एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Coastal Road Inauguration: कोस्टल रोडच्या उद्घाटन समारंभासाठी ठाकरेंच्या आमदार, खासदारांना निमंत्रण, आदित्य ठाकरे उपस्थित राहणार?

Coastal Road Inauguration: आज पार पडणाऱ्या कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), सुनील शिंदे (Sunil Shinde) आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) या मविआतील तीन महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे.

Coastal Road Inauguration: मुंबई : वरळी ते मरीन ड्राईव्ह (Worli To Marine Drive) कोस्टल रोडचं (Coastal Road) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रम सोहळ्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे दोन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) दोघेही उपस्थित असणार आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, आज पार पडणाऱ्या कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी स्थानिक आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), सुनील शिंदे (Sunil Shinde) आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) या मविआतील तीन महत्त्वाच्या नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं छापण्यात आलेल्या पत्रिकेवर या तिघांचीही नावं नमूद करण्यात आली आहेत. त्यामुळे या प्रकल्पाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला हे तिन्ही नेते उपस्थित राहणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे. 

कोस्टल रोड वरळी ते मरिन ड्राईव्ह असा असणार आहे. वरळीचे स्थानिक आमदार आदित्य ठाकरे आहेत. तसेच, विधान परिषद आमदार सुनील शिंदे आणि स्थानिक खासदार अरविंद सावंत आहेत. यामुळे ठाकरे गटाच्या तिनही नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. तसेच, कोस्टल रोड हा मुंबई महानगरपालिकेचा प्रकल्प आहे. मनपाच्या वतीनं छापण्यात आलेल्या पत्रिकेवर ठाकरे गटाचे स्थानिक आमदार, खासदारांच्या नावांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. अशातच आता ठाकरे गटाचे आमदार आणि खासदार कोस्टल रोडच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती लावणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

मुंबईकरांसाठी आज अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. याचं कारण म्हणजे, वरळी ते मरीन ड्राईव्ह कोस्टल रोडचं आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या सोहळ्याला उपस्थित असणार आहेत. वरळी ते मरीन ड्राईव्ह अंतर प्रवास अवघ्या 10 मिनिटांत पार करता येणार आहे. येत्या काही दिवसांत कोस्टल रोड हा वांद्रे वरळी सी लिंकला देखील जोडण्यात येणार आहे. हा जोडरस्ता पूर्ण झाल्यावर मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्रेमध्ये उतरणं शक्य होणार आहे. 

कसा आहे मुंबईचा कोस्टल रोड प्रकल्प?

एकूण 10.58 किमीचा मार्ग असलेला हा कोस्टल रोड आहे. यामध्ये एकूण आठ मार्गिका आहेत. त्यामध्ये जाणाऱ्या 4 आणि येणाऱ्या चार अशा आहेत. तसेच बोगाद्यामध्ये 3 + 3 अशा मार्गिका आहेत. भराव टाकून बनवलेल्या रस्ता हा एकूण 4.35 किमी लांबीचा आहे. तसेच पुलांची एकूण लांबी ही 2.19 किमी इतकी आहे. बोगद्यांची लांबी ही प्रत्येकी 2.19 किमी इतकी आहे. 

  • मुंबई ते कांदिवली 29 किलोमीटर लांबीचा हा कोस्टल रोड असेल. दक्षिण कोस्टल रोड हा 10.58 किमी लांबीचा आहे. 
  • प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी हा प्रकल्पातील पहिला टप्पा सुरू होणार आहे. 
  • एकूण प्रकल्पाचा खर्च 12,721 कोटी रुपये आहे
  • यामध्ये 15.66 किमी चे  तीन इंटरचेंज आणि 2.07 किमी चे एकूण दोन बोगद्यांचा समावेश असेल
  • कोस्टल रोड पूर्ण झाल्यानंतर प्रवासामध्ये 70 टक्के वेळेची बचत होणार असून ध्वनी प्रदूषण आणि वायू प्रदूषण त्यामुळे कमी होईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Coastal Road Inaugurated: कोस्टल रोडचं आज उद्घाटन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण, ठाकरे गटालाही आमंत्रण

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rashmi Shukla Maharashtra Police | रश्मी शुक्लांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्तीRajkiya Shole | 57 जागा जिंकणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद मिळणार का? ABP MajhaJaykumar Gore - Rahul Kool : सर्व पवार 'ही' काळज घेतात..कुल-गोरेंनी सगळंच सांगितलं EXCLUSIVEZero Hour on India Match Wins | भारतानं कांगारूंचा दुसरा डाव 295 धावांत गुंडाळला ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur : करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
करमाळा, माढा, सोलापूर मध्य आणि सोलापूर दक्षिणमधील मतदान तफावत; प्रशासनाने केला मोठा खुलासा
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण सुटले, बस पलटली; 30 प्रवासी जखमी, नातेवाईक धावले रुग्णालयात
Eknath Shinde : लाडक्या बहिणी ते शेतकऱ्यांचा विशेष उल्लेख, मतदारांचा विश्वास सार्थ करण्यासाठी जीवाचं रान करु, एकनाथ शिंदे यांचं मतदारांना पत्र
महायुतीवर आपल्या मतांतून जो स्नेहाचा वर्षाव केलाय तो कधीच विसरणार नाही, एकनाथ शिंदें यांचं मतदारांना पत्र
Chief minister दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
दिल्लीतून ठरलं मुख्यमंत्रीपदाचं नाव, अमित शाहांकडून मुंबईत होणार घोषणा; एकनाथ शिंदे नाराज, सर्व भेटीगाठी रद्द
Barshi Vidhansabha: बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
बार्शीला खरंच सत्तेचं वावडं? सोपल-राऊत लढतीनं वेधलं राज्याचं लक्ष; काय सांगतो राजकीय इतिहास
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
30 वर्षांची सत्ता 3 महिन्यात 30 हजार मतांनी पाडली; शरद पवारांच्या माढ्यातील उमेदवाराचा हल्लाबोल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Kolhapur District Assembly Constituency : इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत; आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
इतिहासात प्रथमच गल्ली ते दिल्ली अख्खा कोल्हापूर जिल्हा सत्तेत! आता तरी गुडघाभर डबऱ्यातील शहर वर येणार का? उद्योगांची सुद्धा प्रतीक्षा
Embed widget