(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Girish Mahajan meets Eknath Shinde : मोठी खाती मिळवण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरु असतानाच भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन-एकनाथ शिंदेंची भेट; काय चर्चा झाली?
Girish Mahajan meets Eknath Shinde : भाजप नेते गिरीश महाजन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
Girish Mahajan meets Eknath Shinde : गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये चांगली खाती आपल्याकडे घेण्यासाठी प्रयत्न करतोय. खासकरुन गृहखात्यावरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा आहे. त्यातच एकनाथ शिंदेंचा दिल्लीच्या लोकांनी योग्य तो सन्मान राखला गेला पाहिजे, असं वक्तव्य शिंदेंच्या सेनेचे नेते दीपक केसरकर यांनी केलं होतं. त्यानंतर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांनी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. दरम्यान, शिदेंची भेट घेतल्यानंतर महाजन यांनी पत्रकारांनी संवाद साधलाय.
गिरीश महाजन म्हणाले, एकनाथजींची तब्बेत खराब होती, थ्रोट इन्फेक्शन आहे , ताप देखील आहे. तब्बेतीचा विचारपूस करण्यासाठी मी आलो होतो. तीन चार दिवसांपासून मी वेळ मागत होतो ते गावी निघून गेल्यामुळे माझा आणि त्यांचा संपर्क झाला नाही. युतीमध्ये सगळं काही अलबेल आहे. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. एकनाथजी यांचं मत प्रामाणिक आणि स्वच्छ आहे. उद्यापर्यंत त्यांची तब्बेत ठीक होईल त्यानंतर ते बैठक देखील घेतील.
मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो
माझी त्यांच्याशी मंत्रिमंडळाबाबत कोणतेही चर्चा झाली नाही. हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. माझी एक शब्द देखील याबाबत चर्चा झाली नाही. मी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. तेच बोलले सहा डिसेंबरच्या तयारी बाबत बैठक आहे, ते बरे होतील. अजूनही त्यांना सलाईन लावलेलं आहे. उद्या पासून एकनाथजी स्वतः सगळ्या गोष्टींचे लीड घेतील. आम्ही सगळे एकत्र आहोत, असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.
शपथविधीची जागा पाहण्यासाठी बावनकुळे अचानक गेले होते
पुढे बोलताना गिरीश महाजन म्हणाले, शपथविधीची जागा पाहण्यासाठी बावनकुळे अचानक गेले होते , त्या संदर्भात कुणाशी कोर्डिनेट झाला नाही, हे खर आहे. उद्या आम्ही एकत्रित जाणार आहोत. 5 तारखेच शपथ विधी दिमाखदार होईल. यावेळी विरोधकांना प्रोटोकॉल म्हणून बोलवावं लागणार आहे. दिल्ली बैठक होणार नाही. कोणती खाती कोणाकडे राहणार या बाबतीत कोणतेही चर्चा झाली नाही. मला काहीही याबाबत माहित नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. याबाबतीत आमचे वरिष्ठ नेते देवेंद्रजी , अजितदादा आणि एकनाथजी देखील आहेत. वरिष्ठ पातळी याबाबतीत निर्णय होईल.
इतर महत्त्वाच्या बातम्या