एक्स्प्लोर

एकनाथ शिंदेंचे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; निकालानंतर मुख्यमंत्र्यांना सर्वात मोठा धक्का बसण्याची चिन्ह!

शिंदे गटाचे 5 ते 6 आमदार ठाकरेंच्या संपर्कात? ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्याची एबीपी माझाला माहिती. लोकसभा निकालानंतर शिंदे गटाला धक्का बसण्याची शक्यता, निवडणुकीदरम्यान आणि निकालानंतर सहा आमदारांचा ठाकरेंशी संपर्क : सूत्र

Uddhav Thackrey vs Eknath Shinde: मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election 2024) निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aaghadi) बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळालं. महायुतीला राज्यात अवघ्या 17 जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा (Maha Vikas Aaghadi) 31 जागांवर विजय झाला आहे. आता लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अशातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. शिंदेंचे काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. ठाकरे गटाच्या (Thackeray Group) वरिष्ठ नेत्यानं एबीपी माझाला यासंदर्भात माहिती दिली आहे.  यामुळे राज्यात आता पुन्हा राजकीय भूकंप पाहायला मिळणार का? अशा चर्चांना उधाण आलं आहे.  

लोकसभा निवडणुकी दरम्यान आणि लोकसभा निवडणूक निकालानंतर शिवसेना शिंदे गटाच्या सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला दिली आहे. पक्ष फुटीनंतर ज्या आमदारांनी शिवसेना ठाकरे गटावर टोकाचा विरोध करणं टाळलं किंवा ठाकरेंच्या विरोधात कुठल्याही प्रतिक्रिया न देता शिवसेना शिंदे गटात राहूनसुद्धा तटस्थ भूमिका ठेवली, अशा आमदारांचा ठाकरे गटात प्रवेश होण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. 

ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार : सूत्र

आतापर्यंत एकूण सहा आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटात घेत असताना ज्या आमदारांनी तटस्थ भूमिका घेतली, त्यांचाच विचार ठाकरे गटाकडून केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार प्रामुख्यानं ठाकरेंच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. 

6 ते 7 नाहीत, हा आकडा 40 असू शकतो : सचिन अहिर 

शिवसेना ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी एबीपी माझाला याबाबत प्रतिक्रिया दिला. ते म्हणाले की, "6 ते 7 हा आकडा कुठून आला मला माहिती नाही, पण हा आकडा 16ही असू शकतो, 20 सुद्धा असू शकतो किंवा 40 देखील असू शकतो. कारण ज्या लोकांना वाटलं की, आता आमचंच सरकार राहणार आहे, आता आम्हीच निवडून येणार आहोत, ज्यांनी शपथ घेऊन सांगितलेलं आता एकाही आमदार-खासदाराला मी सोडू देणार नाही, आता निकालानंतर अस्वस्थता वाढणारच, त्यांच्या मतदारसंघात, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचं वातावण झालं आहे. याचा पश्चाताप त्यांना होत असेल तर ते ती संख्या सहा नाही, तर 10 किंवा 20 असू शकते."

"आता लोकसभा निवडणुकांमध्येही अनेक आमदारांनी, अपक्ष नेत्यांनी आमचा विचार करा, अशी गळ घातली होती. आम्ही लोकसभेत मदत करतो, विधानसभेत आमचा विचार करा, असंही त्यांनी सांगितलं. पण, आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं. पण त्यावेळी आम्ही स्पष्ट सांगितलेलं की, दरवाजे बंद आहेत."

एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे शिवसेनेचे आमदार (Shiv Sena MLA With Eknath Shinde)

  1. एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
  2. अनिल बाबर (Anil Babar) (निधन झाल्यामुळे जागा रिक्त)
  3. शंभूराजे देसाई (Shambhuraj Desai)
  4. महेश शिंदे (Mahesh Shinde)
  5. शहाजी पाटील  (Shahaji Patil)
  6. महेंद्र थोरवे (Mahendra Thorve)
  7. भरतशेठ गोगावले (Bharat Gogawale)
  8. महेंद्र दळवी (Mahendra Dalawi)
  9. प्रकाश अबिटकर (Prakash Abitkar)
  10. डॉ. बालाजी किणीकर (Balaji Kinikar)
  11. ज्ञानराज चौगुले (Dyanraj Chaugule)
  12. प्रा. रमेश बोरनारे (Ramesh Bornare)
  13. तानाजी सावंत (Tanaji Sawant)
  14. संदीपान भुमरे (sandipan Bhumare) (लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार)
  15. अब्दुल सत्तार नबी (Abdul Sattar)
  16. प्रकाश सुर्वे (prakash surve)
  17. बालाजी कल्याणकर (Balaji Kalyankar)
  18. संजय शिरसाट  (Sanjay Shirsat)
  19. प्रदीप जयस्वाल (Pradip Jayswal)
  20. संजय रायमुलकर (sanjay Raymulkar)
  21. संजय गायकवाड  (Sanjay Gaikwad)
  22. विश्वनाथ भोईर (Vishwanath Bhoir)
  23. शांताराम मोरे (Shantaram More)
  24. श्रीनिवास वनगा (shrinivas Wanga)
  25. किशोरअप्पा पाटील (Kishor Patil)
  26. सुहास कांदे (Suhas Kande)
  27. चिमणआबा पाटील (Chiman Aaba Patil)
  28. सौ. लता सोनावणे (Lata Sonawane)
  29. प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik)
  30. सौ. यामिनी जाधव (Yamini Jadhav)
  31. योगेश कदम (Yogesh Kadam)
  32. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
  33. मंगेश कुडाळकर (Mangesh Kudalkar)
  34. सदा सरवणकर (Sada Sarvankar)
  35. दीपक केसरकर(Dipak Kesarkar)
  36. दादा भुसे (Dada Bhuse)
  37. संतोष बांगर (Santosh Bangar)
  38. रवींद्र वायकर (Ravindra Waikar) (लोकसभा निवडणुकीतील विजयी उमेदवार)
  39. संजय राठोड (Sanjay Rathod)

