Mahayuti Rally in Kolhapur : कोल्हापुरात शाहू महाराजांचा थेट उल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शाहू महाराजांचा ओझरता उल्लेख केला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी आपल्या भाषणामध्ये शाहू महाराजांचा उल्लेख सपशेल टाळला.
![Mahayuti Rally in Kolhapur : कोल्हापुरात शाहू महाराजांचा थेट उल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला kolhapur loksabha In Kolhapur the Chief Minister eknath shinde and Deputy Chief Minister devendra fadnavis completely avoided mentioning Shahu Maharaj directly Mahayuti Rally in Kolhapur : कोल्हापुरात शाहू महाराजांचा थेट उल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/27/afb4433daf65c94d5131b6e349a1f3cd1714226006036736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा झाली. या सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. मात्र, कोल्हापूरचे उमेदवार शाहू महाराज यांच्यावर कोणतेही वक्तव्य केले नाही. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शाहू महाराजांचा ओझरता उल्लेख केला. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शाहू महाराजांचा उल्लेख टाळला. फडणवीस यांनी ही लढत राहुल गांधी विरुद्ध मोदी अशी असल्याचे सांगितले. संजय मंडलिक यांना मत म्हणजे मोदींना मत असल्याची प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, कोल्हापुरात 12 दिवस महापुरात रस्त्यावर होतो. त्यावेळी गर्भवती महिलेची पूरातून सुटका केली. कोल्हापुरात महापुरात जनावरांना जपणारे कुठे आणि 26 जुलैच्या पुरात बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेऊन फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणारे कुठं? हे सगळ्यांना कळत असल्याचे ते म्हणाले. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की काँग्रेससोबत जावं लागेल, त्यावेळी माझं दुकान बंद करेन. पण त्याच ठाकरेंचा मुलगा आज काँग्रेसला मतदान करणार आहे. जणाची नाही तरी मनाची तरी लाज ठेवली पाहिजे होती. उबाठाची आता पूर्ण काँग्रेस झाली आहे. ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी होती त्याचा अभिमान बाळगत आहेत.
त्यांनी सांगितले की, आईच्या निधनाचे दुःख बाजूला सारून तातडीने देशाच्या सेवेत आले असे पंतप्रधान हवेत. आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको. इंडिया आघाडीसाठी सत्ता ही भगवान है और भ्रष्टाचार ही धर्म आहे. एक मोदी सबको भारी है. आपण भाग्यवान आहोत की असे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्याला भेटले आहेत. अब की बार 400 पारमध्ये कोल्हापूरचे दोन खासदार पाहिजेत.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)