Satyendar Jain Arrested: केजरीवाल सरकारचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने केले अटक, काय आहे प्रकरण?
Satyendar Jain Arrested: दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केली आहे.
Satyendar Jain Arrested: दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने आधी सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेतले आणि नंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली. त्यानंतर काही वेळातच त्यांना अटक करण्यात आली.
जैन यांना 4 कोटी 81 लाख रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. 2014-15 मध्ये सत्येंद्र जैन मंत्रिपदावर असताना त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कलकत्त्याच्या शेल कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करून अनेकवेळा त्यांची चौकशी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना या संदर्भात विचारणा केली असता, प्रश्नाची योग्य उत्तर देत नव्हते. माहिती लपवत होते. या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ईडीच्या कारवाईनंतर आपने भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया म्हणाले, सत्येंद्र जैन यांच्यावर 8 वर्षांपासून खोटा खटला सुरू आहे. आतापर्यंत ईडीने अनेकवेळा त्यांना चौकशीसाठी बोलावले आले आहे. दरम्यान, अनेक वर्षे काहीही न मिळाल्याने ईडीने त्यांना चौकशीसाठी बोलावले नाही. आता पुन्हा सुरुवात झाली कारण सत्येंद्र जैन हे हिमाचलचे निवडणूक प्रभारी आहेत. ते पुढे म्हणाले, हिमाचलमध्ये भाजपचा पराभव होत आहे. त्यामुळेच सत्येंद्र जैन हिमाचलला जाऊ नये म्हणून त्यांना आज अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण पूर्णपणे खोटे असल्याने काही दिवसांत त्यांची सुटका होईल.
सत्येंद्र जैन के ख़िलाफ़ 8 साल से एक फ़र्ज़ी केस चलाया जा रहा है. अभी तक कई बार ED बुला चुकी है। बीच में कई साल ED ने बुलाना भी बंद कर दिया था क्योंकि उन्हें कुछ मिला ही नहीं। अब फिर शुरू कर दिया क्योंकि सत्येंद्र जैन हिमाचल के इलेक्शन इंचार्ज हैं।1/2
— Manish Sisodia (@msisodia) May 30, 2022
दरम्यान, सत्येंद्र जैन यांच्या अटकेनंतर भाजप नेते प्रवेश साहिब सिंह यांनी ट्वीट करत आपवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट केले आहे की, "प्रामाणिक असल्याचे भासवणारे अरविंद केजरीवाल यांचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक केली आहे."