Jayant Patil : पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला, जयंत पाटील म्हणाले, गृहखात्याचा भोंगळ कारभार; गुन्हेगारच प्रबळ झालेत
Jayant Patil, पुणे : पुणे (Pune) शहरात पुन्हा कोयत्याने हल्ला करणाऱ्या गँगने तोंड वर काढलंय. पुण्यात वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये.
Jayant Patil, पुणे : पुणे (Pune) शहरात पुन्हा कोयत्याने हल्ला करणाऱ्या गँगने तोंड वर काढलंय. पुण्यात वाद सोडवण्यासाठी गेलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीये. रामटेकडी परिसरात सुरू असलेलं भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर कोयत्यानं हल्ला करण्यात आलाय. दरम्यान, जखमी पोलिसाला उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलंय. गेल्या काही दिवसांमध्ये महिला अत्याचाराची प्रकरणे समोर येत असतानाच आता पोलिसांवरच हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीये. दरम्यान याबाबत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जयंत पाटील काय काय म्हणाले?
जयंत पाटील म्हणाले, पोलिसांवर कोयत्याने हल्ला झालेल्या घटनेबाबत बोलताना जयंत पाटील म्हणाले, पुण्यातील प्रकार अत्यंत गंभीर आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या धज्ज्या उडालेल्या आहेत. पोलिसांचा वचक राहिलेला नाही. गुन्हेगारांवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी कडकपणे काम केलं पाहिजे. गृहखात्यामध्ये भोंगळपणा आलेला आहे. पोलिस अधिकाऱ्यांचा मॉरल लो झालेला आहे. त्यामुळे अधिकारी कारवाई करण्यासाठी धजावत नाहीत. आता गुन्हेगारच प्रबळ व्हायला लागले आहेत, याचा अनुभव आजच्या घटनेतून आला. सरकारने पोलिसांच्या पाठिशी उभारलं पाहिजे.
पोलिसांवर हल्ले करण्याची हिंमत महाराष्ट्रातील गुन्हेगारांमध्ये आली
पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले, पोलिसांवर हल्ले करण्याची हिंमत महाराष्ट्रातील गुन्हेगारांमध्ये आली आहे. अधिकाऱ्यांवर हल्ला आत्तापर्यंत कधी ऐकलेला नव्हता. कोयत्याने पोलिसांवर हल्ला करणं अतिशय धक्कादायक आहे. याचा निषेध करतो. महाराष्ट्र पोलीसांमागे सरकारने ठाम उभं राहायला पाहिजे.. महाराष्ट्र सरकारने भूमिका घेतली पाहिजे. सरकारचं राज्याच्या प्रशासनाकडे आणि पोलीस खात्याकडे लक्ष नाही. पुण्यातील पोलीस व्यवस्था किती दुबळी झाली आहे हे दिसून येत आहेत.
महिलांचं संरक्षण ते करू शकत नाहीत, आता पोलिसांचंही संरक्षण करू शकत नाहीत
आता दोन महिने राहिले आहेत दोन महिन्यांसाठी त्यांचा राजीनामा मागण्यात अर्थ नाही असं मला वाटत. मुख्यमंत्र्यांपासून सगळेच सरकार महाराष्ट्रात फेल गेलेला आहे. महिलांचं संरक्षण ते करू शकत नाहीत, आता पोलिसांचंही संरक्षण करू शकत नाहीत, अशी समस्या निर्माण झालीय. कोणाची कधी बदली होईल आणि सगळ्याच बदल्या आर्थिक व्यवहार करून होत असेलत तर किती नैतिकता राहिली नाही, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.
इतर महत्वाच्या बातम्या