'देशातील मुस्लिम रस्त्यावर आले तर...', मौलाना तौकीर रझा यांचे वादग्रस्त वक्तव्य
Loudspeaker controversy: देशात एकीकडे भोंग्यांवरून राजकारण तापले असताना अशातच मौलाना तौकीर रझा यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.
Loudspeaker controversy: देशात एकीकडे भोंग्यांवरून राजकारण तापले असताना अशातच मौलाना तौकीर रझा यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बुलडोझर कारवाई आणि लाऊडस्पीकर वादावर तौकीर रझा यांनी मोदी सरकारला इशारा दिला आहे. ते म्हणाले आहेत की, भारतात महाभारत घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. देश पुन्हा एकदा फाळणीकडे जात आहे.
देशातील मुस्लिम रस्त्यावर येतील...
मौलाना तौकीर रझा यांनी दिल्लीतील हिंसाचारानंतर तेथे करण्यात आलेल्या बुलडोझर कारवाईबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. तौकीर रझा म्हणाले की, देशात जी परिस्थिती आहे, ती चांगली नाही. आमच्या अजानच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. ते म्हणाले की, ज्या दिवशी देशातील मुस्लिम रस्त्यावर येतील, तेव्हा त्यांना सांभाळणे फार कठीण होईल. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे धृतराष्ट्र असे वर्णन करताना म्हणाले की, भारतात महाभारत घडण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
सपा आमदारांना काय म्हणाले
तौकीर रझा सांगतात म्हणाले की, दिल्लीतून जेल भरो आंदोलन सुरू होणार आहे. आजपासून 10 दिवसांनी बैठक होणार असून त्यानंतर जेल भरो आंदोलनाची तारीख ठरवली जाणार आहे. ज्यामध्ये देशभरातून करोडो लोक पोहोचतील. तौकीर रझा म्हणाले की, समाजवादी पक्षाच्या आमदारांनी पक्षाचा राजीनामा द्यावा, कारण ते केवळ मुस्लिमांच्या मतांवर विजयी झाले आहेत. त्यामुळे राजीनामा देऊन आंदोलनात सहभागी व्हावे.
यापूर्वीही केलं आहे वादग्रस्त वक्तव्य
मौलाना तौकीर रझा यांनी यापूर्वीही अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. यापूर्वी निवडणुकीच्या काळात बाटला हाऊस चकमकीवर बोलताना तौकीर रझा यांनी वादग्रस्त विधान करत काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यांनी या चकमकीत मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना शहीद असे म्हटले होते.
इतर महत्वाच्या बातम्या: