एक्स्प्लोर

राजेश टोपेंच्या अडचणी वाढणार, घनसावंगी मतदारसंघावर ठाकरे गटाचा दावा, मविआत जागावाटपात रस्सीखेच

घनसावंगी विधानसभा मतदासंघावर (Ghansawangi assembly constituencies) शिवसेना ठाकरे गटानं दावा केला आहे. त्यामुळं माजी मंत्री राजेश टोपेंच्या अडचणी वाढणार आहेत.

Ghansawangi Vidhansabha: विधानसभेच्या निवडणुकीचा (Vidhansabha Election) रणसंग्राम सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांची धावपळ सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अशातच घनसावंगी विधानसभा मतदासंघात (Ghansawangi assembly constituencies) महाविकास आघाडीत रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळत आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजेश टोपेंचा (Rajesh Tope) बालेकिल्ला असलेल्या घनसावंगी  मतदारसंघावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेनं (Shivsena) दावा केलाय. त्यामुळं राजेश टोपे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केला दावा

जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असलेल्या जागेवर आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने दावा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदासंघावर उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी दावेदारी जाहीर केली आहे. घनसावंगी येथे आज शिवसेनेच्या वतीने मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्यात एकमताने निर्धार करत घनसावंगीची जागा ऊबाठा ला सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले, जागांचा वाद कायम 

महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्यात आला असलं, तरी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून अजूनही खल सुरूच आहे. दोन्हीकडेही सर्वच पक्षांनी जागांवर दावा केल्याने तिढा अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे अजूनही दोन-तीन दिवस महायुती आणि महाविकास आघाडीकडून जागा वाटपाच्या चर्चेमध्ये जातील असं बोललं जात आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महायुतीकडून जवळपास 240 जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडी आघाडीकडून 220 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये जागावाटप पूर्ण होण्याची शक्यता आहे. महायुतीकडे अजूनही 48 जागांवरती खल सुरूच आहे, तर महाविकास आघाडीकडून अजूनही 68 जागांवर पेच कायम आहे. त्यामुळे 20 तारखेपर्यंत या जागा निश्चित करून जागावाटप जाहीर केलं जाईल, अशी माहिती समोर येत आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीचे जागावाटप पुढील तीन ते चार दिवसात पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

Maharashtra Vidhan Sabha Elections 2024: 20 नोव्हेंबरला मतदान, 23 नोव्हेंबरला निकाल; महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, वाचा टॉप 10 मुद्दे

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Iran : होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
होर्मुझची सामुद्रधुनी फक्त शत्रूंसाठी बंद, इतरांवर हल्ले करणार नाही, इराणचे मंत्री अब्बास अराघची यांचा दावा
Latur : लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, शैक्षणिक हबमध्ये मेसचालकांसह विद्यार्थी संकटात
लातूरमध्ये व्यावसायिक गॅसअभावी हॉटेल, मेस आणि नाश्ता सेंटरला फटका, हजारो हॉटेल कामगारांचा रोजगार संकटात
Donald Trump : तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण, अमेरिका-इराण संघर्षात नवा ट्विस्ट
तुम्ही युद्धनौका पाठवा, आपण होर्मुझची सामुद्रधुनी सुरु करु, ट्रम्प यांचं जपान, फ्रान्ससह चीनला आमंत्रण
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
Embed widget