एक्स्प्लोर

राष्ट्रवादी प्रवेशाचे अनेक धक्के बसतील, हर्षवर्धन पाटलांनंतर नंबर कोणाचा? शरद पवारांचं सूचक वक्तव्य

हर्षवर्धन पाटलांच्या (Harshvardhan Patil) शरद पवार गटातील राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी हर्षवर्धन पाटील यांचं पक्षांमध्ये स्वागत केलं आहे.

Sharad Pawar: हर्षवर्धन पाटलांच्या (Harshvardhan Patil) शरद पवार गटातील राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हर्षवर्धन पाटील यांचं आमच्या पक्षांमध्ये स्वागत करतो असे पवार म्हणाले. राष्ट्रवादी प्रवेशाचे अशा पध्दतीचे अनेक धक्के येत्या काही काळात दिसून येतील, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. दरम्यान, हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीची विचारधारा मांडत असतील तर ते केव्हाही पक्षात येऊ शकतात, त्याचे स्वागत होईल असेही शरद पवार म्हणाले. 

हर्षवर्धन पाटलांनी भूमिका केली जाहीर

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी आज मोठा निर्णय घेतला आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा आग्रह होता की शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करावा. त्यामुळं आम्ही हा निर्णय घेत असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूरमध्ये पत्रकार परिषद घेत हा निर्णय जाहीर केला. दरम्यान, आता लवकरच हर्षवर्धन पाटील हे जाहीररित्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. 

कार्यकर्त्यांच्या आग्रहानंतर घेतला निर्णय

हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी मागणी केली. यानंतर पत्रकार परिषद घेत पाटील यांनी शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचा निर्णय गेतला आहे. मी हा निर्णय घेण्यापूर्वी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतल्याचे पाटील म्हणाले. इंदापूरची जागा ही विद्यमान सदस्याला जाणार असल्याचे फडणवीसांनी सांगितले. दुसरा पर्याय काढू असे फडणवीस म्हणाले. पण दुसरा पर्याय स्वीकारणे कार्यकर्त्यांना मान्य झाले नसते. व्यक्तिगत तो निर्णय योग्य ठरला असता, पण जनतेचा प्रश्न असतो असे पाटील म्हणाले. इंदापूर तालुक्यातील सर्व राजकीय निर्णय जनतेच्या मताने झाले आहेत. इंदापुरात कोणाच्या स्वार्थासठी निर्णय होत नाहीत असेही पाटील म्हणाले. जनतेच्या ज्या भावना आहेत त्यांच्या भावना जाणून निर्णय घेतला असल्याचे हर्षवर्धन पाटील यावेळी म्हणाले. आपला निर्णय झाल्यावर ज्या पक्षातले नेते पुढची भूमिका जाहीर करतील. तो अधिकार आपला नाही. पक्षातील नेते योग्य निर्णय गेतली असेही पाटील म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 60 News : City 60 News : Maharashtra News : 14 Dec 2024 : ABP MajhaNrusinhawadi Datta Jayanti 2024 : दत्त जयंतीनिमित्त नृसिंहवाडीत जन्मकाळ सोहळ्याचा देखावाPune Datta Jayanti 2024 : पुण्यात दत्त मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी ABP MajhaNarsobachi Wadi Datta Jayanti : दत्तजयंतीनिमित्त नरसोबाच्या वाडीत गर्दी, दर्शनासाठी रांग

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Kapoor : पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
पहिल्या चित्रपटासाठी नोकराकडून कर्ज, लता मंगेशकर म्हणाल्या होत्या, मी राज कपूरसाठी कधीही गाणार नाही! काय होता तो प्रसंग?
Nana Patole : काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले,  'त्याची चर्चा करण्याची गरज...'
काँग्रेसमधील अंतर्गत वाद अन् राजीनाम्यावर नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले 'त्याची चर्चा करण्याची गरज...'
Delhi Farmer Protest : शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
शेतकऱ्यांचा शंभू सीमेवरून दिल्लीकडे मोर्चा; पोलिसांनी रॉकेट लाँचरमधून बॉम्ब अन् गोळ्या झाडल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
Beed Crime: मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
मोठी बातमी! बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका! आशियामधील चौथा सर्वात मोठा पार्टनर असूनही घेतला निर्णय
2019 मध्ये भारताने पाकिस्तानला दणका दिला, आता स्वित्झर्लंडचा भारताला तगडा झटका!
Smita Patil : सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
सुपरस्टारच्या प्रेमात पडताच सौंदर्यावर टोमणे, तरीही बंडखोर राहिली; मृत्यूनंतर विवाहित वधूसारखी सजली
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
Allu Arjun Arrest : अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी थेट बेडरुममधून उचललं; सीएम रेवंत रेड्डींच्या प्रतिक्रियेनं सुद्धा भूवया उंचावल्या! दोघांमध्ये वाद का वाढला?
Embed widget