एक्स्प्लोर

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: उद्धव ठाकरे शिंदेंच्या 'त्याच' आमदारांना पुन्हा प्रवेश देणार, नेमक्या अटी काय?

Shiv Sena vs Thackeray Group : लोकसभा निकालांनंतर एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतले 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात, एबीपी माझाला ठाकरे गटातल्या वरिष्ठ नेत्याची माहिती.

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra Politics) पुन्हा राजकीय भूकंप घडण्याची चिन्ह असून लवकरच पुन्हा एक नवा धक्का महाराष्ट्राच्या (Maharashtra News) जनतेला बसण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती ठाकरे गटाच्या (Thackeray Group) एका वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाला दिली आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच, यामुळे आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप (Maharashtra Political Crisis) पाहायला मिळणार का? अशाही चर्चा रंगल्या आहेत. 

लोकसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकांचा निकाल यादरम्यान, एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. प्रामुख्यानं मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील आमदार ठाकरेंच्या संपर्कात आहे, अशी माहिती मिळत आहे. लोकसभा निकालानंतर शिंदे गटाला हा सर्वात मोठा धक्का असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही टोकाची प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशाच आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याची माहिती ठाकरे गटाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. लवकरच या आमदारांची घरवापसी होणार असून ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. 

आमदारांचा आकडा 40 असू शकतो : सचिन अहिर 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी एबीपी माझाला याबाबत प्रतिक्रिया दिला. ते म्हणाले की, "6 ते 7 हा आकडा कुठून आला मला माहिती नाही, पण हा आकडा 16ही असू शकतो, 20 सुद्धा असू शकतो किंवा 40 देखील असू शकतो."

"ज्या लोकांना वाटलं की, आता आमचंच सरकार राहणार आहे, आता आम्हीच निवडून येणार आहोत, ज्यांनी शपथ घेऊन सांगितलेलं आता एकाही आमदार-खासदाराला मी सोडू देणार नाही, आता निकालानंतर अस्वस्थता वाढणारच, त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावण झालं आहे. याचा पश्चाताप त्यांना होत असेल तर ते ती संख्या सहा नाही, तर 10 किंवा 20 असू शकते.", असं सचिन अहिर म्हणाले आहेत. 

"आता लोकसभा निवडणुकांमध्येही अनेक आमदारांनी, अपक्ष नेत्यांनी आमचा विचार करा, अशी गळ घातली होती. आम्ही लोकसभेत मदत करतो, विधानसभेत आमचा विचार करा, असंही त्यांनी सांगितलं. पण, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं. पण त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की, दरवाजे बंद आहेत."

पाहा व्हिडीओ : Thackeray vs Shinde : निकालानंतर शिंदेंना धक्का? 5-6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात? Shiv Sena News

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

एकनाथ शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; निकालानंतर मुख्यमंत्र्यांना सर्वात मोठा धक्का बसण्याची चिन्ह!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Big Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाBig Fight Vidarbh : विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात बिग फाईटBig Fight Vidarabh Vidhansabha : नंदुरबार, नवापूर, सिंदखेडा विदर्भाच्या बिग फाईटShrikant Shinde Rally | प्रचाराचा शेवटचा दिवस, महायुतीसाठी श्रीकांत शिंदेंचा रोडशो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget