Maharashtra Politics : ठाकरेंनी एक जागा जिंकून दाखवावी, पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणावं; भाजपचं पहिलं खुलं चॅलेंज
Girish Mahajan on MVA : शिवसेनेनं राज्यात एक जागा जिंकून दाखवावी, असं उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) आणि सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं, असं आव्हान शरद पवार यांना गिरीश महाजन यांनी दिलं आहे.
Girish Mahajan On Uddhav Thackeray and Sharad Pawar : शिवसेनेनं राज्यात एक जागा जिंकून दाखवावी असं आव्हान गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) दिलं आहे. यासोबतच शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना निवडून आणून दाखवावं असंही आव्हान त्यांनी शरद पवारांना (Sharad Pawar) दिलं आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना भाजपने पहिल्यांदाच खुलं चॅलेंज दिलं आहे. यावेळी मनोज जरांगे पाटलांवर (Manoj Jarange Patil) महाजनांनी जोरदार टीका केली आहे. गिरीश महाजन यांनी यवतमाळ एबीपी माझाशी बोलताना ही प्रतिक्रीया दिली आहे.
ठाकरे, पवारांना गिरीश महाजनांचं आव्हान
पंतप्रधान मोदींच्या सभेवर महाविकास आघाडीने टीका केल्यानंतर भाजपने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. पंतप्रधान मोदी देशभर फिरतात, आज त्यांचा तीन राज्यांमध्ये दौरा आहे. या गोष्टींवर कुण्या शेंबड्या पोरांचाही विश्वास बसणार आहे का की, पंतप्रधान मोदी हे उद्धव ठाकरेंना घाबरले आहेत आणि म्हणून मोदीजी महाराष्ट्रात येतायत. आम्ही सांगितलंय 400 पार करायचंय, मी त्यांना सांगतो की, त्यांनी किमान एक जागा निवडून आणावी, पवार साहेबांनी लेक सुप्रिया सुळेंची (Supriya Sule) जागा निवडून आणावी. उद्धव ठाकरेंनी एखादी जागा निवडून आणावी. उगाच मी वाघ आहे, असं दाखवायचं. मांजराने वाघाचं कातडं घातल्यासारखा हा प्रकार आहे, असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
यवतमाळमध्ये पंतप्रधान मोदींचा मेळावा
आज यवतमाळमध्ये पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या उपस्थित महिला बचत गटाचा महामेळावा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मेळाव्याला संबोधित करणार आहेत. याच सभेत राज्यातील रस्ते, रेल्वे आणि सिंचनाच्या 4900 कोटींच्या कामाचं लोकार्पण आणि शुभारंभ होत आहे. यासोबतच इतर अनेक सरकारी योजनांचं लोकार्पण आणि लाभार्थ्यांना लाभही प्रतिकात्मक स्वरूपात दिला जाणार आहे. या मेळाव्याच्या तयारीविषयी आणि त्या अनुषंगाने रंगलेल्या राजकारणाविषयी मेळाव्याचे मुख्य सनन्वयक मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करत तयारीचा आढावा घेतला.
मनोज जरांगे पाटलांवर निशाणा
'मनोज जरांगे ज्या अविर्भावामध्ये मोदींची सभा होणार नाही, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत, पंतप्रधान मोदींना एकेरी भाषेमध्ये बोलत आहेत. परवा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना अर्वाच्य शिवीगाळ केली, ती कुणालाही आवडणारी नाहीय आणि त्यांना असं वाटतंय की, मी म्हणेल ती पूर्व दिशा. मला वाटतं या सर्व गोष्टी त्यांच्या डोक्यात आहे, त्यातून त्यांनी बाहेर पडावं', असं म्हणत गिरीश महाजन यांनी मनोज जरांगे पाटलांवर निशाणा साधला आहे.
पाहा व्हिडीओ : ठाकरे गटाने राज्यात लोकसभा निवडून दाखवावी - गिरीश महाजन
महत्त्वाच्या इतर बातम्या :