Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
CM Eknath Shinde Speech in Kolhapur : 2014 ला तेच झालं, 2019 ला तेच झालं आता 2024 ला तुमचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
![Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका Eknath Shinde s venomous criticism of Rahul Gandhi s condition that he should not be politician living under protection of his mother INDIA Alliance Maharashtra Politics Marathi news Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/9d4f15ef660a7adcc7ad949e62eadf361714223749236322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : महाराष्ट्रातील जनता पंतप्रधान मोदींजींसोबत (PM Narendra Modi) आहे. जेवढे जास्त आरोप, टीका कराल, तेवढी अधित जनता मोदींसोबत येईल, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी इंडिया आघाडीवर (INDIA Alliance ) निशाणा साधला आहे. 2014 ला तेच झालं, 2019 ला तेच झालं आता 2024 ला तुमचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राच घर-घर मोदी, मन-मन मोदी आहे. संजय मंडलिक आणि धनंजय माने यांचा विजय निश्चित आहे, असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रचारसभेत ते बोलत होते
मोदींच्या गॅरेंटीच्या आडवा जो येईल त्यांचा काटा किर्रर्रर्र होईल.
एकनाथ शिंदे म्हणाले, महायुतीच्या सभेसाठी लाखो नागरिक उपस्थित राहिले त्यांचे स्वागत आहे. धनुष्यबाण आला आणि पंजा कायमचा गेला. इथला मतदार धनुष्यबाण समोरील खटक्यावर बोट दाबेल. संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांना मत म्हणजे मोदींना मत. मोदी विकासासोबत वारसा देखील जपत आहेत. देशाला जगात सन्मान मिळवून देण्याची गॅरेंटी. मोदींच्या गॅरेंटीच्या आडवा जो येईल त्यांचा काटा किर्रर्रर्र होईल, अशा इशाराही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
कोल्हापुरात 12 दिवस महापुरात रस्त्यावर होतो. गर्भवती महिलेची पूरातून सुटका केली. महापुरात लोकांना जनावरांना जपणारे कुठे आणि 26 जुलैच्या पुरात बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेऊन स्वत: फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणारे कुठे आहेत, हा फरक सगळ्यांना कळतोय.
ठाकरेंचा मुलगा आज काँग्रेसला मतदान करणार
बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, काँग्रेससोबत जावं लागेल, त्यावेळी माझं दुकान बंद करेन. पण त्याच ठाकरेंचा मुलगा आज काँग्रेसला मतदान करणार आहे. जनाची नाही तरी, मनाची तरी लाज ठेवली पाहिजे होती. उबाठाची आता पूर्ण काँग्रेस झाली आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती, त्याचा अभिमान बाळगत आहेत.
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको
आईच्या निधनाचं दुःख बाजूला सारून तातडीने देशाच्या सेवेत आले, असे पंतप्रधान हवेत. आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको. इंडिया आघाडीसाठी सत्ता ही भगवान है और भ्रष्टाचार ही धर्म आहे. एक मोदी सबको भारी है. आपण भाग्यवान आहोत की, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला भेटले आहेत. अब की बार 400 पारमध्ये कोल्हापूरचे दोन खासदार पाहिजेत, असं आवाहन एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरकरांना केलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mahayuti Rally in Kolhapur : कोल्हापुरात शाहू महाराजांचा थेट उल्लेख मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी सपशेल टाळला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)