पाहा व्हिडीओ : Shivsena Breaking : एकनाथ शिंदेंचे काही आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात?

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Babasaheb Ambedkar Jayanti 2026 : राज्यभरात महामानवाला अभिवादन, चैत्यभूमीवर लोटला भीमसागर; मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन  
राज्यभरात महामानवाला अभिवादन, चैत्यभूमीवर लोटला भीमसागर; मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन  
Nashik Crime News: त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाचं काळाबाजार प्रकरण भोवलं, शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; नेमकं काय घडलं?
त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनाचं काळाबाजार प्रकरण भोवलं, शरद पवार गटाच्या नेत्याला बेड्या; नेमकं काय घडलं?
Ashok Kharat Case Nashik Crime News: अशोक खरात केबिनमध्ये महिलांसोबत नको नको ते करायचा; सासू पार्वती म्हणाल्या, तो तिकडे जाऊन...
अशोक खरात केबिनमध्ये महिलांसोबत नको नको ते करायचा; सासू पार्वती म्हणाल्या, तो तिकडे जाऊन...
SC Reservation:अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आमदाराचा सरकारला घरचा आहेर, 'अनंत बदर' समितीच्या स्थापनेवरही संशय
अनुसूचित जातीच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सत्ताधारी आमदाराचा सरकारला घरचा आहेर, 'अनंत बदर' समितीच्या स्थापनेवरही संशय

व्हिडीओ

Asha Bhosle Funeral : सूरसम्राज्ञी आशा भोसलेंना अखेरचा निरोप
Donald Trump Post Ai Image Himself Jesus Christ : आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या निशाण्यावर पोप लिओ.. Special Report
Iran Us And China : इराण-अमेरिका युद्धामुळे बेहाल पण चीन मालामाल Special Report
Palghar Crime : लव्ह, सेक्स आणि धोका... पालघरमधील धक्कादायक प्रकार
Ashok Kharat : अशोक खरातच्या दारावर ईडी, तपासाची 'साप' शिडी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime news: दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
दादरमध्ये टोळक्याने तरुणाला बेदम मारलं, पत्नी सिद्धिविनायक मंदिरातून धावत आली पण नवऱ्याने जीव सोडला
Sanju Samson Close Friend Tovino Thomas: संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
संजू सॅमसनचा जिगरी यार 'हा' सुपरस्टार अभिनेता; 26 कोटींच्या बजेटमध्ये केलीय 176 कोटींची कमाई, रात्री 2-2 वाजेपर्यंत दोघांच्या सुरू असतात गप्पागोष्टी
ED arrests IPAC Vinesh Chandel: ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
ईडीने पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करणाऱ्या 'आयपॅक'च्या प्रमुखालाच उचललं, निवडणुकीच्या तोंडावर झटका
Vaibhav Suryavanshi RR vs SRH IPL 2026: हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला, तिथेच वैभव सूर्यवंशीचा गेम झाला
वैभव सूर्यवंशी हैदराबादची बँटिग संपण्यापूर्वीच ड्रेसिंग रुममध्ये हेल्मेट अन् पॅड चढवून थाटात बसला अन्...
Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात मालमत्तांवर ईडीची मोठी छापेमारी, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले; नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन
भोंदू अशोक खरात प्रकरणात ईडीच्या हाती मोठं घबाड, नाशिक, शिर्डीसह पुण्यात सर्च ऑपरेशन, कोट्यवधींच्या मालमत्तांचे पुरावे सापडले
Bhushan Pradhan Is Getting Married: लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
लाखो तरुणींच्या हृदयाचा चक्काचूर; हँडसम हंक असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्यानं गुपचूप उरकला साखरपुडा, अंगठी घातलेला फोटो शेअर म्हणाला...
CMRF : मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी, रुग्णालयांमार्फत अर्जाची सुविधा
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू, 8 तासात अर्जाला मंजुरी मिळणार
Paratwada Crime : तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, अमरावती अश्लील व्हिडीओ प्रकरणात आरोपीवर POCSO गुन्हा दाखल
Embed widget