एक्स्प्लोर

मुख्यमंत्र्यांना आरक्षण द्यायचंय पण फडणवीस देऊ देत नाहीत, फडणवीसांना संपवा संपवी खात्याचा मंत्री करावं, जरांगेंचा प्रहार 

राज्यात एक संपवा संपवी खातं निघालं पाहिजे आणि ते खातं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिलं पाहिजे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली.

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : राज्यात एक संपवा संपवी खातं निघालं पाहिजे आणि ते खातं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे दिलं पाहिजे, असं म्हणत मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी जोरदार टीका केली. या मंत्री पदासाठी फडणवीस योग्य असल्याचे ते म्हणाले. त्यांनी मराठा संपवला, मुस्लिम संपवला, धनगर संपवला, मोठ्या जाती संपवण्याचे काम त्यांनी केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. पाच वर्ष काम केलं नाही फक्त फोडाफोडी केल्याची टीका जरांगे पाटलांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आरक्षण देतील पण, त्यांना फडणवीस आरक्षण देऊ देत नसल्याचे जरांगे पाटील म्हणाले. अजित पवार तर बोलतच नसल्याचे जरांगे म्हणाले. 

फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावी

रॅली काढायचा प्रत्येक पक्षाला अधिकार आहे. फडणवीसांनी मराठा आरक्षणासाठी रॅली काढावी, सत्ता मिळवण्यासाठी काढू नये, कारण आरक्षण दिलं नाही तर सत्ता मिळतच नसते असेही  जरांगे पाटील म्हणाले. मराठा आणि धनगर समाज राज्यात मोठे आहेत. या दोघांना संपवण्याचं काम फडणवीसांनी केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मोठ्या जाती संपवण्याचे काम त्यांनी केल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

सगळे मुख्यमंत्री माझ्याच विरोधात

सगळे मुख्यमंत्री माझ्या विरोधात झाल्याचे जरांगे पाटील म्हणाले.  अशोक चव्हाण असतील, नारायण राणे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे सगळे माझ्याविरोधात असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. तसेच सगळेच उपमुख्यमंत्री माझ्या विरोधात असल्याचे जरांगे म्हणाले. माझा असा अंदाज आहे की फडणवीस जाणून बुजून आरक्षण मिळू देत नाहीत असं जरांगे पाटील म्हणाले.

फडणवीसांना फळ त्यांना भोगावी लागतील

जे चुकले त्यांच्या विरोधात मी बोललो असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. फडणवीस आरक्षण देऊ देत नाहीत, त्याची फळ त्यांना भोगावी लागतील असे जरांगे पाटील म्हणाले. मला सरकारकडून अपेक्षा नाही. कारण त्याचं ठरलं आहे, आरक्षण द्यायचे नाही. त्यांना मराठा ओबीसी यांच्यात भांडण लावायची आहेत. त्यांना दंगली घडवायच्या आहेत. त्यांनी सरळ सरळ फसवा फसवी केली असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. 

निवडणुकीच्या आत आरक्षण दिलं तर ठिक नाहीतर...

सरकारनं मराठ्यांना सांगितलं पाहिजे की, तुम्ही ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देणार आहेत की नाहीत? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला. निवडणुकीच्या आत आरक्षण दिलं तर ठिक नाहीतर तुमचा विषय संपला असेही जरांगे पाटील म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

भुजबळांच्या नादात फडणवीस सत्ता घालवून बसणार, दरेकर हे खवाट भूत, जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Lalbaugcha Raja Visarajan 2024 : पुढच्या वर्षी लवकर या.. लालबागच्या राजाला अखेरचा निरोपLalbaugcha Raja Visarjan : राजाची शान भारी, राजाचा थाट भारी! राजाचं विसर्जन, भक्तांचे डोळे पाणावलेLalbaugcha Raja Visarjan :खोल समुद्र..., तब्बल 50 बोटींची सुरक्षा, विसर्जनाचे Exclusive ड्रोन दृश्यंBuldhana Jalgaon Jamod : जळगाव जामोदमध्ये विसर्जन मिरवणुकीत तणाव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! महाराष्ट्रतील फळे व भाजीपाला गोव्यातील विक्री केंद्राला लिंक होणार, बळीराजाला होणार फायदा
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
आमिर खानसोबत दिला होता ब्लॉकबस्टर चित्रपट, एका चुकीने उद्धवस्त झालं अभिनेत्रीचे करिअर
Pune Ganpati Visarjan: 24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
24 तासांनंतरही पुणेकरांचा उत्साह; पुणे पोलीस अॅक्शन मोडवर
Nagpur VidhanSabha: अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
अजितदादांनी थांबवलं तरी महिला आमदाराने थोपटले दंड; भाजप आमदाराविरोधात लढण्याचा ठाम निर्धार
Lalbaugcha Raja Visarjan 2024: अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
अरे ही शान कोणाची... लालबागचा राजाची! गिरगाव चौपाटीवर मुंगी शिरायलाही जागा नाही
Ganesh Visarjan : अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
अहमदनगरमध्ये 2 युवकांचा तलावात बुडून मृत्यू, गणपती विसर्जनादरम्यान घडली घटना
Amruta Fadnavis: अमृता फडणवीसांच्या कामाने मंगलप्रभात लोढा इम्प्रेस, म्हणाले, मी त्यांना आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार
अमृता फडणवीसांना मी आजपासून मॅम नव्हे तर 'माँ अमृता' अशी हाक मारणार; मंगलप्रभात लोढांची तोंडभरुन स्तुती
Indias Exports : भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
भारत विक्रम करणार! 2030 पर्यंत आखली 83.78 लाख कोटी रुपयांची योजना
Embed widget