(Source: ECI/ABP News/ABP Majha)
फडणवीसांनी मुंडे, महाजन घराणे संपवले, यांनी कित्येक घराण्यांचे वाटोळं केलं; मनोज जरांगेंची फडणवीसांवर कडाडून टीका
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हलाबोल केला आहे. त्यांनी महाजन घराणं संपवलं, मुंडेंच्या बोटाला धरून मोठे झाले असं म्हणत कित्येक घराण्यांचं वाटोळं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
Manoj Jarange on Devendra Fadanavis: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी आंतरवली सराटीमध्ये आमरण उपोषण स्थगित करत देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanavis) महाजन घराणे संपवले, मुंडेंच्या बोटाला धरून हे मोठे झाले असं म्हणत यांनी कित्येक घराण्यांचं वाटोळं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी फडणवीसांनी केलाय.
गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात भाजप नेत्या पंकजा मुंडेंवर अन्याय झाल्याची चर्चा असताना आता मराठा आरक्षणाची मागणी करता करता मनोज जरांगे यांनी बीडच्या नेत्यांना देवेंद्र फडणवीसांनी संपवलं असा आरोप केलाय.
फडणवीसांनी महाजन घराणं संपवलं
मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार हलाबोल केला आहे. त्यांनी महाजन घराणं संपवलं, मुंडेंच्या बोटाला धरून मोठे झाले असं म्हणत कित्येक घराण्यांचं वाटोळं केल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला.
जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
ज्यांच्या बापाने भाजप वाढवली त्यांनाच पायाखाली चिरडलं. ज्याच्या बापाने भाजप वाढवलं त्यांनाच या देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) संपवलं, मराठ्यांच्या ओढाताणीमुळे त्यांचा दहा वर्षाचा वनवास संपला. हे देवेंद्र फडणवीस डाव खेळतात एवढ्या नीचपणाने सत्ता आणून तुमच्या कुटुंबाला फडणवीस काय सुख मिळणार आहे? अशा शब्दांत जरांगेंनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.