Maratha Reservation:'दरेकरांसह नारायण राणेंची कानउघाडणी करा', मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवेंना घेरलं..
मराठा आरक्षणासंदर्भात दुटप्पी भूमिका घेणे थांबवावं असं म्हणत मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी दोन महिने मुदत देऊनही आम्हाला आरक्षण का दिलं नाही? असा सवाल करत घेरल्याचं दिसून आलं.
![Maratha Reservation:'दरेकरांसह नारायण राणेंची कानउघाडणी करा', मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवेंना घेरलं.. Dharashiv Maratha Protester comment on Ravsaheb Danve saying take actions on Pravin Darekar Narayan Rane Criticism on Manoj Jarange Maharashtra Politics Maratha Reservation:'दरेकरांसह नारायण राणेंची कानउघाडणी करा', मराठा आंदोलकांनी रावसाहेब दानवेंना घेरलं..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/14/a2c17ec8cad342930127e6092050f0f317236415563681063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maratha Reservation: राज्यात एकीकडे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलन आक्रमक स्वरूप घेताना दिसत आहे. धाराशिव मध्ये राज ठाकरेंना हॉटेलमध्ये घुसत मराठा कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्यानंतर आज मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांना घेरलं.
मराठा आरक्षणासंदर्भात दुटप्पी भूमिका घेणे थांबवावं असं म्हणत मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी दोन महिने मुदत देऊनही आम्हाला आरक्षण का दिलं नाही? असा सवाल करत घेरल्याचं दिसून आलं. मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांच्या बद्दल प्रवीण दरेकर प्रसाद लाड नारायण राणे यांनी अपशब्द काढले आहेत. त्याबद्दल दानवेंनी त्यांच्याशी बोलावं मागणीही त्यांनी केली. राज्यात कुठेही आंदोलन होत नसल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितल्यानंतरही धाराशिवमध्ये मराठा समाजातील कार्यकर्त्यांचा आंदोलन सुरू असल्याचे दिसून येत आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे?
मराठा समाजाला आरक्षण देण्याची भाजपची स्पष्ट भूमिका आहे. आरक्षणा मी दिलंही होतं. पण दिलेला आरक्षण न्यायालयाच्या विरोधात आहे. मधल्या काळात सत्तांतर झालं. त्यानंतर हा विषय सर्वोच्च न्यायालयात पुन्हा घेतला गेला. त्यामुळे हा प्रश्न प्रलंबित आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून धाराशिवमध्ये आज मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत मराठा आंदोलकांनी भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे दोन महिन्यांची मुदत देऊन सुद्धा आम्हाला आरक्षण का दिल जात नाही असा सवाल केला. यावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची स्पष्ट भूमिका असल्याचा रावसाहेब दानवे यांनी सांगितलं.
दरेकर नारायण राणे यांची कानउघडणी करा
मुंबईमध्ये नारायण राणे, प्रवीण दरेकर, हे मनोज जरांगेंवर आरोप करत असतात. ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही त्यांची कान उघडणे करा अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. मनोज जरांगे समाजासाठी काम करतात त्यामुळे त्यांच्यावर संयमाने भूमिका घ्यावी असं रावसाहेब दानवे म्हणाले. संयम सोडू नये. तसेच तुमच्यासारख्या सुशिक्षित तरुणांनी हे आंदोलनात भाग घेतल्यामुळे संघर्ष होत असल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)