एक्स्प्लोर

Gayatri Shingne : शरद पवार साहेब, एकनिष्ठ कार्यकर्त्यांच काय? डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या घरवापसीनंतर पुतणी गायत्री शिंगणे यांचा सवाल

Gayatri Shingne : सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पुनश्च शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर शरद पवार साहेब.! निष्ठावंतांचं काय? असा सवाल गायत्री शिंगणे यांनी केला आहे.

Gayatri Shingne vs Rajendra Shingne: सिंदखेडराजाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांचा पुनश्च शरद पवार गटात प्रवेश झाल्यानंतर त्यांची पुतणी असलेली गायत्री शिंगणे यांनी शरद पवारांना सवाल केला आहे. शरद पवार साहेब...! निष्ठावंतांचं काय...? असा सवाल करत गायत्री शिंगणे यांनी सिंदखेडराजा मतदार संघातून अपक्ष लढणारच असल्याचा दावाही केला आहे. कालच मी शरद पवार साहेबांची वाय बी सेंटर येथे भेट घेतली असता त्या ठिकाणी डॉक्टर शिंगणे यांचा शरद पवार (Sharad Pawar) गटात प्रवेश होणार असल्याचा कुठेही सुतवाच नव्हता. मात्र आज त्यांचा प्रवेश झालेला आहे. हरकत नाही मी सिंदखेडराजा मतदारसंघातून अपक्ष लढणारच असल्याची पहिली प्रतिक्रिया गायत्री शिंगणे यांनी एबीपी माझाला दिली आहे.

सिंदखेड राजा मतदारसंघात काका विरुद्ध पुतणी असा सामना रंगणार? 

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांनी घरवापसी केली आहे. ते आज पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. याच मुद्यावरुन पुतणी गायत्री शिंगणे (Gayatri Shingne) यांनी राजेंद्र शिंगणे यांच्यावर जोरदार टीका केलीय. साहेब तुम्हाला माफ करतील, पण तुम्ही ना घरच्यांशी एकनिष्ठ, ना जनतेशी असे म्हणत गायत्री शिंगणे यांनी राजेंद्र शिंगणेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर दुसरीकडे सिंदखेड राजा मतदार संघाचे आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा आज राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश झाल्याने सिंदखेड राजा येथे त्यांच्या कार्यकर्त्यांनी राजमाता जिजाऊंच्या जन्मस्थळासमोर फटाके फोडून जल्लोष केला आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मिठाई देखील वाटप केली. आगामी विधानसभा निवडणुकीत डॉ राजेंद्र शिंगणे हे शरद पवार गटाकडून निवडणूक लढविण्याचा आता जवळ जवळ स्पष्ट झालं आहे. असे असले तरी डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या घरवापसीनंतर पुतणी गायत्री शिंगणे यांनी देखील याच मतदारसंघातून अपक्ष लढणारच असल्याचा दावाही केला आहे. त्यामुळे सिंदखेड राजा मतदार संघात  काका विरुद्ध पुतणी असा सामना रंगणार असल्याची शक्यता आहे.

कोण आहेत डॉ. राजेंद्र शिंगणे?

2019च्या विधानसभा निवडणुकीत राजेंद्र शिंगणे यांनी शिवसेनेचे शशिकांत खेडेकर यांचा पराभव केला होता. राजेंद्र शिंगणे यांना 81,701 मते मिळाली होती, तर शशिकांत खेडेकर यांना 72,763 मते मिळाली होती. राजेंद्र शिंगणे 8938 मतांनी विजयी झाले होते. अशातच राजेंद्र शिंगणे पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतणार आणि शरद पवारांकडून त्यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा होत असताना गायत्री शिंगणे यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध करत अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली आहे, ही पक्षासाठी मोठी डोकेदुखी होऊ शकते

हे ही वाचा 

 बालरोग तज्ञ म्हणून कार्यरत , M.J. ( mass com ) नंतर गेल्या तीन वर्षापासून एबीपी माझा साठी कार्यरत.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Civic Polls: 'निवडणूक आयोगाचा कारभार दस नंबरी, मालक भाजप', विरोधकांचा घणाघात
Maha Civic Polls: 'दुसऱ्या केंद्रावर मतदान करणार नाही', Double Star मतदारांकडून Declaration घेणार: Dinesh Waghmare
Maharahtra Politics : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर
Wrestler Arrested: 'तो पूर्णतः निर्दोष आहे', आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू Sikandar Shaikh ला शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणी जामीन
Chhattisgarh Train Accident: बिलासपूरमध्ये भीषण अपघात, लोकल-मालगाडीच्या धडकेत अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhattisgarh Train Accident : छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
छत्तीसगडमध्ये पॅसेंजर- मालगाडीची समोरासमोर धडक, सहा प्रवाशी ठार, रेल्वेचे अनेक डबे रुळावरून खाली
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 नोव्हेंबर 2025 | मंगळवार
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Video: तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयुक्तांचा व्हिडिओ पाहून संतापले राज ठाकरे, महाराष्ट्राला आवाहन
Election Commission : शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
शौचालयात नोंदवलेला मतदार कुठला, राज ठाकरेंचा प्रश्न, निवडणूक आयोगाचं उत्तर ऐका!
Maharashtra Elections : दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
दुबार मतदार कसं रोखणार? निवडणूक आयोगाने 'डबर स्टार चिन्हा'ची स्ट्रॅटेजी सांगितली
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
गोपीनाथ मुंडेंची खरी वारस मीच, ना भाऊ-ना बहिणी फक्त करुणा वहिनी; करुणा शर्मांची अजित पवारांवरही कडवी टीका
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
निवडणुका पुढे ढकलल्या असत्या तर काय बिघडलं असतं? निवडणूक आयोगाच्या निर्णयावर मी समाधानी नाही : संजय गायकवाड
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर; निवडणूक आयोगाचे 10 महत्त्वाचे मुद्दे
Embed widget