एक्स्प्लोर

Ranjitsinh Mohite Patil: लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार, रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपला रामराम करण्याच्या तयारीत

Ranjitsinh Mohite Patil: लोकसभेला अशक्य ते शक्य करुन दाखवलं, आता विधानसभेलाही शरद पवार माढ्याची हवा फिरवणार, रणजीतसिंह मोहिते पाटील भाजपला रामराम करण्याच्या तयारीत

अकलूज: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पडद्यामागून आपला भाऊ धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी सूत्रे हलवत माढा लोकसभा जिंकणारे फडणवीस यांचे निकटवर्तीय रणजीत सिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) आता पुन्हा तुतारी घेऊन माढा विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. माढा लोकसभा (Madha Lok Sabha) मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी डावल्याने त्यांनी तुतारी हातात घेत भाजपकडून हा मतदारसंघ खेचून घेतला होता.

यावेळी भाजपने विधानपरिषद दिलेले आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उघडपणे प्रचारात कुठेही आले नसले तरी पडद्यामागून सूत्रे हालवत त्यांनी माढा व सोलापूर या दोन्ही जागा जिंकण्यास महाविकास आघाडीला मोलाचे सहकार्य केले होते. आता विधानसभेला रणजितसिंह मोहिते पाटील काय करणार याची चर्चा सुरू असतानाच अकलूज येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत काल झालेल्या मेळाव्यात रणजीत दादा नुसते स्टेजवरच नव्हते तर त्यांनी भाषण करून भाजपला जोरदार धक्का दिला. 

अकलूजच्या कार्यक्रमात शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या कानात सातत्याने बोलणारे रणजीत दादा ज्या वेळेला भाषणाला उभारले त्या वेळेला सोलापूर जिल्ह्यासाठी आपण कोणतीही तडजोड करायला तयार आहोत, असे सांगत पक्षांतराचे स्पष्ट संकेत दिल्याने भाजपचे धाबे दणाणले आहेत. रणजीत सिंह मोहिते पाटील हे 2019 साली लोकसभेची उमेदवारी डावल्याने भाजपमध्ये आली होती. मोहिते पाटलांमुळे 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने माढा व सोलापूर या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात दणदणीत विजय मिळवला होता. मात्र यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील आणि भाजपचे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बिनसले आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना तुतारी देऊन राष्ट्रवादीतून जिंकून आणले. आता विधानसभेच्या तोंडावर रणजितसिंह मोहिते पाटील हे उघडपणे महाविकास आघाडीच्या स्टेजवर आल्याने लवकरच ते फडणवीस व भाजपाला सोडचिठ्ठी देणार याचे संकेत दिले आहेत. 

भाजपचा माढ्यातील एकमेव आधारही जाणार

माढा विधानसभा जिंकणे हे 2004 पासून मोहिते पाटील गटाचे स्वप्न होते. आता यावेळी माढा विधानसभेतून रणजीत सिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास विद्यमान अजित पवार गटाचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत. याचेच गणित शरद पवार सध्या मांडत असून त्यामुळेच काल झालेल्या कार्यक्रमात रणजीत सिंह मोहिते पाटील हे उघडपणे स्टेजवर आले आणि त्यांनी भाषणही केले. सध्या माढा विधानसभेसाठी इच्छुकांची मांदियाळी लागली असून हे बहुतांश इच्छुक उमेदवार अकलूजच्या कार्यक्रमाला हजर होते. या सर्वांसमोर रणजितसिंह मोहिते पाटील यांनी दिलेले तडजोडीचे संकेत हे राष्ट्रवादी गटात प्रवेशाची नांदी असून तसे झाल्यास भाजपाला मोहिते पाटील घरातील उरलेल्या एकमेव सदस्याचा पाठिंबाही गमवावा लागणार आहे. 

यामुळे भाजप नेते आधीच अस्वस्थ असून अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी थेट मोहिते पाटील यांच्यावर टीका करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात जास्त कामे मोहिते पाटील यांची केल्याचे आठवण करून देत जानी शरद पवारांवर घर फोडण्याचे आरोप केले, तेच आता शरद पवारांच्या मागे फिरत असल्याचा टोला लगावला होता. मोहिते पाटील जाणार हे आता भाजपला कळून चुकल्यामुळे मोहिते पाटलांना शह देण्यासाठी भाजपला नवीन व्युहरचना करावी लागणार आहे. मोहिते पाटील यांच्या उपस्थितीबाबत भाजप किंवा फडणवीस यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी यामुळे सोलापूर जिल्ह्यात भाजपला मोठा हादरा बसला आहे. 

आणखी वाचा

मोठी बातमी! अजित पवार गटाचे आमदार बबन शिंदे थेट शरद पवारांच्या भेटीला; राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Navratri 2024: नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dharavi Mosque : धारावीतल्या मशिदीतल्या बेकायदा हॉलचे पाडकाम सुरूMVA Vidhansabha : मविआतील अडचणीच्या जागांवर तोडगा; बैठकीला सुरूवात?Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 1 PM : 30 सप्टेंबर 2024: ABP MajhaLadki Bahin Yojana Scam : नाव बहिणीचं; लाभार्थी पुरूष; नांदेड जिल्ह्यात मोठा घोटाळा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navratri 2024: नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
नवरात्रीत अदानीतर्फे स्वस्त दरात वीजपुरवठा; कसा करावा अर्ज? जाणून घ्या A टू Z माहिती
Uddhav Thackeray : रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघात ठाकरेंची मोठी खेळी, 'या' मातब्बर नेत्यांचं तिकीट फिक्स?
Baramati Student Murder : बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारावीच्या विद्यार्थ्याची कॉलेजमध्येच कोयत्याने हत्या, बारामती हादरली, रस्त्यावर थरार, मदतीला कोणीच नाही!
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
बारामती हादरली! तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात बारावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खून
Vipul Kadam: श्रीकांत शिंदेंचा मेहुणा भास्कर जाधवांना भिडणार, वर्षावरची खलबतं संपताच विपुल कदम कामाला लागले
बातमी फुटताच श्रीकांत शिंदेंचा मेहुणा कामाला लागला, गुहागर विधानसभेची उमेदवारी पक्की?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
नाशिकमध्ये शिंदे गटाने 7 मतदारसंघ हेरले, लोकसभेची चूक पुन्हा नाही, हेमंत गोडसेंचं मोक्याच्या क्षणी पुनवर्सन?
One Nation One Election : केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
केंद्र सरकार 3 विधेयक आणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्येच मोठा निर्णय घेणार? नेमका प्लॅन आहे तरी काय??
Ramdas Athawale : महायुतीचं जागावाटपासाठी बैठकांचं सत्र, रामदास आठवलेंनी आरपीआयचा दोन अंकी आकडा सांगितला, भाजपकडे यादी सोपवली
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटण्यापूर्वीच रामदास आठवलेंनी बावनकुळेंकडे यादी सोपवली, बच्चू कडूंना म्हणाले...
Embed widget