15 वर्षात भारत पुन्हा अखंड राष्ट्र बनणार, मोहन भागवत यांचं विधान
Mohan Bhagwat: मोहन भागवत म्हणाले आहेत की, विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांनी ज्या भारताचं स्वप्न पाहिलं होत, ते आता पूर्ण होण्याच्या जवळ आहे.
Mohan Bhagwat: अखंड भारत 8 ते 10 वर्षात अस्तित्वात येणार का? देशात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह अनेकांचे अखंड भारत हे स्वप्न आहे, ते पूर्णत्वास न्यायचा काही वेगळा प्लान आहे का ह्याची उत्सुकता निर्माण व्हायला कारण ठरले आहे हरिद्वार येथील सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचे एक भाषण. हरिद्वारमध्ये प्रवासादरम्यान त्यांनी सनातन धर्म हेच हिंदू राष्ट्र असल्याचे म्हटले आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले, ''15 वर्षांनी भारत पुन्हा अखंड भारत बनेल आणि हे सर्व आपण आपल्या डोळ्यांनी पाहू.''
काय म्हणाले मोहन भागवत?
मोहन भागवत म्हणाले आहेत की, विवेकानंद आणि महर्षी अरविंद यांनी ज्या भारताचं स्वप्न पाहिलं होत, ते आता पूर्ण होण्याच्या जवळ आहे. या कामाला आता 20-25 वर्षे लागतील, असे लोक म्हणत असले तरी माझ्या अनुभवानुसार येत्या 8-10 वर्षांतच हे स्वप्न साकार होईल. हे स्वप्न पूर्ण होताना आपली ही पिढी आणि आपण आपल्या डोळ्यांनी पाहू. हे आमचं स्वप्न असून असा आमचा विश्वासही आहे.
दरम्यान, उज्वल, मंगल, शक्तिशाली, विश्व मार्गदर्शक अशा भारताचे स्वप्न स्वामी विवेकानंद किंवा अरविंदांनी बघितले, तो भारत आजचा भारत नव्हे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि म्यानमार असा एकत्रित भारताचे ते स्वप्न आहे. काही जाणकारांचे म्हणणे आहे की, संघाला अपेक्षित अखंड भारत हा आज फेडरेशनच्या स्वरूपात ही असू शकतो. एक देश, एक मॅपपेक्षा, आजच्या युरोपियन युनियनसारखेच, इंडियन युनियनचे ते स्वप्न असू शकते.
महत्वाच्या बातम्या
- PNG Price Hike : सहा महिन्यात 50 टक्क्यांनी वाढला पीएनजी; 'असं' कोलमडणार तुमचे किचन बजेट
- Monsoon : आनंदवार्ता ! यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर
- मोदींनी पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना लिहिलं पत्र, नवीन सरकारचे केले अभिनंदन; दहशतवादावर म्हणाले...
- Hardik Patel : गुजरात काँग्रेस कार्याध्यक्ष हार्दिक पटेलची पक्षावरच जाहीर नाराजी, हार्दिक आपच्या वाटेवर तर नाही?