एक्स्प्लोर

मोठी बातमी! विधानसभा निवडणुकांचा परिणाम; राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या

सध्या राज्यातील 7 हजार 109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. साधारण नोव्हेंबर महिन्यात या निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या होत्या

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या (Election) लवकरच घोषणा होणार असून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष तिकडे लागले आहे. मात्र, या घोषणा होण्यापूर्वीच राज्यात काही जिल्ह्यात जाहीर करण्यात आलेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या तारखा आता पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. राज्यातील 29 हजार 429 निवडणुका सध्या प्रलंबित असून गेल्या काही महिन्यांपासून त्या सातत्याने पुढे ढकलण्यात येत आहेत. आता, विधानसभा निवडणुकांचे कारण देत ह्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे, सहकारी (Sahkar) क्षेत्रातील निवडणुकांचा गुलाल उधळण्याअगोदर विधानसभा निवडणुकांचा गुलाल उधळण्यात येईल, हे निश्चित झालं आहे. 

सध्या राज्यातील 7 हजार 109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. साधारण नोव्हेंबर महिन्यात या निवडणुकांच्या तारखाही जाहीर झाल्या होत्या. त्यामध्ये, दूध संघ, बाजार समिती, जिल्हा बँक व पतसंस्थांच्या निवडणुकी घेण्यात येणार होत्या. मात्र, राज्य सरकारच्या सहकार व पणन विभागाने या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे, 31 डिसेंबर 2024 नंतरच या निवडणुका होणार आहेत. राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 73 कब मधील तरतुदी नुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणामार्फत राबविण्यात येते. ज्याअर्थी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरण, पुणे यांच्या कार्यालयाकडून 4 ऑक्टोबर 2024 रोजीच्या पत्राव्दारे शासनास प्राप्त झालेल्या अहवालानुसार सन 2024-25 या वर्षात राज्यातील 29,429 सहकारी संस्थांची निवडणूक प्रलंबित असून त्यापैकी 7,109 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. जून, 2024 मध्ये राज्यातील पावसाची परिस्थिती विचारात घेऊन शासनाने 20 जून 2024 रोजीच्या आदेशान्वये राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुका आणखी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

सन 2024 मध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने विधानसभा निवडणुक पुर्वतयारीसाठी तसेच प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांनी सहकार विभागातील अधिकारी / कर्मचारी यांची सेवा अधिग्रहित केल्यास सहकारी संस्थांच्या निवडणूका पार पाडण्यात येणाऱ्या अडचणी विचारात घेता राज्यातील सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलणे उचित होईल, अशी शासनाची धारणा आहे. त्यानुसार, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 मधील कलम 73 कक मधील तरतुदीनुसार राज्य विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

31 डिसेंबरपर्यंत निवडणुका पढे

राज्यातील 250 किंवा त्यापेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था तसेच ज्या प्रकरणी सर्वोच्च/मा. उच्च न्यायालयाने सहकारी संस्थेची निवडणूक घेण्याचे आदेशित केले आहे, अशा सहकारी संस्था तसेच, निवडणूक प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर केवळ संस्थेचे अध्यक्ष /उपाध्यक्ष निवड बाकी आहे अशा सहकारी संस्था वगळून राज्यातील अन्य सर्व सहकारी संस्थांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करून 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा

हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने अडचणी वाढल्या; तिसरा पर्याय देण्याच्या हालचाली, त्याच जागी मेळावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM N DCM at Chaitya Bhoomi : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमी येथे बाळासाहेबांना अभिवादनABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 8 AM 06 December 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सPratap Sarnaik On Mahayuti : प्रताप सरनाईक मंत्रिपदासाठी इच्छूक! शिवसेनेला १४ मंत्रिपदांची अपेक्षाTop 70 at 7AM Superfast 06 December 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
एक-दोन नव्हे तर 11 खेळाडूंचा वाढदिवस, श्रेयस अय्यर कर्णधार, 'बर्थडे बॉईज'च्या प्लेइंग-इलेव्हनमध्ये कोण कोण?
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष, मंचावर काय घडलं?
राज्यपालांनी अभिनंदन करताच देवेंद्र फडणवीस पुढं निघाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थांबवलं, कार्यकर्त्यांचा जल्लोष
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
निवडणुकीआधी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश, आता त्याच नेत्यानं गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
Video: एक तर तू राहीन किंवा मी, उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावर देवेंद्र फडणवीस पहिल्याच पत्रकार परिषदेत म्हणाले...
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
देवाभाऊंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या....
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
मारकडवाडीत रद्द पण अकोल्यातील दोन गावांत बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान; ग्रामस्थांचं EVM ला आव्हान
Maharashtra CM Oath Ceremony सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
सचिन तेंडुलकर ते अंबानी, मोदींची फडणवीसांना शाबासकी; शपथविधी सोहळ्यातील क्षणचित्रे
Embed widget