एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case : वाल्मिक कराडसोबत फोटो काढणं आलं अंगलट; जितेंद्र आव्हाडांच्या आक्षेपानंतर API महेश विघ्नेंची उचलबांगडी

Beed : वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे पोलीस अधिकार्‍यांना अंगलट आले आहे.  शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अक्षेपानंतर एपीआय महेश विघ्ने यांची उचलबांगडी करण्यात आली आहे.

बीड: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचा खंडणी प्रकरणातून निर्माण झालेल्य वादातून निर्घृणपणे खून करण्यात आला होता. या हत्याप्रकरणामुळे राज्यभरातील वातावरण प्रचंड तापल्यानंतर महायुती सरकारने संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास करण्यासाठी 10 जणांचे विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले होते. मात्र,  या एसआयटीमधील पोलिसांच्या विश्वासर्हतेवरच शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यात एसआयटी पथकाचे प्रमुख IPS डॉ.बसवराज तेली यांचा अपवाद वगळता इतर सर्व पोलीस अधिकारी हे वाल्मिक कराडचे पोलीस आहे, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटच्या माध्यमातून केला.

API महेश विघ्नेसह दोघांची उचलबांगडी

दरम्यान, या दाव्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले असल्याचे बघायला मिळाले आहे. कारण वाल्मिक कराड सोबत फोटो काढणे पोलीस अधिकार्‍यांना अंगलट आले आहे.  शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या अक्षेपानंतर एपीआय महेश विघ्ने यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. एपीआय महेश विघ्ने यांच्यासह इतर दोघांना एसआयटीतून बाजूला करण्यात आले आहे.  संतोष देशमुख प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराड सोबत महेश विघ्ने यांचा फोटो वायरल झाला होता. त्यानंतर राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि  राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी महेश विघ्ने यांच्या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. परिणामी या मागणीची दखल लक्षात एपीआय महेश विघ्ने यांच्यासह हवलादार मनोज वाघ यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. 

आरोपीच्या जवळचा कोणीही SIT मध्ये नको- सुरज चव्हाण

पुढे आलेल्या माहितीनुसार, हे तिन्ही कर्मचारी बीड स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी आहेत. एसआयटी मध्ये यांचा समावेश झाल्यानंतर सुद्धा बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेने त्यांना रिलीव्ह केलेले नव्हते. याचाच अर्थ हे तिघेजण आता एसआयटीचा भाग असणार नाहीत. दुसरीकडे याच मुद्यावरून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवक्ते सुरज चव्हाण यांनी आरोपीच्या कोणी जवळचा SIT मध्ये असेल तर त्याला तत्काळ दूर करा, अशी मागणी केली होती. या प्रकरणात कोणी राजकारण करू नका, त्यांना विनंती आहे आपली भूमिका हीच असली पाहिजे की त्यांना न्याय मिळायला हवा, राजकारण करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं होते.  

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada FIR: नागपूरमध्ये हिंसाचार, काय सांगते एफआयआर? त्या रात्री नेमकं काय घडलं?Sangh On Nagpur Rada : कान टोचले, नागपूरच्या राड्यानं संघानं काय मांडली भूमिका?Zero Hour Aurangjeb Kabar : संघाच्या भूमिकेनंतर औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा मागे पडणार का?Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parbhani : पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
पर्यवेक्षकाच्या वेतनातून मागितली लाच, उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिकेसह लिपीक एसीबीच्या जाळ्यात 
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
भिवंडीत 2 गोदामाला भीषण आग, सुदैवाने जिवीतहानी नाही; फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
बीडनंतर हिंगोलीतही रिल्सवाला वाळू माफिया, गळ्यात सोनं समोर नोटांचे बंडल; पोलिसांनी उतरवली भाईगिरी
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
मंत्र्यांच्या भडकाऊ भाषणाबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न?; अटलबिहारी वाजपेयींचा दाखला, फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचले
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
विठ्ठलभक्तांसाठी आनंदाची बातमी! ग्रीष्मातली चंदन पूजा असो की पाद्यपूजा, वेगवेगळ्या पूजांसाठी घरबसल्या नोंदणी करता येणार
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
गोपीचंद पडळकरांनी औंध देवस्थानाची 34 एकर जमीन लाटली; कागदपत्रे दाखवत राम खाडेंचा गंभीर आरोप
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
शेतकरी आत्महत्या थांबवायच्या असतील तर शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अमर हबीब यांचं अन्नत्याग आंदोलन 
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
नागपूरचे CP ऑन द स्पॉट, घटनास्थळाची पाहणी; फहीम खानच्या रोलबाबत रवींद्रकुमार सिंगल यांनी दिली माहिती?
Embed widget