धनगर बांधवाचे विष प्राशन; तत्काळ रुग्णालयात हलवले
Embed widget