एक्स्प्लोर

गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला दुसरा मुख्यमंत्री कोणीच नाही; देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या 'बॉर्डर'वर

आपण महाराष्ट्राच्या पहिल्या पॉईंटवर आलो आहोत, अगदी आपल्या नजरेत दिसेल एवढ्याजवळ छत्तीसगड आहे. कवंडेच्या पोलीस आऊटपोस्टमुळे या भागातील सिक्युरिटीचा खूप मोठा बॅकलॉग भरून निघाला आहे.

गडचिरोली : महाराष्ट्रातील नक्षल प्रभावी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्वीकारले आहे. गडचिरोलीत माझ्या एवढा फिरलेला मुख्यमंत्री दुसरा कोणीच नाही, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवादी भागात आपण स्वत: शेवटच्या टोकापर्यंत दौरे केल्याचं एबीपी माझाशी बोलताना म्हटले. तसेच, लवकरच गडचिरोलीमधून माओवाद संपुष्टात आणू असा दावाही त्यांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज गडचिरोलीत 13 आत्मसमर्पित नक्षलवादी (Naxal) युवक-युवतींचा सामूदायिक विवाहसोहळा संपन्न होत आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस हे नवजोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी लग्नसोहळ्याला उपस्थित राहत आहेत. तत्पूर्वी त्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर जाऊन पाहाणी केली. 

आपण महाराष्ट्राच्या पहिल्या पॉईंटवर आलो आहोत, अगदी आपल्या नजरेत दिसेल एवढ्याजवळ छत्तीसगड आहे. कवंडेच्या पोलीस आऊटपोस्टमुळे या भागातील सिक्युरिटीचा खूप मोठा बॅकलॉग भरून निघाला आहे. हा भाग आजवर सर्व प्रकाराने अनकनेक्टेड होता. मात्र, आता पोलीस इथं आल्यानंतर शासनाच्या सर्व योजना, त्यांचे लाभ लोकांना मिळतील. शासनावरील लोकांचा विश्वास वाढेल आणि संपूर्ण भाग पोलिसांच्या आणि शासनाच्या डॉमिनन्स खाली आला आहे. आता माओवाद्यांना इथे कुठलेही ऑपरेशन्स राबवता येणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला.

माझ्या एवढं गडचिरोलीत फिरणारा दुसरा मुख्यमंत्री महाराष्ट्रात कोणीही नाही, या ठिकाणी विपरीत परिस्थितीत आपले सिक्युरिटी फॉर्सेस चांगलं काम करत आहेत. या सुरक्षा यंत्रणांचा मनोबल वाढवे म्हणून मी अशा आऊटपोस्टवर दुर्गम भागात जात असतो. लवकरच गडचिरोलीमधून माओवाद पूर्णपणे संपुष्टात आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. आजवर गडचिरोलीचा विकास आणि विकासाची क्षमता नेत्यांच्या भाषणामध्ये असायची. मात्र, 2014 नंतर आम्ही प्रत्यक्ष आणि गडचिरोलीत बदल घडवून आणले. मात्र, गडचिरोलीत औद्योगिक विकास करत असताना इथले जल, जंगल आणि जमीन वाचवून आपल्याला विकास करायचा आहे. गडचिरोलीचा नैसर्गिक स्वभाव आपण बदलणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी स्पष्ट केले. 

पोलीस मुख्यालयात आत्मसमर्पित नक्षलवाद्यांचा लग्नसोहळा

गडचिरोली पोलीस दलातर्फे आत्मसमर्पित नक्षलवादी युवक युवतींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा आगळावेगळा लग्नसोहळा संपन्न होत आहे. जवळपास 13 आत्मसमर्पित नक्षल युवक युवती या विवाह सोहळ्यातून लग्न बंधनात अडकणार आहेत. तत्पूर्वी गडचिरोली पोलीस दलाच्या बँड पथकाद्वारे पोलीस मुख्यालय परिसरातून वर-वधुंची वाजत जागत वरात काढण्यात आली. या वरातीत पोलीस कर्मचारी वऱ्हाडी बनवून सहभागी झाले होते. विवाह बंधनात अडकणाऱ्या मोस्ट वॉन्टेड नक्षली गिरीधरसह नक्षल युवक-युवतींनी या लग्न सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. 

