(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vedanta Foxconn Project: राजकीय दबावापोटी प्रकल्प गुजरातला गेला, अजित पवार यांची शिंदे सरकारवर टीका
Vedanta Foxconn Project: वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
Vedanta Foxconn Project: वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर (Vedanta Foxconn Semiconductor) प्रकल्पाच्या मुद्यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. राजकीय दबावापोटी प्रकल्प गुजरातला गेला असल्याची टीका पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली आहे.
अजित पवार म्हणाले की, आमच्या सरकार असताना हे मोठे प्रकल्प राज्यात येणार होते. अनेक उद्योग येणार होते. वेदांताच्या वरिष्ठ टीमने सुद्धा तळेगाव हीच योग्य जागा सांगितलं होत. त्याच वेळी त्या कंपनीने महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेशमध्ये पाहणी केली होती. नंतर 100 गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र अंतिम केलं होतं. ही गुंतवणूक राजकीय दबावापोटी गुजरातमध्ये गेली. ही गुंतवणूक राज्यातून जाणं योग्य नाही. 2 लाख लोकांचा, रोजगार 2 लाख कोटींची गुंतवणूक गेली आहे.
अजित पवार पुढे म्हणाले की, पंतप्रधान आश्वासन दिलं आहे, ठीक आहे. तो ही प्रकल्प यावा, कारण बेरीजगरी खूप आहे. आपल्याकडे प्रकल्पांची गरज आहे. उद्योग बाबत कुणाच्याही दबावाला बळी पडू नये, ही आपली परंपरा नाही. ते म्हणाले, अजूनही वेळ गेली नाही. कॅबिनेटमध्ये काय हवं तो निर्णय घ्यावा आणि प्रोजेक्ट राज्यात आणावा. ही गुंतवणूक जाऊ नये, हा आर्थिक मागास करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही चर्चा केली, आम्ही सगळं केलं होतं. त्यामुळं हा उद्योग जाणं आम्हालाही अपेक्षित नव्हतं. आमचं सरकार कमी पडले नाही. आमच्यावरील आरोप खोटे असल्याचं अजित पवार म्हणाले आहेत.
तत्पूर्वी या प्रकल्पाच्या वादावरून उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली. ते म्हणाले आहेत की, महविकास आघाडी सरकारने कधीच वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला पॅकेज दिले नाही. मविआ सरकारच्या काळात हाय पॉवर कमिटीची बैठकदेखील झाली नाही. ही बैठक झाली असती तर वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नसता. सामंत म्हणाले, ज्या सात महिन्यात त्यांना अधिकचे पॅकेज देण्यात यायला हवे होते, त्यावेळेस ते दिले गेले नाही. यामुळेच कंपनी राज्याबाहेर गेली. पण हे सत्य लपवून आमच्यावर आरोप केले जात आहेत. तसेच त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात असाच किंवा यापेक्षाही मोठा प्रकल्प राज्यात येत्या काही दिवसात येईल.
संबंधित बातम्या:
Vedanta Foxconn : ...तर वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात असता; उदय सामंत यांचा दावा
Aditya Thackeray : रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा नवा आरोप