एक्स्प्लोर

Laxman Hake: एका बाजूला स्वत:ला 96 कुळी म्हणायचं अन् दुसरीकडे मागासवर्गाचं आरक्षण मागायचं, लक्ष्मण हाकेंची जरांगेंवर टीका

OBC Reservation & Maratha Reservation: राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात मराठा शांतता रॅली काढून वातावरण तापवत आहेत. मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत

पुणे: मनोज जरांगे पाटील हा बिनबुडाचा लोटा आहे. ज्या लोकांनी मनोज जरांगे पाटील यांना आंदोलन करायला प्रवृत्त केले त्या लोकांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटील यांनी पाठिंबा दिला आणि ओबीसी उमेदवार पाडण्याचे काम केले. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असे वक्तव्य ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी केले. एका बाजुला जरांगे स्वत:ला 96 कुळी मराठे आहोत म्हणतात आणि दुसरीकडे मागासवर्गीयांच्या ओबीसीतून आरक्षण (OBC Reservation) मागतात. हा प्रचंड विरोधाभास असून ही गोष्ट हास्यास्पद आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी 288 उमेदवार रिंगणात उतरवल्यास ओबीसी समाजाने आणि सुज्ञ नागरिक याचा जाब मनोज जरांगे यांना नक्की विचारतील, असा विश्वास हाके यांनी व्यक्त केला. ते बुधवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

यावेळी लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. वडीगोद्री येथे केलेले उपोषण सोडताना सरकारने काही आश्वासने दिली होती. त्याची पुर्तता अद्याप केलेली नाही, असे त्यांनी म्हटले.  ⁠मनोज जरांगे यांच्याकडून राज्यभरात काढण्यात येणाऱ्या मराठा शांतता रॅलीला आमचा आक्षेप आहे. शांतता रॅलीला शाळा का बंद ठेवल्या जातात? याचा अर्थ आम्ही कायदा आणि सुव्यवस्था सरकार पाळू शकत नाही का?, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला.

सरकार जरांगेंना रेड कार्पेट घालतंय, आमच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत: लक्ष्मण हाके

राज्यातील बोगस कुणबी नोंदीवर आम्ही आक्षेप घेतला होता. मात्र, त्यावर सरकारने काहीही कारवाई केलेली नाही, असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे  मनोज जरांगे यांना रेड कार्पेट घालत आहेत. ⁠जरांगे यांच्या शांतता रॅलीमुळे ओबीसींमध्ये अस्वस्थता आहे. त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण आहे. ⁠शरद पवार यांनी सर्वपक्षीय तसेच ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांच्या एकत्रीत बैठक बोलवनाच्या सुचनेचे आम्ही स्वागत करतो. आम्ही या बैठकीला नक्की जाऊ, असे हाके यांनी म्हटले.

प्रशासनामार्फत तीन वर्षांपासून नगरपालिका, महापालिका, जिल्हा परीषदेचा कारभार चालवला आहे. त्याला राज्य सरकार जबाबदार आहे. त्यामुळे ओबीसींचे हक्क डावलले जात असल्याचा आरोप हाके यांनी केला.

आणखी वाचा

मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचंय पण फडणवीस देऊ देत नाहीत, फडणवीसांना संपवा संपवी खात्याचा मंत्री करावं, जरांगेंचा प्रहार 

थेट मागणी नाही पण पाठिंब्याची इच्छा! मीनल खतगावकरांनी घेतली मनोज जरांगेंची भेट

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण

व्हिडीओ

Asaduddin Owaisi Amravati Speech: मुलं जन्माला घालण्याच्या विधानावरुन ओवैसींचा राणा,भागवतांवर निशाणा
Parbhani Akola Special Report : समस्या बेसुमार, मतदानावर बहिष्कार;परभणी अकोल्यातील नागरिकांचा निर्णय
Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pimpri-Chinchwad Election 2026: अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
अर्ज छाननीमध्ये अपक्ष ठरल्या, चिन्ह वाटपात थेट घड्याळाच्या उमेदवार झाल्या. पिंपरी चिंचवडमध्ये नेमकं काय घडलं?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली थिअरी
Jay Dudhane First Reaction After Arrested: मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
मी हनिमूनसाठी जात होतो आणि...; अटकेनंतर जय दुधाणे नेमकं काय म्हणाला?
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Embed widget