एक्स्प्लोर

Monsoon : आनंदवार्ता ! यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पावसाचा अंदाज, हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर

यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे

Monsoon : देशातील नागरिकांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस पडणार आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार यंदा देशात पाऊसमान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. यंदा देशात चांगला पाऊस राहणार असल्याने शेतकऱ्यांना एका प्रकारचा दिलासा मिळाला आहे.

यंदा देशात सरासरीच्या 99 टक्के पाऊस होणार असल्यानं ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. कारण दरवर्षी शेतकऱ्यांना भारतीय हवामान विभागाच्या अंदाजाची प्रतिक्षा असते. त्यामुळे सगळे शेतकरी नेमका हवामान विभागाचा काय अंदाज येईल याची वाट बघत असतात. अखेर हवामान विभागाचा अंदाज आज जाहीर झाला आहे.

 

दरम्यान, जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने आज जाहीर केला आहे.  हा पहिला अंदाज आहे. हा अंदाज शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता घेऊन आला आहे. एकूण पावसाच्या 74 टक्के पाऊस हा जून ते सप्टेंबर या कालावधीत पडत असतो. फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही तर सर्वच नागरिकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. पाऊसमान चांगला होण्याच्या अंदाजामुळे शेतकऱ्यांना नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कारण गेले दोन वर्ष संपूर्ण जग कोरोनाच्या सावटाखाली होते. आता थोडासा धोका कमी झाला आहे. तसेच वाढत असलेली महागाई, वाढते तापमान, अशातच पाऊसमान चांगला होणार असल्याने शेतकऱ्यांसाठी ही चांगली बातमी आहे.

मागील दोन दिवसापूर्वीच हवामानाची माहिती देणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने देशभरातील यंदाच्या मान्सूनचा अंदाज जारी केला होता. यंदा मान्सून सामान्य राहिल, असा अंदाज स्कायमेटने वर्तवला होता. या अंदाजानुसार देशभरात मान्सून (जून ते सप्टेंबर) सरासरीच्या 98 टक्के राहण्याची शक्यता स्कायमेट या संस्थेन वर्तवली होती. यात पाच टक्क्यांपेक्षा कमी किंवा जास्त एरर मार्जिन आहे. स्कायमेटने यापूर्वी 21 फेब्रुवारी रोजी मान्सूनचा अंदाज जारी केला होता, ज्यामध्ये यावर्षी मान्सून सामान्य असेल असं सांगितलं होतं.

दरम्यान, देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी मान्सून महत्त्वाचा आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा तर आहेच. पण कॉर्पोरेट कंपन्यांपासून ते शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंतही त्याचा खोलवर परिणाम होतो. त्यानुसार भारतीय हवामान विभागाने आज आपला जाहीर केलेला अंदाज महत्त्वाचा मानला जात आहे. यंदा 99 टक्के पाऊस होणार असल्याने सर्वांसाठीचं ही आनंदवार्ता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
सणासुदीच्या काळात ग्राहकांना झटका! साखरेच्या दरात मोठी उसळी! 18 दिवसात 18 रुपयांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय? 
Mumbai University : मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
मोठी बातमी! विद्यापीठ, महाविद्यालयांच्या परीक्षेसाठी 30 मिनिटे आधी उपस्थित राहणं बंधनकारक, मुंबई विद्यापीठाचा नवा नियम लागू
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
चार भाऊ एकत्र असले तर PM किसान योजनेचा लाभ नेमका कोणाला मिळणार? काय सांगतो नियम? 24 वा हप्ता कधी मिळणार? 
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक
सोमेश्वर साखर कारखान्याचा महाराष्ट्रात डंका, उसाला दिला 4 हजार रुपयांचा विक्रमी दर, FRP पेक्षा 515 रुपये अधिक

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shweta Tiwari on Tukaram Mundhe: 'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
'तुकाराम मुढेंजी तुम्ही कुठं आहात? इकडं लक्ष द्या...' ऑनलाईन डिलीव्हरी घरी पोहोचताच धक्का बसला, श्वेता तिवारीची तक्रार, नेमकं काय घडलं?
Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
Mumbai Crime News: जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
जुन्या 'त्या' गोष्टीचा मनात राग; सासूनेच रचला दुबई रिटर्न सुनेला संपवण्याचा कट, तीन लाखांची सुपारी दिली, पोलिसांची चक्र फिरली अन्...
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
अवघ्या चार महिन्यांत 10 प्रकरणांमध्ये 22 आरोपींना मृत्युदंडाची शिक्षा, वकील आणि पक्षकार सुद्धा हबकले; न्यायाधीशांकडून 100 प्रलंबित खटले तातडीने काढून घेतले
Devendra Fadnavis in Nagpur: कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
कोरोनामुळे आयुष्याचा साथीदार गमावलेल्या तरुणीला आधार दिला; आता देवाभाऊंनी लग्नाला येऊन डोक्यावर अक्षताही टाकल्या
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र;
अभिजित दिपकेंना थेट पाकिस्तानातून हृदयस्पर्शी पत्र; "प्रिय अभिजीत, मी तुम्हाला लाहोरमधून पत्र लिहितोय, एक शहर जिथं दिल्लीसारखंच, आपण तेव्हा फाळणीत लाखो लोक गमावले, पण आजही.."
Chhatrapati Sambhajinagar : सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
सॉरी आई आणि आप्पा, पुढच्या जन्मी तुमच्यासाठी नक्की डॉक्टर बनेन, शेवटची चिठ्ठी लिहली अन्..., 19 वर्षीय विद्यार्थ्याने गळ्याला लावला दोर
Iran War Update: इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
इराणवर ट्रम्पकडून सर्वात मोठ्या निर्बंधांची घोषणा; इराणला पाठिंबा देणाऱ्या देशांवर आणि संस्थांवरही कारवाई
Embed widget