हेही वाचा

आत्मसमर्पित 13 नक्षलवादी युवक-युवतींचं शुभ मंगल सावधान; मुख्यमंत्र्यांकडून आशीर्वाद, पोलीस बनले वऱ्हाडी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! मुंबईत भाजपचा महापौर बसल्यानंतरही शिंदेंची मोठी खेळी, सव्वा वर्षासाठी शिवसेनेले महापौरपद मिळणार!
मोठी बातमी! मुंबईत भाजपचा महापौर बसल्यानंतरही शिंदेंची मोठी खेळी, सव्वा वर्षासाठी शिवसेनेले महापौरपद मिळणार!
Akola Crime News : मोठी बातमी! बिश्नोई गँगकडून अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी; सिग्नल ॲपद्वारे 2 कोटींची मागणी
मोठी बातमी! बिश्नोई गँगकडून अकोल्यातील भाजपच्या बड्या नेत्याला खंडणीसाठी धमकी; सिग्नल ॲपद्वारे 2 कोटींची मागणी
Narhari Zirwal Mantralaya Bribe Case: एक लाईन म्हणजे 50 हजार, दोन लाईन म्हणजे 1 लाख, झिरवळांच्या कार्यालयातील लाचेची हादरवणारी कहाणी
एक लाईन म्हणजे 50 हजार, दोन लाईन म्हणजे 1 लाख, झिरवळांच्या कार्यालयातील लाचेची हादरवणारी कहाणी
Rajya Sabha Election 2026: भाजपचे 3 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
भाजपचे 3 खासदार हमखास जिंकणार, ठाकरेंचे किती? राज्यसभा निवडणुकीचं समीकरण काय?

व्हिडीओ

Rohit Pawar and Chhagan Bhujbal: अजितदादांना अमोल कोल्हेंना संयुक्त राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्ष करायचं होतं; रोहित पवारांच्या दाव्याची भुजबळांनी उडविली खिल्ली
Harshwardhan Sapkal On Sharad Pawar : राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देऊ, पण.... काँग्रेसकडून राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या डीलचा प्रस्ताव?
Sunetra Pawar first Speech Shivneri : कठीण प्रसंगात शपथ घेतली, शिवरायांच्या साक्षीने पहिलं भाषण
Raj Thackeray Meets Eknath Shinde : केडीएमसीत मनसे नगरसेवकांच्या पाठिंब्याबद्दल शिंदेनी आभार मानले
Mumbai Red Line Metro : तांत्रिक कारणामुळे गेल्या 15 मिनिटांपासून मेट्रो गुंदवली स्टेशनवरच उभी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Tendulkar: एकनाथ शिंदेंच्या 'नंदनवन' बंगल्यात सचिन तेंडुलकर, उपमुख्यमंत्र्यांसोबत सपत्निक गप्पा; क्रीडा सुविधांवर चर्चा
एकनाथ शिंदेंच्या 'नंदनवन' बंगल्यात सचिन तेंडुलकर, उपमुख्यमंत्र्यांसोबत सपत्निक गप्पा; क्रीडा सुविधांवर चर्चा
मोठी बातमी! भाजपच्या रितू तावडेंचं महापौरपद सव्वा वर्षातच जाणार; समोर आलं महायुतीचं राज'कारण'
मोठी बातमी! भाजपच्या रितू तावडेंचं महापौरपद सव्वा वर्षातच जाणार; समोर आलं महायुतीचं राज'कारण'
Rajya Sabha Election 2026: भाजपचे 3 खासदार हमखास जिंकणार, राज्यसभा निवडणूक कशी होणार, समीकरण काय?
भाजपचे 3 खासदार हमखास जिंकणार, ठाकरेंचे किती? राज्यसभा निवडणुकीचं समीकरण काय?
एपस्टीन फाइल्समध्ये नाव अन् फोटो समोर; भारत दौऱ्यावर येऊनही बिल गेट्स यांची AI समिटमधून थेट माघार; एनव्हीडियाच्या सीईओंनी सुद्धा भारत दौरा टाळला
एपस्टीन फाइल्समध्ये नाव अन् फोटो समोर; भारत दौऱ्यावर येऊनही बिल गेट्स यांची AI समिटमधून थेट माघार; एनव्हीडियाच्या सीईओंनी सुद्धा भारत दौरा टाळला
30 हजारांवर रोपांवर खर्च, लागवडीला 70 हजार अन् फवारणीसाठी 40 हजारांवर खर्च करूनही कांद्याला किंमत नाही; हताश शेतकऱ्यानं तीन एकरातील उभ्या पिकावर ट्रॅक्टरने नांगर फिरवला
30 हजारांवर रोपांवर खर्च, लागवडीला 70 हजार अन् फवारणीसाठी 40 हजारांवर खर्च करूनही कांद्याला किंमत नाही; हताश शेतकऱ्यानं तीन एकरातील उभ्या पिकावर ट्रॅक्टरने नांगर फिरवला
मोठी बातमी! भिवंडीत काँग्रेसकडून भाजपचा गेम, मोठा गट फुटला; महापौर अन् उपमहापौरपदाची नावं ठरली
मोठी बातमी! भिवंडीत काँग्रेसकडून भाजपचा गेम, मोठा गट फुटला; महापौर अन् उपमहापौरपदाची नावं ठरली
Rajyasbha Election 2026: राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देऊ, पण.... काँग्रेसकडून राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या डीलचा प्रस्ताव?
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पाठिंबा देऊ, पण.... काँग्रेसकडून राष्ट्रवादीला नेमक्या कोणत्या डीलचा प्रस्ताव?

Embed widget